फोटो – ट्विटर

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 15 व्या सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) पूर्ण झालंय. या मेगा ऑक्शननंतर सर्वच टीमची नव्यानं रचना झाली आहे. अनेक खेळाडूंना नवी टीम मिळाली आहे. त्या खेळाडूंच्या टीममध्ये खेळण्याबाबतच्या प्रतिक्रिया आता येत आहेत. पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) स्पर्धेमध्येही याचे पडसाद उमटले आहेत. पीएसएलमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स हेल्सची (Alex Hales) कोलकाता नाईट रायडर्सनं निवड केली. आयपीएलमध्ये निवड होताच दुसऱ्याच दिवशी हेल्सनं पीएसएल स्पर्धा सोडली (Alex Hales Withdraw from PSL) आहे.

इंग्लंडचे दुर्लक्ष

इंग्लंडचा आक्रमक बॅटर असलेला अ‍ॅलेक्स हेल्स यापूर्वी आयपीएल 2018 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. त्याने त्या सिझनमधील 6 मॅचमध्ये 148 रन केले होते. वर्ल्ड कप 2019 पूर्वी (Cricket World Cup 2019) तो डोपिंगमध्ये सापडला होता. त्यानंतर त्याने इंग्लंड टीममधून जागा गमावली. तसंच मागील 3 सिझनमध्ये तो आयपीएलमध्येही खेळला नाही.

डोपिंग प्रकरणातील बंदी उठल्यानंतरही इंग्लंडनं त्याचा पुन्हा विचार केला नाही. हेल्सचा इंग्लंडनं समावेश केला नसला तरी तो लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधील दमदार बॅटर आहे. त्याने 70 वन-डेमध्ये 37.79 च्या सरासरीनं 2449 रन केले आहेत. यामध्ये 6 सेंच्युरी आणि 14 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे.

ड्रग्ज घेतल्यामुळे वर्ल्ड कप टीममधून झाली होती हकालपट्टी, आता ठोकली 51 बॉलमध्ये सेंच्युरी!

T20 क्रिकेटमधील त्याची कामगिरी ही आणखी जबरदस्त आहे. तो आयपीएलमध्ये 2018 नंतर खेळला नसला तरी जगभरातील अन्य सर्व लीगमध्ये त्याने क्षमता सिद्ध केलीय. 334 T20 मॅच खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. इतक्या मॅच खेळल्यानंतरही त्याचा स्ट्राईक रेट 146.30 आहे. त्याने या प्रकारात 5 सेंच्युरी आणि 57 हाफ सेंच्युरीसह 9371 रन केले आहेत.

T20 क्रिकेटचा मोठा अनुभव असलेल्या या आक्रमक ओपनरला कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) 1 कोटी 50 लाखांना खरेदी केले (Alex Hales Withdraw from PSL) आहे.

का सोडलं PSL?

हेल्स पीएसएलमधील इस्लामाबाद युनायटेड (Islamabad United) टीमकडून खेळत होता. त्यानं वैयक्तिक कारणांमुळे ही स्पर्धा सोडण्याचा निर्णय घेतला असून आमच्या त्याला शुभेच्छा आहेत, असा खुलासा इस्लामाबादच्या टीमनं केलं आहे. तर हेल्सनं बायो-बबलमधील थकव्यामुळे (bubble fatigue) हा निर्णय घेतल्याचा दावा पाकिस्तानच्या न्यूज चॅनेलनं केला आहे. हेल्स पीएसएलमधून बाहेर पडलेला इंग्लंडचा दुसरा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी बेन डकेटनं बायो-बबलच्या थकव्यामुळे ही स्पर्धा सोडली होती.

इस्लामाबादला धक्का

हेल्स स्पर्धेतून बाहेर पडल्याचा धक्का इस्लामाबाद युनायटेडला बसणार आहे. त्याने या स्पर्धेतील 7 मॅचमध्ये 42.50 च्या सरासरीनं 233 रन केले होते. इस्लामाबादच्या बॅटींगचा तो मोठा आधार होता. आता स्पर्धेतून त्याने माघार घेतल्यानं (Alex Hales Withdraw from PSL) या टीमची अडचण होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: