फोटो – ट्विटर

26 मार्चपासून सुरू होणारा आयपीएलचा 15 वा सिझन (IPL 2022) अनेक बाबतीमध्ये वेगळा असणार आहे. या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) डग आऊटमध्ये सुरेश रैना (Suresh Raina) नसेल. रैनाशिवाय चेन्नईची चर्चा अजूनही सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच लसिथ मलिंगा (Lasith Malinga) यंदा पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सशिवाय अन्य टीमच्या डग-आऊटमध्ये दिसणार आहे. मलिंगा आणि मुंबईची साथ आता सुटलीय. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबई इंडियन्सकडून खेळणारा मलिंगा टीमला निरोप देताना चांगलाच भावुक (Malinga on Mumbai Indians) झाला.

कुठे गेला मलिंगा?

मलिंगा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी बॉलर आहे. तो 2009 ते 2019 या कालावधीमध्ये फक्त मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या एकाच टीमकडून खेळला. या कालावधीमध्ये त्याने 122 मॅचमध्ये 170 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सच्या आयपीएल विजेतेपदामध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे. आयपीएल 2019 च्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) आऊट करत त्याने मुंबईच्या चौथ्या आयपीएल विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते.

मलिंगा आता राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) फास्ट बॉलिंग कोच झाला आहे. राजस्थाननं तशी घोषणा देखील केलीय. श्रीलंकेचा माजी कॅप्टन कुमार संगकारा (Kumar Sangakkara) राजस्थानचा हेड कोच आहे. मलिंगा आता संगकारासोबत काम करेल.

काय म्हणाला मलिंगा?

मलिंगानं मुंबई इंडियन्सचा (Malinga on Mumbai Indians) निरोप घेताना भावुक प्रतिक्रिया दिली आहे. ‘मुंबई इंडियन्सच्या मॅच विनिंग कॉम्बिनेशन आणि मॅनेजमेंटमध्ये गेल्या 13 वर्षात मला मिळालेला अनुभव अमुल्य आहे. माझ्या नव्या कोचिंग जबाबदारीसाठी याचा फायदा होईल. पुढील सिझनसाठी खूप खूप शुभेच्छा. कायमचा #Onefamily  सदस्य’ असे मलिंगाने म्हंटले.

#Onefamily हा मुंबई इंडियन्सकडून सोशल मीडियावरील नियमित वापरला जाणारा हॅशटॅग आहे. तो हॅशटॅग वापरत मलिंगानं मुंबईच्या फॅन्सचं (Malinga on Mumbai Indians) मन जिंकलं आहे. त्याचबरोबर टीमबद्दल कुतज्ञता देखील व्यक्त केलीय. मलिंगच्या या प्रतिक्रियेला मुंबई इंडियन्सनंही उत्तर दिलंय.

Mumbai Indians Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची मुंबई इंडियन्स? काय खास, काय डेंजर?

मलिंगाची नवी टीम

राजस्थान रॉयल्सनं आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनमध्ये विजेतेपद मिळवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर या टीमला विजेतेपद सोडाच पण कधीही फायनलमध्ये प्रवेश करता आलेला नाही.

कुमार संगकाराची हेड कोच म्हणून नियुक्ती केल्यानंतर राजस्थाननं टीमची बांधणी अगदी गांभिर्यानं केली आहे. यंदाच्या ऑक्शनमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे इंग्लंडच्या खेळाडूंच्या मागे धावाधाव केलेली नाही. राजस्थानकडं ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध कृष्णा ही फास्ट बॉलर्लची जोडी आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा नॅथन कुल्टर नाईलही टीममध्ये आहे. या सर्वांनाच मलिंगाच्या अनुभवाचा फायदा होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: