फोटो – ट्विटर, कुलदीप यादव

दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) कोरोनाच्या सावटाखाली देखील यशस्वी खेळ करत पंजाब किंग्जचा (Punjab Kings) 9 विकेट्सनं मोठा पराभव केला. दिल्लीनं विजयासाठी आवश्यक असलेलं 116 रनचं आव्हान फक्त 1 विकेटच्या मोबदल्यात आणि 10.3 ओव्हर्समध्ये पूर्ण करत रनरेटमध्ये चांगलीच वाढ केली आहे. या मॅचमध्ये सर्वात चांगली बॉलिंग करणाऱ्या अक्षर पटेलच्या (Axar Patel) जागी कुलदीप यादवला (Kuldeep Yadav) ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं. कुलदीपला हा पुरस्कार का मिळाला? याचं कारण आता उघड (Why Kuldeep over Axar) झालं आहे.

स्पिनर्सची कमाल

या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2022) सातत्यानं आक्रमक बॅटींग करणाऱ्या पंजाबच्या बॅटर्सना 115 रनमध्ये रोखण्यात दिल्लीच्या सर्वच बॉलर्सचा विशेषत:  स्पिनर्सचा महत्त्वाचा वाटा होता. दिल्लीच्या स्पिनर्समध्ये ललित यादव (11 रनमध्ये 2 विकेट्स), कुलदीप यादव (24 रन 2 विकेट्स) आणि अक्षर पटेल (10 रनमध्ये 2 विकेट्स) अशा एकूण 6 विकेट्स घेतल्या.

या सर्वांमध्ये अक्षरची कामगिरी चांगली होती. त्यानं सर्वात कमी रन दिले. त्याचबरोबर 24 पैकी 14 बॉल निर्धाव टाकले. त्याच्या 4 ओव्हर्सच्या स्पेलमध्ये एकही सिक्स किंवा फोर बसला नाही. तसंच अक्षरनं लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा या पंजाबच्या दोन आक्रमक खेळाडूंना आऊट केलं.

कुलदीप यादवनं 24 मध्ये 9 बॉल निर्धाव टाकले. त्याच्या बॉलिंगवरही एकही सिक्स मारण्यात पंजाबच्या बॉलर्सना अपयश आलं. पण, त्यांनी 3 फोर लगावले. कुलदीपनं कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस यांना आऊट केलं.

कुलदीप का?

कुलदीपपेक्षा अक्षरची बॉलिंग चांगली झाली होती. तरीही ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार कुलदीपला मिळाला. मॅचनंतर कॉमेंटेटर हर्षा भोगलेनं याचं कारण सांगितलं. इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसनवर या मॅचसाठी हा पुरस्कार निवडण्याची जबाबदारी होती. पीटरसनने कुलदीपची निवड केली.

पीटरसनला कुलदीपचा बॉलिंग करतानाचा एटीट्यूड आणि बॉलिंगमधील विविधता अधिक भावली, त्यामुळे त्याने कुलदीपची (Why Kuldeep over Axar) निवड केल्याचं हर्षा यांनी सांगितले. दिल्ली कॅपिटल्सचा या सिझनमधील हा तिसरा विजय आहे. विशेष म्हणजे या तीन्ही मॅचमध्ये ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार कुलदीपलाच मिळाला आहे.

कुलदीप या सिझनमधील आत्तापर्यंतचा दिल्लीचा सर्वात यशस्वी बॉलर असून त्यानं 6 मॅचमध्ये 7.85 च्या इकोनॉमी रेटनं 13 विकेट्स घेतल्या आहेत. या सिझनमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीमध्ये कुलदीप सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

करिअर संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या KKR चा कुलदीपनं घेतला बदला!

कुलदीपचं मोठं मन

केव्हिन पीटरसननं पुरस्कारासाठी कुलदीपची निवड केली. हा पुरस्कार घेताना कुलदीपनं मोठं मन दाखवलं. त्यानं हा पुरस्कार अक्षर पटेलसोबत शेअर केला. अक्षर पटेलनं मिडल ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग केली, त्यामुळे या पुरस्काराचा तो खरा मानकरी असल्याचं कुलदीपनं सांगितलं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: