
गौतम गंभीर आणि विराट कोहली हे दोन दिल्लीकर खेळाडू मैदानावर आक्रमक स्वभावासाठी क्रिकेट विश्वात प्रसिध्द आहेत. हे दोन्ही खेळाडू यशस्वी होण्यासाठी मैदानात 100 टक्के परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतात. गंभीर कॅप्टनसी आणि बॅटिंग तितक्याच त्वेषाने करत असे. दिल्लीतील या सिनिअर खेळाडूचा स्वभवाभ विराटमध्ये उतरला आहे. आयपीएल 2013 चा एका मॅचमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात भर मैदानात जोरदार भांडण झाले होते. त्या घटनेची क्रिकेट विश्वात खूप चर्चा देखील झाली होती. आयपीएल इतिहासात गाजलेल्या भांडणांपैकी एक अशी त्याची नोंद आहे. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंमध्ये मैदानात वाद का झाला? याचे कारण आता तब्बल 9 वर्षांनी उघड झालं आहे. गौतम गंभीरनं यूट्यूवबरील एका शोमध्ये (Gambhir Kohli Clash) याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.
गौतम गंभीरचे स्पष्टीकरण
गौतम गंभीरनं जतिन सप्रूच्या ‘ओव्हर अँड आऊट’ या यूट्यूबशोमध्ये या घटनेबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. गंभीर यावेळी म्हणाला की, ‘खेळामध्ये या गोष्टी होतच असतात. कधीकधी खेळामध्ये असे प्रसंग येतात की जिथे तुम्हाला वैयक्तिक नातेसंबंध विसरावे लागतात, कारण तुम्ही एका टीमचे नेतृत्व करत असता आणि त्यामूळे त्या प्रसंगात ज्या काही गोष्टी घडल्या, जे काही मी बोललो त्या गोष्टींची मला अजिबात खंत वाटत नाही
ती स्पर्धा, तो संघर्ष मला खूप भावतो. मला आव्हान देणारे प्रतिस्पर्धी आवडतात. महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) हे एकप्रकारे प्रतिस्पर्धीच आहेत. कॅप्टन म्हणून काही गोष्टी इच्छा नसताना देखील कराव्या लागतात. कारण तुमच्या (कॅप्टनच्या) इच्छेनुसार टीमनं कामगिरी करणे अपेक्षित असते. त्यामुळेच कोहली आणि माझ्यात त्या मॅचमध्ये झालेलं भांडण हे खेळापुरतं होतं त्यात हेवेदावे, वैयक्तिक शत्रूत्व (Gambhir Kohli Clash) नव्हते.’
गंभीरकडून विराटचं कौतुक
गौतम गंभीरनं यावेळी बोलताना विराट कोहलीची प्रशंसाही केली. ‘मी ही गोष्ट वेगवेगळ्या कार्यक्रमात, मुलाखतीत अनेकदा सांगितले आहे की, आज विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे काही कमावलं आहे त्याबद्दल मुळीच आश्चर्य वाटत नाही. त्याच्या करिअरचा सुरूवातीपासून मी त्याचा खेळ पाहिला आहे. विराटच्या पहिल्या सेंच्युरीवेळी देखील मी त्याच्यासोबत बॅटिंग करत होतो मला खात्री आहे तो 100 सेंच्युरी नक्की करेल. फिटनेसमध्ये विराटने मोठा बदल घडवून आणला आहे. तसेच क्रिकेटचे कौशल्य सुधरवण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.
LSG Squad Analysis: कशी आहे 2022 ची लखनौ? पहिल्याच सिझनमध्ये किती ‘गंभीर’?
गौतम गंभीरच्या नेतृत्वात कोलकत्ता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) दोनवेळा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. तर विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (Royal Challengers Bangalore) एकदाही ट्रॉफी उंचावण्यात यश आलेले नाही. आरसीबीच्या कॅप्टनपदी या सिझनमध्ये विराटऐवजी फाफ डू प्लेसिसची नियुक्ती झाली आहे.
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.