फोटो – ट्विटर, बीासीसीआय, आयपीएल

कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals)  या मॅचकडं श्रेयस विरूद्ध पंत या दोन भारतीय खेळाडूंमधील लढत म्हणून पाहिलं जात होतं. यामध्ये ऋषभ पंतच्या (Rishbah Pant) दिल्ली कॅपिटल्सनं 44 रननं विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये दिल्लीला विजय मिळवून देण्याचं काम केकेआरमधून (KKR) अपमानित होऊन बाहेर पडलेल्या कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) केलं. कुलदीपनं 35 रनमध्ये 4 विकेट्स घेत त्याच्यावरील अपमानाचा (Kuldeep vs KKR) हिशेब चुकवला आहे.

कुलदीपची कमाल

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर झालेल्या मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं पहिल्यांदा बॅटींग करत 215 रन केले. केकेआरनं याचा पाठलाग जिद्दीनं सुरू केला. कॅप्टन श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) हाफ सेंच्युरी झळकावत केकेआरचं आव्हान जिवंत ठेवलं होतं. शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये केकेआरला विजयासाठी 79 रन हवे होते.

T20 क्रिकेटमध्ये हे आव्हान अशक्य मानलं जात नाही. केकेआकडून मुंबई इंडियन्स विरूद्ध 14 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणारा पॅट कमिन्स आणि जगातील सर्वात आक्रमक हिटरपैकी एक असलेला आंद्रे रसेल ही जोडी मैदानात होती.  

कुलदीप यादवं या निर्णायक क्षणी त्याच्या मनगटाची जादू दाखवली. त्यानं ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर पॅट कमिन्सला LBW केले. कमिन्स 4 रन काढून आऊट झाला. त्यानंतर बॅटींगसाठी आणखी एक आक्रमक सुनील नरीन मैदानात उतरला. नरीननं पहिल्याच बॉलवर फोर लगावला. केकेआरला याच प्रकारच्या फटकेबाजीची अपेक्षा होती. स्पिन बॉलर्सची धुलाई करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नरीननं पहिल्या बॉलला फोर वसून केला, पण पुढच्या बॉलवर त्याचा अंदाज चुकला. बाहेर जाणाऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो रोव्हमन पॉवेलकडं कॅच देऊन आऊट झाला.

त्यानंतर ओव्हरच्या आणि त्याच्या स्पेलच्या शेवटच्या बॉलवर कुलदीपनं कमाल केली. उमेश यादवनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण तो बॉल बराच उंच उडाला. कुलदीपनं बॉल टाकल्यानंतर मिड विकेटला पळत जाऊन डाईव्ह मारत एक अफलातून कॅच पकडला. या स्पर्धेतील बेस्ट कॅचमध्ये या कॅचची नोंद होईल. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स घेत कुलदीपनं केकेआरचं कंबरडं (Kuldeep vs KKR) मोडलं.

KKR नं केला अपमान

कुलदीप यादवसाठी मागील 3 आयपीएल सिझन भलतेच खराब गेले. त्याला या काळात फक्त 14 मॅच खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्यानं अवघ्या 5 विकेट्स घेतल्या. 2021 मधील आयपीएलमध्ये तर केकेआरनं त्याला संपूर्ण सिझन खेळवलंच नाही.

या विषयावर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कुलदीपनं केकेआरमध्ये मिळालेल्या वागणुकीचा गौप्यस्फोट केला होता. केकेआरची टीम त्याला मैदानात प्रॅक्टीससाठीही नेत नसे. त्याची नेमकी चूक काय झाली याचं कारणही कधी मॅनेजमेंटनं सांगितलं नाही. त्यामुळे त्याच्या आत्मविश्वास हरवला होता. केकेआरनं दिलेल्या वागणुकीमुळे (Kuldeep vs KKR) कुलदीपचं करिअर संपण्याची भीती निर्माण झाली होती.

कुलदीप यादवची कामगिरी का ढासळली? समोर आलं नेमकं कारण…

दिल्लीत मिळाला आत्मविश्वास

या आयपीएल ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं कुलदीपला खरेदी केलं. दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत आणि संपूर्ण टीम मॅनेजमेंटनं कुलदीपला पुन्हा आत्मविश्वास मिळवून दिला आहे. त्याला संपूर्ण सिझन खेळायला मिळेल अशी खात्री पंतनं दिली. मैदानातही पंत कुलदीपशी नेहमी चर्चा करताना दिसतो. पंतनं त्याला निर्णायक क्षणी ओव्हर्सही दिल्या आहेत.

दिल्लीनं दाखवलेला हा आत्मविश्वास कुलदीपनं सार्थ ठरवलाय. त्यानं 4 मॅचमध्ये 10 विकेट्स घेत पर्पल कॅपच्या शर्यतीमध्ये आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर दिल्लीनं आत्तापर्यंत जिंकलेल्या दोन्ही मॅचमध्ये तोच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ आहे. कुलदीपचा हा खेळ पाहून केकेआरच्या मॅनेजमेंटला त्याला दिलेल्या वागणुकीबाबत नक्कीच पश्चाताप (Kuldeep vs KKR) होत असेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: