आयपीएल स्पर्धेतील सर्व सिझन खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉबिन उथप्पाचा (Robin Uthappa) समावेश होतो. कर्नाटककडून क्रिकेट कारकिर्द सुरू केलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूनं आजवर मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स या टीमकडून खेळला आहे. सध्या उथप्पा चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) सदस्य आहे. उथप्पानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आरसीबीकडून खेळत असताना डिप्रेशनमध्ये होतो (Uthappa on RCB Days) असा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाला उथप्पा?

टीम इंडियाचा खेळाडू आर. अश्विनच्या (R. Ashwin) YouTube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उथप्पानं त्याच्या आयपीएल स्पर्धेतील अनुभव सांगितले आहेत. आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये (IPL 2008) उथप्पा मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य होता. त्यानंतर 2009 साली त्याला मुंबई इंडियन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे ट्रेड करण्यात आले.

उथप्पानं त्यावेळी आपली आरसीबीमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, असं सांगितलं. ‘माझ्या वैयक्तिक आयुष्यात तेव्हा काही गोष्टी सुरू होत्या. त्यामुळे आरसीबीकडून पहिल्या सिझनमध्ये खेळताना मी संपूर्ण डिप्रेशनमध्ये (Uthappa on RCB Days) होतो. मी त्या सिझनमधील एकाही मॅचमध्ये चांगला खेळलो नाही. मला एका मॅचमधून वगळल्यानंतरच्या पुढच्या एकमेव मॅचमध्ये मी चांगली कामगिरी केली.

आपण या मॅचमध्ये काही तरी करण्याची गरज आहे, असा विचार मी तेव्हा केला होता. मी आयपीएलमध्ये ट्रान्सफर झालेल्या सुरूवातीच्या काही प्लेयर्सपैकी एक होतो. आयपीएल सिझन सुरू होण्याच्या महिनाभर आधी मला ही बातमी कळाली. त्यावेळी माझी सर्व कमिटमेंट ही मुंबई इंडियन्सशी होती. मी ट्रान्सफर पेपरवर स्वाक्षरी करायलाही नकार दिला होता. त्यावेळी मुंबई इंडियन्समधील एकानं मला प्लेईंग 11 मध्ये एकही मॅच खेळायला मिळणार नाही, ‘ असे सांगितल्याची माहिती उथप्पानं (Uthappa on RCB Days) दिली.

कशी होती कामगिरी?

रॉबिन उथप्पा 2009 आणि 2010 साली आरसीबीकडून आयपीएल खेळला. त्याने 2009 साली 15 मॅचमध्ये फक्त 170 रन केले. त्या सिझनमध्ये उथप्पानं फक्त एक हाफ सेंच्युरी झळकावली. 2010 साली मात्री उथप्पाच्या खेळात सुधारणा झाली. त्यानं त्या सिझनमधील 16 मॅचमध्ये 374 रन केले. यात 3 हाफ सेंच्युरींचा समावेश होता.

IPL 2022 : पहिल्याच मॅचमध्ये दिसली Old is Gold ची पॉवर!

CSK चा प्रमुख खेळाडू

रॉबिन उथप्पाला मागील सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून सीएसकेनं खरेदी केले. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) त्याला 2 कोटींमध्ये सीएसकेनं खरेदी केलंय. उथप्पानं मागील 2 मॅचमध्ये सीएसकेकडून ओपनिंग केली असून त्यामधील लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध त्यानं 27 बॉलमध्ये 50 रनची आक्रमक खेळी केली होती.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: