फोटो- ट्विटर, सनरायजर्स हैदराबाद

2016 ते 2020 या सलग पाच सीझनमध्ये प्ले- ऑफ गाठणाऱ्या सनरायझर्स हैदराबादसाठी (Sunrisers Hyderabad) मागील सिझन निराशाजनक ठरला. 14 पैकी फक्त 3 मॅच जिंकून ही टीम पॉईंट टेबलमध्ये सर्वात शेवटी होती. सनरायझर्सशी ओळख असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (David Warner) स्पर्धेच्या दरम्यान कॅप्टनपदावरून काढण्यात आले. वॉर्नरशी झालेल्या मतभेदानंतर ही टीम त्याला रिटेन करणार नाही, हे स्पष्ट झाले होते. ‘ऑरेंज आर्मी’मध्ये 2014 नंतर पहिल्यांदाच वॉर्नर नाही. सनरायझर्समध्ये वॉर्नर नसण्याची सवय आता फॅन्सना करावी लागेल. क्रिकेट फॅन्सना ही सवय लावण्याची जबाबदारी 5 प्रमुख खेळाडूंवर (5 SRH players to watch out) आहे. त्यांनी अपेक्षेप्रमाणे खेळ केला तर मागील सिझनमधील अपयशानंतर या टीमच्या यशाचा ‘सूर्य’ पुन्हा एकदा उगवू शकतो.

1. केन विलियम्सन

क्रिकेट विश्वातील ‘फॅब फोर’ मध्ये केन विलियम्सनचा (Kane Williamson) समावेश होतो. शांत आणि संयमी कॅप्टन म्हणून विल्यमसनची ओळख आहे. त्याच्या या कौशल्याची परीक्षा या आयपीएल सिझनमध्ये होणार आहे. विल्यमसन दुखापतीमुळे 4 महिने क्रिकेटपासून दूर होता. हैदराबादच्या टॉप ऑर्डरचा तो मुख्य आधार आहे. मोठा स्कोअर करणे किंवा टार्गेटचा पाठलाग करणे या दोन्ही गोष्टीमध्ये हैदराबादची बॅटींग त्याच्यावर सर्वात जास्त अवलंबून असेल. वॉर्नरच्या अनुपस्थितीमध्ये 2018 मध्ये विल्यमसनच्याच नेतृत्वाखाली हैदराबाद फायनलपर्यंत पोहोचले होते.

2. भुवनेश्वर कुमार

हैदराबादची टीम नेहमीच स्ट्रॉंग बॉलिंग युनिटसाठी प्रसिद्ध आहे. हा सिझनदेखील याला अपवाद नाही. शेफर्ड, मलिक, यान्सिन, नटराजन असा मजबूत पेस बॉलिंग अटॅक लीड करण्याची जवाबदारी अनुभवी भुवनेश्वर कुमारवर (Bhuvneshwar Kumar) असणार आहे. या लिलावात भुवनेश्वरला हैदराबादने 4 कोटी 20 लाख किंमतीत खरेदी केले. दोन्ही बाजूने बॉल स्विंग करण्याच्या कलेमुळे पहिल्या सहा ओव्हर्समध्ये भुवनेश्वर (5 SRH players to watch out) प्रतिस्पर्धी टीमच्या विकेट्स घेऊन दडपण . टाकू शकतो

3. निकोलस पूरन

वेस्ट इंडिज टीममधील आक्रमक बॅटर आणि व्हाईस कॅप्टन निकोलस पूरन (Nicholas Pooran) हैदराबादला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावू शकतो. बेअरस्टोच्या जागेवर त्याला टीममध्ये घेण्यासाठी हैदराबादने मोठी किंमत मोजली आहे. 10 कोटी 75 लाख रूपयांमध्ये पूरन हैदराबादनं खरेदी केलंय. गेल्या आयपीएलचं अपयश धुऊन काढण्याचा पूरनचा निर्धार असेल. भारता विरूद्ध नुकत्याच झालेल्या T20 सीरिजमध्ये सर्वाधिक रन करत फॉर्मात असल्याचं त्यानं दाखवूनही दिलं आहे. पूरननं त्याची जबाबदारी पूर्ण केली तर हैदराबादचा मार्ग सोपा होईल.

दोन्ही पाय जायबंदी झाल्यानंतरही जिद्दीनं परत येऊन मैदान गाजवणारा क्रिकेटपटू!

4. उमरान मलिक

आयपीएलच्या गेल्या सिझनमध्ये फास्टेस्ट बॉल टाकत नवोदीत उमरान मलिकनं (Umran Malik) एकच खळबळ उडवली होती. हैदराबादच नाही तर भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून देखील उम्रानकडे पाहिलं जात आहे. फक्त 3 मॅच खेळलेल्या उमरानला रिटेन करत हैदराबादनं त्याच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला आहे. नेट बॉलर ते आशास्थान असा प्रवास काही दिवसांमध्ये करणाऱ्या उम्रानच्या कारकिर्दीसाठी हा सिझन खूप महत्त्वाचा आहे. बॉलिंग कोच डेल स्टेनच्या मार्गदर्शनाखाली त्याची ‘स्पिड गन’ प्रतिस्पर्धी टीमवर धडधडावी अशीच हैदराबादच्या फॅन्सची अपेक्षा असेल.

5. वॉशिंग्टन सुंदर

ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक विजयात हाफ सेंच्युरी करून सर्वांना प्रभावित करणारा वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) या सिझनमध्ये आरसीबीच्या (RCB) रेड जर्सी ऐवजी हैदराबादची ऑरेंज जर्सी परिधान करणार आहे. टीममध्ये समतोल राखण्यासाठी सुंदरची भूमिका खूप महत्वाची (5 SRH players to watch out) आहे. सुंदर टीममध्ये असेल तर एखादा अतिरिक्त फास्ट बॉलर किंवा बॅटर खेळवता येऊ शकतो. त्याचा ‘पॉवर प्ले’मध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव हैदराबादच्या कामी येऊ शकतो. यावर्षा होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2022) निवड होण्यासाठी सुंदरला या आयपीएल सिझनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: