सौजन्य- ट्विटर

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणारा टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलनं (Yuzvedra Chahal) त्याच्यावरील एक जीवघेणा अनुभव सार्वजनिक केला आहे. आरसीबीचा (RCB) सर्वात यशस्वी स्पिनर असलेल्या चहलनं त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) केली होती. आयपीएल 2013 च्या दरम्यान मुंबई इंडियन्सकडून खेळत असताना त्याच्यावर हा प्रसंग ओढावला होता. मुंबई इंडियन्सच्या टीममधील एका दारूड्या प्लेयरनं मला 15 व्या मजल्यावर लटकवलं होतं (MI Dunked Player hanged Chahal) असा गौप्यस्फोट चहलनं केला आहे.

काय घडला प्रसंग?

राजस्थान रॉयल्सनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये चहलनं हा प्रसंग सांगितला आहे. यावेळी चहल म्हणाला की, ‘ मी मुंबई इंडियन्सकडून 2013 साली खेळत असतानाचा हा किस्सा आहे. मुंबईची टीम बेंगळुरूला मॅच खेळत होती. मुंबई टीमचे मॅच जिंकल्यनंतर एक गेट-टू-गेदरचे आयोजन करण्यात आले होते. नाव सांगणार नाही पण त्या पार्टीत उपस्थित असलेला एक खेळाडू नशेत होता आणि तो माझ्याकडे रागाने पाहत होता. त्याने मला बोलावून घेतले मला घेऊन तो (पार्टीतून) बाहेर पडला. तो बिल्डिंगचा 15 व्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली फेकण्याचा प्रयत्न करू लागला होता.” चहलने व्हिडीओद्वारे हा किस्सा त्यावेळी रवीचंद्रन अश्विन आणि करूण नायर देखील उपस्थित होते.

जीव वाचवण्यासाठी आटापिटा

घडलेल्या घटनेविषयी सांगताना चहल पुढे म्हणाला, ”त्या खेळाडूला मी घट्ट धरून ठेवले होते. जीव वाचवण्यासाठी माझा आटापिटा चालू होता. मी जोरजोरात ओरडत होतो. मी हातांनी गळ्याला विळखा घातला होता. हाताची ग्रीप सुटली असती तर 15व्या मजल्यावरून जमिनीवर आपटलो (MI Dunked Player hanged Chahal) असतो. सुदैवाने काही वेळातच लोकं तिथे जमा झाले आणि त्या प्रसंगातून सुखरूप वाचलो. त्या घटनेने मी खूप घाबरलो होतो. माझी शुध्द हरपली होती. तिथे जमलेल्या लोकांनी मला पाणी प्यायला दिल्यानंतर मी शुध्दीवर आलो होतो. त्या प्रसंगनंतर घराबाहेर कुठेही जाताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे हा धडा मला मिळाला. माझ्या करिअमधील हा एक न विसरता येण्यासारखा क्षण आहे.’ असे चहलने स्पष्ट केले.

फॅन्सनी केली चौकशीची मागणी?

युजवेंद्र चहलनं सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चहलनं त्या खेळाडूंचं नाव दिलेलं नाही, पण बीसीसीआयनं या प्रसंगाची गंभीर दखल घ्यावी. आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान आयपीएल खेळाडूकडून घडलेल्या प्रसंगाची चौकशी करावी अशी मागणी फॅन्सनी केली आहे.

प्रचंड क्षमतेचा पण वादग्रस्त ऑल राऊंडर!

चहलचा आयपीएल प्रवास

आयपीएल 2013 हा एकच सिझन चहल मुंबई इंडियन्सकडून (MI Dunked Player hanged Chahal) खेळला. त्यानंतर पुढील आठ सिझन तो आरसीबीता सदस्य होता. चहलनं आरसीबीकडून 113 मॅचमध्ये 7.58 च्या इकोनॉमी रेटनं 139 विकेट्स घेतल्या आहेत. आरसीबीकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत चहल पहिल्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनआधी (IPL 2022 Mega Auction) चहलला आरसीबीनं रिटेन केलं नाही. चहलला राजस्थान रॉयल्सने 6 कोटी 50 लाख किंमतीत खरेदी केले. या सिझनमध्ये राजस्थानकडून खेळताना चहलने आत्तापर्यंत 3 मॅचमध्ये 5.45 च्या इकोनॉमी रेटने 7 विकेट्स घेतल्या आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: