फोटो – ट्विटर, आयपीएल, बीसीसीआय

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत लीग आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू धडपड करत असतात. ते प्रसंगी त्यांच्या क्रिकेट बोर्डालाही झुकवतात किंवा त्यांचं ऐकत नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर तयार करणाऱ्या आयसीसीनंही (ICC) आयपीएलसाठी वर्षातील खास कालावधी राखून ठेवला आहे. ही सुविधा जगातील कोणत्याही अन्य लीगला उपलब्ध नाही. आयोजक श्रीमंत आणि शक्तीशाली बोर्ड, सहभागी आघाडीचे क्रिकेटपटू, जगातील दिग्गज ब्रँड हे स्पॉनर्स आणि 130 कोटींच्या भारत देशाची बाजारपेठ असूनही यंदाची आयपीएल स्पर्धा ही ढिसाळ आयोजनाचं उदाहरण ठरली आहे. यामधील एका बड्या मॅचमध्ये DRS नसल्याचा (IPL DRS Problem) मोठा फटका चेन्नई सुपर किंग्सला सहन करावा लागलाय.  

नेमकं काय झालं?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहेत. या टीममधील मॅचकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असतं. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेली मॅचही त्याला अपवाद नव्हती. या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतला.

चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) टीम पहिल्यांदा बॅटींगला आली. सीएसकेच्या इनिंगमधील पहिल्याच बॉलवर सीएसकेचा ओपनर डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) आऊट असल्याचा निर्णय अंपायरनं दिला. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे लेग स्टम्पच्या बाहेर बॉल जात आहे, हे डोळ्याला दिसत होतं. सीएसकेकडं DRS चा पर्याय होता. त्यानंतरही क़ॉनवेला DRS घेता (IPL DRS Problem) आला नाही.

IPL च्या पैशांमुळे मित्र बनला शत्रू! ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरचा गंभीर आरोप

काय होती अडचण?

डेव्हॉन कॉनवेची DRS घेण्याची इच्छा होती. सीएसके टीमची DRS घेण्याची इच्छा होती. तरीही कॉनवेला तो घेता आला नाही. कारण, मुंबईतील वानखेडे स्टेडियम भागातील लाईट गेली होती. DRS घेण्यासाठी आवश्यक मशिन लाईट नसल्यानं बंद होत्या. या चुकीमुळे कॉनवेला DRS घेता आला नाही.

DRS असता तर कॉनवे कदाचित वाचला असता. कॉनवे सध्या जबरदस्त फॉर्मात होता. मागील तीन मॅचमध्ये त्यानं हाफ सेंच्युरी झळकावली होती. तो DRS मुळे नॉट आऊट ठरला असता तर कदाचित मॅचचं चित्रं वेगळं झालं असतं. पण, बीसीसीआयकडे या प्रकारची अचानक अडचण आली तर काय करता येईल याची योजना नसल्यानं सीएसकेला DRS बंदचा मोठा फटका सहन करावा लागला.

ख्वाजा आऊट होता, अंपायरला नाही वाटला! DRS नसल्यानं क्रिकेटची थट्टा

सीएसकेच्या इनिंगमधील दुसऱ्या ओव्हरमध्ये बुमराहनं रॉबिन उथप्पाला LBW केलं. उथप्पाच्या विकेटच्या वेळीही DRS बंद (IPL DRS Problem) होता. बीसीसीआयच्या खराब नियोजनामुळे जगातील सर्वात मोठ्या लीगची नाचक्की झाली आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: