फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 (IPL 2022) ‘योग्य संधीची’ वाट बघणाऱ्या, टीममध्ये कमबॅक’ करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या खेळाडूंसाठी महत्वाचं आहे. पहिल्या मॅचमध्ये टेस्ट टीममधूंन वगळलेल्या अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) मॅच विनिंग खेळी केली तर भारतीय टीममध्ये आत बाहेर राहणाऱ्या उमेश यादवनं (Umesh Yadav) 2 विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला. त्यानंतर या सिझनमधील दुसऱ्या मॅचमध्ये आणखी एका एका खेळाडूनं मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरूद्ध दमदार कामगिरी केली आहे. तो खेळाडू आहे, चायनामन बॉलर कुलदीप यादव. गेल्या 3 वर्षांपासून फॉर्ममध्ये नसलेल्या कुलदीपवर दिल्ली कॅपिटल्सनं (Delhi Capitals) विश्वास दाखवत यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) खरेदी केले होते. दिल्लीच्या फ्रँचायझीनं दाखवलेला विश्वास कुलदीपनं सार्थ (Kuldeep Yadav vs Mumbai Indians) ठरवला.

कुलदीपच्या 3 विकेट्स

दिल्ली विरूद्धच्या मॅचमध्ये मुंबईची (Delhi Capitals vs Mumbai Indians) सुरूवात चांगली झाली होती. मुंबईनं पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 53 रन केले. कुलदीप यादव बॉलिंगला आल्यावर मुंबईचा रनरेट घसरला. बॅटर्सवर दबाव वाढला. मुंबईचे बॅटर कुलदीपविरूद्ध संघर्ष करत होते. कुलदीपनं रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग आणि कायरन पोलार्ड या 3 प्रमुख विकेट्स घेत मुंबईचं 200 रनचं स्वप्न धुळीस मिळवलं

आत्मविश्वास मिळवुन देणारा स्पेल

कुलदीपनं 4 ओव्हर्समध्ये फक्त 18 रन देत 3 विकेट्स (Kuldeep vs Mumbai Indians) घेतल्या. या स्पेलमुळे कुलदीपन टीममधील जागा भक्कम केली आहे. कुलदीपचे केकेआरकडून (KKR) खेळताना मागील 3 सीझन फार वाईट गेले होते. या काळात त्याच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. 2019 आणि 2020 साली झालेल्या आयपीएलमध्ये कुलदीप अनुक्रमे 9 आणि 4 मॅचेस खेळला. या 13 मॅचमध्ये त्यानं फक्त 5 विकेट्स घेतल्या होत्या.

केकेआरमध्ये वरुण चक्रवर्तीचा (Varun Chakravarthy)  उदय झाल्याने त्यांना कुलदीपची गरज उरली नाही. त्यांनी कुलदीपला बेंचवरच बसवले. 2021 मध्ये तर तो एकही मॅच खेळला नाही. या खराब कामगिरीमुळे त्यानं टीम इंडियाच्या लिमिटेड ओव्हर्स टीममधील जागाही गमावली.

कोचच्या रागातून बदलली बॉलिंग अ‍ॅक्शन, टीम इंडियाच्या Hat-trick King ला आत्मविश्वासाची गरज

नव्या इनिंगची गरज

कुलदीप यादव 2019 च्या वर्ल्ड कपनंतर आंतराराष्ट्रीय क्रिकेट फारसा खेळलाच नाही. रवी शास्त्रींनी विदेशातील नंबर 1 स्पिनर असं कुलदीपचं वर्णन केले होते. पण त्याला नंतर प्लेईंग 11 मध्ये संधी मिळालीच नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो होता. खेळाडू एकापाठोपाठ जखमी होत असतानाही कुलदीपला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. रोहित शर्मा कॅप्टन झाल्यावर ही परिस्थिती बदलेल ही अपेक्षा आहेच पण त्यानं हा आयपीएल सिझन गाजवला (Kuldeep vs Mumbai Indians) तर ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) तो दावेदारी सादर करू शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: