फोटो – बीसीसीआय, आयपीएल

टीम इंडियाचा फास्ट बॉलर दीपक चहरला (Deepak Chahar) आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) रेकॉर्डब्रेक किंमत मिळाली आहे. दीपकला चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या त्याच्या जुन्या टीमनं 14 कोटींना खरेदी केले आहे. दीपक आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा भारतीय फास्ट बॉलर आहे. तो चेन्नई सुपर किंग्सचाही ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. दीपक चहरला चेन्नईनं सर्वाधिक रक्कम देण्याची 3 कारणं (3 Reasons for Deepak Chahar Cost) आहेत.

आपल्या खेळाडूंसाठी वाट्टेल ते…

आयपीएल मेगा ऑक्शन यानंतर कधी होणार याची कल्पना नाही. त्यामुळे यंदा चेन्नई सुपर किंग्स तरूण खेळाडूंना प्राधान्य देईल, असा अंदाज होता. पण, चेन्नईनं त्यांच्या जुन्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठीच यंदा पर्स रिकामी केली.

आयपीएल 2021 फायनल (IPL 2021 Final) खेळलेले 11 पैकी 8 खेळाडू पुन्हा एकदा चेन्नईकडून खेळणार आहेत. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) यांना खरेदी करण्यासाठी चेन्नईनं प्रयत्न केले. चेन्नईनं त्यांच्या टीम कॉम्बिनेशनमध्ये योग्य ठरतील अशाच खेळाडूंना पुन्हा निवडले आहे. त्याच योजनेतून त्यांनी दीपक चहरला पुन्हा खरेदी (3 Reasons for Deepak Chahar Cost) केले आहे.

मॅचविनर बॉलर

दीपक चहरला 2018 साली 80 लाखांमध्ये चेन्नईनं खरेदी केले होते. त्यानंतर गेल्या 4 वर्षांमध्ये त्याने टीमसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 2021 साली चेन्नईकडून खेळलेल्या बॉलर्सचा विचार केला तर तो आयपीएल इतिहासातील चेन्नईचा तिसरा यशस्वी बॉलर आहे. ‘पॉवर प्ले’ मध्ये विकेट घेण्याची त्याची क्षमता त्याने सिद्ध केली आहे.

आयपीएल 2021 मध्ये पंजाब किंग्ज विरूद्ध मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन आणि दीपक हुड्डा यांना त्याने पॉवर प्लेमध्ये आऊट केले होते. तर कोलकाता विरूद्धच्या मॅचमध्ये शुभमन गिल, नितिश राणा, इयॉन मॉर्गन आणि सुनील नरीन यांना परत पाठवत मॅचचा निकाल निश्चित केला होता.

चहरनं टीम इंडियाकडून मिळालेल्या मर्यादीत संधीमध्येही चहरनं सातत्याने विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे ‘मॅच विनर’ खेळाडू म्हणून चेन्नईनं चहरवर विश्वास दाखवला (3 Reasons for Deepak Chahar Cost) आहे.

ऑल राऊंड क्षमता

दीपक चहरनं चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आजवर फक्त 79 रन काढले आहेत. मात्र ही आकडेवारी फसवी आहे. त्याने गेल्या काही वर्षात त्याच्या बॅटींगवर बरेच कष्ट घेतले आहेत. टीम इंडियाकडून खेळताना त्याने आपण उत्तम बॅटींग करू शकतो हे दाखवून दिलं आहे. श्रीलंकेविरूद्ध मागच्या वर्षी झालेल्या वन-डेमध्ये त्याने हाफ सेंच्युरी झळकावत टीमला विजय मिळवून दिला.

दीपक चहरचे करिअर ‘प्रकाश’मान करणारी इनिंग!

यंदा दक्षिण आफ्रिकेतही त्याने त्याच पद्धतीनं आणखी एक हाफ सेंच्युरी झळकावत भारताला विजयाच्या अगदी जवळ आणले होते. स्पिन बॉलिंग खेळण्याची चांगली क्षमता दीपकनं विकसित केली आहे. तो चेन्नईच्या टॉप 7 मधील उत्तम बॅटर होण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे.

चेन्नईनं 10 वर्षांपूर्वी रवींद्र जडेजाच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्याला 9 कोटी 75 लाख ही त्या सिझनमधील विक्रमी किंमत देऊन खरेदी केले होते. यंदा त्यांनी त्याच पॅटर्ननं चेन्नईनं यंदा चहरची निवड (3 Reasons for Deepak Chahar Cost) केली आहे.. मागील 10 वर्षात जडेजाचा खेळात झालेली सुधारणा आणि त्याचा चेन्नईला झालेले फायदा आपण पाहिलाय. आगामी काळात चहरही त्याच प्रकारची पुनरावृत्ती करू शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading