फोटो – सोशल मीडिया

आयपीएल स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. या टीमचा ओपनर आणि प्रमुख खेळाडू जेसन रॉयनं आयपीएल स्पर्धेमधून माघार (Jason Roy Pulled Out) घेतली आहे. T20 क्रिकेटचा मोठा अनुभव असलेला जेसन रॉय आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) शुभमन गिलसोबत ओपनिंग करणार होता. पण, आता त्यानं माघार घेतल्यानं गुजरातची डोकेदुखी वाढली आहे.

का घेतली माघार?

इंग्लंड टीमचा ओपनर असलेल्या रॉयला गुजरातनं त्याच्या 2 कोटी या बेस प्राईजला खरेदी केले होते. त्याच्या समावेशानं गुजरातचे मॅनेजमेंटही चांगलेच खूश होते. हेड कोच आशिष नेहरानं काही मुलाखतीमध्येही तसा उल्लेख केला होता. पण, त्यांचा हा आनंद स्पर्धेपूर्वीच संपुष्टात आला. रॉयनं बायो-बबलमधील थकव्याचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे.

रॉयला जानेवारी महिन्यामध्ये दुसरं मुल झालेलं आहे. तो आयपीएल स्पर्धेत खेळला असता तर लहान मुलापासून त्याला दोन महिने दूर राहावे लागले असते. त्याच्या माघारीचे हे एक कारण असून शकेल, असे मानले जात आहे. यंदा आयपीएल स्पर्धेत 10 टीम सहभागी होणार असून ही स्पर्धा 26 मार्च ते 29 मे दरम्यान होणार आहे.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?

PSL मध्ये खेळला रॉय

आयपीएल स्पर्धेतून माघार घेणारा जेसन रॉय नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धेत खेळला होता. क्वेटा ग्लॅडिएटर्स टीमकडून खेळताना त्यानं 6 मॅचमध्ये 50.50 च्या सरासरीनं 303 रन केले होते. त्याचा या स्पर्धेतील स्ट्राईक रेट 170.22 होता.

जेसन रॉयनं आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याची ही दुसरी वेळ आहे. त्याने यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स टीममधून (Delhi Capitals) आयपीएल 2020 मधून माघार घेतली होती. गुजरात टायटन्सही जेसन रॉयची चौथी आयपीएल टीम होती. तो यापूर्वी गुजरात लॉयन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या टीमकडून आयपीएल खेळला आहे. मागील वर्षी बदली खेळाडू म्हणून त्याला हैदराबादने खरेदी (Jason Roy Pulled Out) केले होते.

बदली खेळाडूचं आव्हान!

जेसन रॉयनं माघार घेतल्यानं (Jason Roy Pulled Out) गुजरात टायटन्सला आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याचा बदली खेळाडू शोधावा लागेल. T20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियातून बाहेर असलेला ऑल राऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) या टीमचा कॅप्टन आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स टीममध्ये राशिद खान, शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन हे प्रमुख खेळाडू आहेत.

गुजरात टायटन्सची संपूर्ण टीम: हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुभमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, लॉकी फर्ग्युसन, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, आर. साई किशोर, नूर अहमद, डोमिनेक ड्रेक्स, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, डेव्हिड मिलर, ऋद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकिरत सिंह, वरूण एरॉन, आणि बी. साई सुदर्शन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: