फोटो – ट्विटर, गुजरात टायटन्स

आयपीएल 2022 साठी झालेल्या मेगा ऑक्शनंतर (IPL 2022) गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) टीम निवडीवर बहुतेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. या टीमच्या बॅटींगमध्ये पुरेशी खोली नाही. त्यांचा प्रमुख खेळाडू जेसन रॉयनं माघार घेतली. हार्दिक पांड्याची कॅप्टनसी आणि फिटनेस यावर शंका होती. मिलर आणि तेवातिया या आयपीएलमध्ये मागील काही सिझनमध्ये फेल गेलेल्या खेळाडूंना त्यांनी करारबद्ध केले. त्यामुळे ‘गोंधळाचा गरबा’ असलेली गुजरातची टीम फेल होणार असाच बहुतेकांचा अंदाज होता. गुजरातनं या सर्वांचा अंदाज चुकवत पहिल्या 7 पैकी 6 मॅच जिंकल्या आणि फर्स्ट हाफमध्ये टॉप केलं. गुजरातनं हे यश कसं मिळवलं (How Gujarat Titans Succeed) ते पाहूया

बदलला गिल

गुजरातच्या मॅनेजमेंटनं शुभमन गिलला (Shubman Gill) ड्राफ्टमध्येच करारबद्ध केलं होतं. मॅनेजमेंटचा हा विश्वास सार्थ ठरवण्याचा गिल यंदा पूर्ण प्रयत्न करताना दिसतोय. गुजरातच्या दोन विजयांमध्ये गिलच्या दमदार बॅटींगचा मोठा वाटा आहे. त्यानं दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध 46 बॉलमध्ये 84 रन ठोकले. तर पंजाब किंग्ज विरूद्ध 59 बॉलमध्ये 96 रनची खेळी करत 190 चं टार्गेट पूर्ण करण्यात महत्त्वाचा रोल बजावला.

मॅथ्यू वेड आणि विजय शंकर हे टॉप 3 मधील अन्य दोन जण सातत्यानं फेल झाले. पण, गिलनं या दोन मॅचमध्ये टीमला सुखरूपणे पैलतीरावर नेले. पहिल्या ओव्हरपासून आक्रमक खेळ करण्याचा इंटेन्ट गिलनं गुजरातकडून दाखवला आहे. जो केकेआरकडून खेळताना त्याच्यात क्वचित दिसला. त्याचा गुजरातला फायदा (How Gujarat Titans Succeed) झाला आहे.

दमदार हार्दिक

हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) दमदार पुनरागमन ही फक्त गुजरात टायटन्सची नाही तर या आयपीएलमधील एक महत्त्वाची स्टोरी आहे. हार्दिकसाठी मागील संपूर्ण वर्ष निराशाजनक ठरलं. खराब फिटनेस आणि फॉर्ममुळे त्याची टीममधील जागा गेली. मुंबई इंडियन्सनं त्याला रिटेन केले नाही. त्यानंतरही गुजरातनं त्याला कॅप्टन केले. हार्दिकनं फर्स्ट हाफमध्ये त्याचे संपूर्ण रिटर्न्स दिले आहेत.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध 2017 साली 4 नंबरवर खेळताना हार्दिक पांड्या ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ ठरला होता. स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्समध्ये त्याला ही संधी नंतर कधी मिळाली नाही. गुजरातकडून त्यानं 4 नंबरवर खेळत टीमची बॅटींग पेलली आहे. तो या स्पर्धेतील टॉप 5 बॅटर्सच्या यादीत आहे. त्याचबरोबर हार्दिकच्या आक्रमकतेचा उपयोग त्याच्या कॅप्टसीमध्येही (How Gujarat Titans Succeed) होतोय.

लढाऊ वृत्ती

गुजरात टायटन्सच्या खेळाडूंनी लढाऊ वृत्ती या स्पर्धेत दाखवलीय. त्यामुळेच त्यांना निर्णायक क्षणी विजय मिळाले आहेत. अभिनव मनोहरनं आयपीएल स्पर्धेच्या पदार्पणात लखनौ विरूद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी केली. राहुल तेवातियानं पंजाब विरूद्ध हार न मानता शेवटच्या दोन बॉलवर दोन सिक्स लगावत गुजरातला सनसनाटी विजय मिळवून दिला.

हार्दिक पांड्याच्या अनुपस्थित डेव्हिड मिलरनं सीएसके विरूद्ध बॅटींगची जबाबदारी शेवटपर्यंत सांभाळत टीमला विजय मिळवून दिला. त्याला राशिद खाननंही आक्रमक बॅटींग करत साथ दिली. अल्झारी जोसेफनं शेवटच्या ओव्हरमध्ये आंद्रे रसेलला आऊट करत केकेआरच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. निर्णयाक क्षणी गुजरातच्या खेळाडूंनी दाखवलेली लढाऊ वृत्ती हे देखील गुजरातच्या यशाचं मुख्य कारण (How Gujarat Titans Succeed) आहे.

फक्त 5 बॉलमध्ये झिरो नंबर 1 बनला हिरो नंबर 1

प्रमुख बॉलर्सची कामगिरी

गुजरात टायटन्सकडं मोहम्मद शमी, ल़ॉकी फर्ग्युसन आणि राशिद खान हे 3 प्रमुख आंतरराष्ट्रीय बॉलर आहेत. या तीन्ही बॉलर्सनी पहिल्या हाफमध्ये त्यांची भूमिका गुजरातच्या यशात निर्णयाक ठरतीय.

शमीनं ‘पॉवर प्ले’ मध्ये प्रभावी बॉलिंग केलीय. फर्ग्युसन मिडल ओव्हर्समध्ये समोरच्या टीमला जखडून ठेवतोय. तर राशिद खानचा कल्पकतेनं गुजरातनं वापर केलाय. राजस्थान विरूद्ध रशिदनं पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करत बटलरला आऊट केलं. तर सीएसके विरूद्ध त्यानं 19 व्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन देत त्यांच्या इनिंगला ब्रेक लावला.

नवे मॅच विनर

मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, शुभमन गिल, हार्दिक पांड्या, डेव्हिड मिलर आणि राशिद खान हे गुजरातच्या 6 विजयात 6 ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरले आहेत. प्रत्येक मॅचमध्ये नव्या खेळाडूनं चमदार कामगिरी करत टीमला विजय मिळवून दिलाय. त्यामधून टीम ही एकावर अवलंबून नसून त्याच्या यशात सामूहिक प्रयत्नांचा भाग असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात टायटन्सच्या आत्तापर्यंतच्या यशाचं हे सर्वात मोठं रहस्य (How Gujarat Titans Succeed) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: