फोटो – सोशल मीडिया

आयपीएल स्पर्धेतील 8 टीमनं त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी (IPL 2022 Retention) जाहीर केली आहे. या यादीमध्ये अनुभवी खेळाडूंसोबतच तरुणांनाही प्राधान्य देण्यात आलं आहे. पुढील आयपीएल सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. त्याचबरोबर दोन नव्या टीम देखील दाखल होत आहेत. त्यामुळे पुढील आयपीएलमध्ये सर्व टीमचं चित्र बदलेलं असेल. हे चित्र कसं असणार याची एक झलक रिटेन्शनमध्ये दिसली. आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या 4 जोड्या आता एकत्र खेळणार नाहीत. त्यामुळे आगामी आयपीएल हे जोडी ब्रेकर्स (IPL 2022 Jodi Breakers) ठरणार हे स्पष्ट झालं आहे. या 4 जोड्या कोणत्या आहेत ते पाहूया

विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स (Virat Kohli – AB de Villiers)

विराट आणि एबी ही जागतिक क्रिकेटमधील दोन दिग्गजांची जोडी 2011 साली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) या टीममध्ये एकत्र आली. क्रिकेटचा तीन्ही प्रकार गाजवणारे आणि आपल्या देशाच्या टीमचे कॅप्टन असलेल्या या दोन दिग्गजांची मैफील आरसीबीमध्ये छान जमली. विराटसोबत डिव्हिलियर्सनं मनोसक्त फटकेबादी केली. तर अनुभवाने ज्युनिअर असूनही विराटला कॅप्टन म्हणून डिव्हिलियर्सनं भक्कम पाठिंबा दिला.

आरसीबीच्या (RCB) आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीत विराट आणि एबीडी हे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. विराट कोहलीनं आगामी सिझनपूर्वी आरसीबीची कॅप्टनसी सोडली असली तरी तो आरसीबी टीममध्ये कायम आहे. पण डिव्हलियर्सनं क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे विराट आणि डिव्हिलियर्सची जोडी आता आगामी काळात एकत्र (IPL 2022 Jodi Breakers) दिसणार नाही. आरसीबीसाठी एकत्र विजेतेपद मिळवता आले नाही, ही खंत या जोडीला नक्की असेल.

महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना (MS Dhoni – Suresh Raina)

आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या ऑक्शनमध्ये (IPL 2008) धोनी आणि रैना यांना चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) करारबद्ध केले. हे दोघे टीम इंडियातही एकत्र होते. पण, चेन्नईच्या यलो जर्सीमध्ये त्यांच्यातील केमिस्ट्री वेगळीच होती. सीएसकेच्या (CSK) बॅटींग ऑर्डरमधील तीन नंबरचा क्रमांक रैनानं कित्येक वर्ष सांभाळला. या क्रमांकावरून मॅचच्या गरजेनुसार भरपूर रन जमवले. धोनी आणि रैना यांनी फायनलमध्ये केलेल्या महत्त्वपूर्ण भागिदारीमुळेच 2010 साली सीएसकेला पहिले आयपीएल विजेतेपद मिळाले होते.  

चेन्नईच्या टीमकडून केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ हे नाव मिळाले. सीएसकेवरील बंदीमुळे ही जोडी दोन वर्ष विभक्त झाली होती. पण, 2018 साली बंदी संपल्यानंतर पुन्हा एकदा एकत्र आली. चेन्नईच्या फॅन्सनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. धोनीला थाला (Thala) तर रैनाला चिन्ना थाला (Chinna Thala) हे नाव त्यांनी दिले.

मागील वर्षी झालेल्या आयपीएल सिझनमध्ये रैनानं शेवटच्या क्षणी माघार घेतली. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नईनं आजवरची सर्वात निराशाजनक कामगिरी केली. या आयपीएलमध्ये रैना पुन्हा परतला, पण त्याला फॉर्म सापडला नाही. संपूर्ण स्पर्धेत ‘मिस्टर आयपीएल’ रैना कुठे दिसला नाही. सेमी फायनल आणि फायनलमध्ये रैनाला वगळण्याचा अशक्य वाटणारा निर्णय सीएसकेनं घेतला. तेव्हाच आगामी सिझनमध्ये रैना रिटेन होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. आता त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. ‘थाला’ धोनी सीएसकेकडून आणखी एक सिझन खेळण्यासाठी सज्ज झालेला असताना ‘चिन्ना थाला’ सुरेश रैना टीमच्या बाहेर (IPL 2022 Jodi Breakers) गेला आहे.

यारों का यार, IPL सुपरस्टार, तीन्ही प्रकारात योगदान देणारा कॅप्टनचा आधार

कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्या (Kieron Pollard – Hardik Pandya)

हार्दिक पांड्यानं 2015 साली आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) पदार्पण केले. त्यामुळे कायरन पोलार्डला त्याचा क्रिकेटमधला लहान भाऊ सापडला. हार्दिकही पोलार्डप्रमाणेच बॅटींग ऑल राऊंडर आहे. तो देखील पोलार्डसारखाच आक्रमक बॅटर. पोलार्ड आणि हार्दिक या दोघांमध्येही एका ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता आहे.

मुंबई इंडियन्ससाठी शेवटच्या ओव्हर्समध्ये ही जोडी एकत्र मैदानात अक्षरश: धुमाकूळ घालत असे. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये तोपर्यंत सोपं वाटणारं टार्गेट प्रतिस्पर्धी टीमच्या आवक्याच्या बाहेर नेण्याचं काम या जोडीनं केलं आहे. तसेच ही जोडी एकत्र असल्यानं कोणतंही टार्गेट सेफ नाही ही जाणीव प्रत्येक मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमना होती. हार्दिकचा आयपीएलमधील स्ट्राईक रेट हा 153.91 तर पोलार्डचा स्ट्राईक रेट हा 149.77 आहे. सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर सातत्यानं या पद्धतीचा आक्रमक खेळ करणारी जोडी हे मुंबई इंडियन्सचं मोठं बलस्थान होती.

हार्दिकच्या फिटनेसचा परिणाम त्याच्या खेळावर झाला. त्यानं बॉलिंग करणे कमी केले. आयपीएल 2021 मध्ये हार्दिकनं एकही ओव्हर बॉलिंग केली नाही. तसंच त्याला एकही हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. हार्दिकच्या या कामगिरीचा फटका मुंबई इंडियन्सला बसला. पोलार्डही यापूर्वी या फेजमधून गेला होता, पण तो लवकर सावरला. हार्दिकला जास्त वेळ लागला आहे. त्यामुळे या सिझनमध्ये हार्दिकला रिटेन न करण्याचा (IPL 2022 Jodi Breakers)  मोठा निर्णय मुंबई इंडियन्सनं घेतला आहे.

केएल राहुल आणि मयांक अग्रवाल (KL Rahul – Mayank Agarwal)

कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट गाजवणारी राहुल आणि मयांकची जोडी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज (Punjab Kings) या टीममध्ये एकत्र आली. या जोडीनं अनेकदा पंजाबला भक्कम सुरूवात करु दिली. पंजाबच्या इनिंगचा पाया रचला. पंजाबच्या अस्थिर टीममध्ये राहुलनंतरचं स्थिर नाव हे मयांकचं होतं. पस्परांबरोबर बराच काळ एकत्र खेळल्याचा फायदा त्यांना आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना झाला.

राहुल द्रविडच्या गावातील सेहवागला कन्फर्म जागेची प्रतीक्षा!

पुढील आयपीएल सिझनसाठी मयांक अग्रवालला पंजाबने रिटेन केले आहे. पण, केएल राहुलनं पंजाबची टीम सोडण्याचा निर्णय घेतला. राहुलला आता आयपीएलमधील नवी टीम ड्राफ्टमध्ये खरेदी करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील आयपीएलपूर्वी राहुल आणि मयांकची जोडी देखील तुटली (IPL 2022 Jodi Breakers) आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: