फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 स्पर्धेवरील कोरोनाचे ढग आणखी गडद झाले आहेत. दिल्ली कॅपिटल्सच्या आणखी एका विदेशी खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. दिल्ली कॅपिटल्समधील विकेट किपर-बॅटर टीम सायफर्टला (Tim Seifert Tests Covid Positive) कोरनाची लागण झाली आहे.

कोरोनाग्रस्त 6 वा सदस्य!

टीम सायफर्ट हा कोरोनाची लागण झालेला दिल्ली कॅपिटल्सचा सहावा सदस्य आहे. सर्वात प्रथम टीमचे फिजियो पॅट्रीक फारहार्ट (Patrick Farhart) यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऑल राऊंडर मिचेल मार्श (Mitchell Marsh) कोरोनाग्रस्त झाला. दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमधील अन्य सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे, यामध्ये मसाज स्पेशालिस्ट आणि टीमच्या डॉक्टरचाही समावेश आहे.

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यातील ही मॅच पुण्यातून मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअममध्ये खेळवण्याचा निर्णय झाला. त्यानंतर मॅचपूर्वी दुपारी सर्व खेळाडूंची रॅपिड अँटीजन टेस्ट झाली त्यावेळी सायफर्ट पॉझिटिव्ह (Tim Seifert Tests Covid Positive) आढळला.

दरम्यान, कोरोना संकटातही दोन्ही टीम मैदानात मॅचपूर्वीच्या सरावासाठी दाखल झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज मॅच होणार हे स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सची 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरूद्ध पुण्यात होणारी मॅच मुंबईतील वानखेडे स्टेडिअवर होणार असल्याचंही बीसीसीआयनं जाहीर केलं आहे.

IPL 2022 मध्ये कोरोनाची घुसखोरी, दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख सदस्याला लागण!

नियम काय सांगतो?

दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूला मॅचपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यानं पंजाब किंग्ज विरूद्ध त्यांची मॅच होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. बीसीसीआयनं यावर्षी कोरोनाबाबत केलेल्या नव्या नियमावलीनुसार मॅचपूर्वी दोन्ही टीमचे 12 खेळाडू फिट असतील तर ती मॅच खेळवली जाईल. टीममधील 11 आणि एक राखीव असे 12 खेळाडू मॅच खेळण्यासाठी फिट असणे आवश्यक आहे.

एखाद्या टीमचे 12 पैकी कमी सदस्य फिट असतील तर ती मॅच अन्य दिवशी खेळवली जाईल. नव्या वेळापत्रकानुसारही ही मॅच झाली नाही, तर बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा याबाबतचा निर्णय दोन्ही टीमना मान्य करावा (Tim Seifert Tests Covid Positive) लागेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading