फोटो – ट्विटर

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेचे (IPL 2022) पडघम वाजू लागले आहेत. लखनौ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम आगामी सिझनमध्ये पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्याचबरोबर या सिझनपूर्वी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) देखील होणार आहे. त्यामुळे सर्वच टीमनं तयारी सुरू केली आहे. आठ जुन्या टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. तर लखनौ या नव्या टीमनं त्यांच्या हेड कोचपदी क्रिकेट विश्वातील दिग्गज प्रशिक्षक अँडी फ्लॉवर (Andy Flower Lucknow Coach) नियुक्ती केली आहे.

सर्वात महागडी टीम

लखनौ शहराच्या टीमचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. पण, ही टीम आयपीएल इतिहासातील आजवरची सर्वात महागडी टीम आहे. उद्योगपती संजीव गोयंका यांच्या RPSG  (RP Sanjiv Goenka Group) ग्रुपने तब्बल 7090 कोटी मोजून ही टीम खरेदी केली आहे.

या ग्रुपकडे 2016 आणि 2017  या दोन आयपीएल सिझनमध्ये पुण्याची टीम चालवण्याचा अनुभव आहे. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी आणि स्टीव्ह स्मिथ सारखे दिग्गज क्रिकेटपटू या टीममध्ये होते. 2017 साली ही टीम फायनलमध्ये अगदी अटीतटीच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध फक्त 1 रननं पराभूत झाली होती.

गोयंका ग्रुपने यंदाही आयपीएल सिझनची तयारी जोरात सुरू केली आहे. केएल राहुल (KL Rahul) आणि राशिद खान (Rashid Khan) या दोन सुपरस्टार्सना ही टीम ड्राफ्टमध्ये खरेदी करणार अशी चर्चा आहे. त्यापूर्वी या टीमनं अँडी फ्लॉवरची हेड कोच (Andy Flower Lucknow Coach) म्हणून नियुक्ती केली आहे.

टीम इंडिया विरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड

झिम्बाब्वेच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ खेळाडूमध्ये अँडी फ्लॉवरचा समावेश होतो. त्याने 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. पहिल्याच मॅचमध्ये सेंच्युरी झळकावणाऱ्या फ्लॉवरने पुढे झिम्बाब्वेसाठी अनेक रेकॉर्ड केले. त्याच्याच कॅप्टनसीमध्ये झिम्बाब्वेनं पहिल्यांदा टेस्ट मॅच जिंकण्याचा पराक्रम केला होता.

स्पिनर्सविरुद्ध खेळण्याचं फ्लॉवरच कसब लाजवाब होते. त्यामुळेच ते टीम इंडियविरुद्ध भारतामध्ये कमालीचे यशस्वी झाले. त्यांनी भारताविरुद्ध 2001 साली झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये फक्त 2 वेळा आऊट होत 540 रन केले होते. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकाच टेस्टमध्ये 142 आणि नाबाद 199 रन काढण्याचा पराक्रम देखील त्याने केला होता.

फ्लॉवरने 2003 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीममधील सहकारी हेन्री ओलोंगासह रिटायर होण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेमधील रॉबर्ट मुगाबेशाहीला आव्हान देत त्याने देश आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले.

सर्वशक्तीमान व्यक्तीला आव्हान देणारा धाडसी क्रिकेटपटू

ऐतिहासिक कोच

इंग्लंड क्रिकेट टीमचा हेड कोच म्हणूनही फ्लॉवरची कारकिर्द कमालीची यशस्वी (Andy Flower Lucknow Coach)  ठरली. त्याच्या कारकिर्दीमध्ये इंग्लिश टीमने मायदेशात आणि ऑस्ट्रेलियातही अ‍ॅशेस सीरिज (Ashes Series) जिंकली. त्याचबरोबर 2010 साली T20 वर्ल्ड कप जिंकत पहिल्यांदाच एखाद्या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

फ्लॉवर गेल्या काही वर्षांपासून जगभरातील T20 टीमचे यशस्वी हेड कोच आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमधील सेंट लुसिया किंग, पाकिस्तान सुपर लीगमधील मुलतान सुलतान, द हंड्रेडमधील ट्रेंट रॉकेट्स आणि T10 लीगमधील दिल्ली रॉकेट्स या सर्व टीमचा हेड कोच म्हणून त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

आयपीएलमध्ये अनिल कुंबळेचे (Anil Kumble) सहाय्यक म्हणून पंजाब किंग्ज टीमसोबत ते दोन वर्ष होते. त्याची ही कारकिर्द यशस्वी झाली नाही. आता लखनौच्या टीममध्ये त्यांना मुख्य भूमिका मिळाल्यानं आयपीएल स्पर्धा गाजवण्यासाठी फ्लॉवर सज्ज (Andy Flower Lucknow Coach) झाला आहे.

IPL 2022 Retention: बड्या नावांसह तरुण खेळाडूंनाही संधी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: