फोटो – ट्विटर, हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) भारतीय क्रिकेटला दिलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव प्रमुख आहे. हार्दिकनं 2015 साली मुंबई इंडियन्समध्ये पदार्पण केले. गेल्या सात वर्षांमध्ये चार आयपीएल विजेतपद मिळवणाऱ्या टीमचा तो सदस्य होता. या आयपीएलमध्ये हार्दिक गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कॅप्टन आहे. मुंबई इंडियन्सपूर्वीच्या मॅचपूर्वी हार्दिकच्या जुन्या आठवणींचा व्हिडीओ टायटन्सनं शेअर केला आहे. त्यामध्ये हार्दिकनं पोलार्ड पुढच्या वर्षी गुजरातकडून खेळेल (Hardik Pandya on Pollard) अशी आशा व्यक्त केली आहे.

दमदार सुरूवात

गेली वर्षभर दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या हार्दिकनं या आयपीएलमध्ये जोरदार सुरूवात केली आहे. तो पहिल्यांदाच एखाद्या टीमची कॅप्टनसी करत आहे. हार्दिकनं आघाडीवर राहात गुजरातची कॅप्टनसी केली असून त्यानं त्याच्या टीमकडून आत्तापर्यंत सर्वात जास्त रन केले आहेत.

गुजरात टायटन्सही आत्तापर्यंत 10 पैकी 8 मॅच जिंकल्या आहेत. 16 पॉईंट्ससह ही टीम पॉईंट टेबलमध्ये अव्वल आहे. आता पहिल्याच प्रयत्नात ‘प्ले ऑफ’मध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना फक्त एका विजयाची गरज आहे. दुसरिकडं मुंबई इंडियन्ससाठी हा सिझन (IPL 2022) निराशाजनक ठरलाय. पहिल्या आठ मॅच गमावल्यानंतर त्यांचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. मुंबईनं रिटेन केलेल्या पोलार्डनं पहिल्या 9 मॅचमध्ये निराशा केली आहे.

Explained: सर्वांचा अंदाज चुकवत गुजरात टायटन्सनं यश कसं मिळवलं?

हार्दिकची इच्छा

हार्दिक पांड्याचं मुंबई इंडियन्सच्या सर्वच खेळाडूंशी विशेषत: कायरन पोलार्डशी (Kieron Pollard) खास नातं (Hardik Pandya on Pollard) आहे. या दोघांनी मिळून मुंबईला अनेक विजय मिळवून दिलेत. मैदानाच्या बाहेरही त्यांची खास केमेस्ट्री आहे. आता हे दोघंही वेगवेगळ्या आयपीएल टीममध्ये असले तरी त्यांच्यातील मैत्री कायम आह. ते एकमेकांच्या नियमित संपर्कात आहेत.

हार्दिकनं या व्हिडीओत पोलार्डला नुकत्याच केलेल्या एका मेसेजचा उल्लेख केला आहे. ‘मी पोलार्डला मेसेज केला आणि मजेत त्याला म्हंटलं की काय सांगावं कदाचित तू पुढच्या वर्षी गुजरात टायटन्सकडून खेळशील. ही माझी इच्छा आहे. पण, मला माहिती आहे की ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही.’ असं हार्दिकनं यावेळी सांगितलं.

आठवणींना उजाळा

हार्दिक पांड्यानं आयपीएल 2015 (IPL 2015) मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध 8 बॉलमध्ये 21 रनची आक्रमक खेळी केली होती. हार्दिकच्या आक्रमक खेळीमुळे मुंबईनं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 30 रन करत ती मॅच जिंकली होती. या खेळीनंतरच हार्दिकची मुंबई इंडियन्समधील जागा निश्चित झाली. हार्दिकनं ती खेळी आपल्यासाठी खूप महत्त्वाची असल्याचं या व्हिडीओत सांगितलं आहे. त्याचबरोबर आयपीएल 2015 मधील आठवणींनाही ही उजाळा दिला (Hardik Pandya on Pollard) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading