फोटो – बीसीसीआय, आयपीएल

IPL 2022 मेगा ऑक्शनसाठी (IPL 2022 Mega Auction) 590 खेळाडूंची नावं शॉर्ट लिस्ट झाली आहेत. बंगळुरूमध्ये होणाऱ्या ऑक्शनसाठी 10 टीम त्यांच्या कमाल 217 रिक्त जागांसाठी या खेळाडूंवर बोली लावणार आहे. जगातील सर्वात टफ आणि सर्वात प्रतिष्ठेच्या T20 लीगमध्ये खेळाडूंची निवड वेगवेगळ्या कसोटींच्या आधारावर होणार आहे. यामध्ये विकेट किपर आणि बॅटर ही सर्व टीमसाठी उपयुक्त अशी जागा आहे. स्टम्पच्या मागे संरक्षण करण्योबतच स्टम्पच्या पुढे रन करणाऱ्या 4 विकेट किपर बॅटर्सना यंदाच्या ऑक्शनमध्ये (IPL 2022 Wicket Keeper Batter) मोठी किंमत मिळणार आहे.

इशान किशन (Ishan Kishan)

या आयपीएल ऑक्शनमध्ये सर्वाधिक किंमत मिळवणाऱ्या पहिल्या 3 खेळाडूंमध्ये इशान किशनचा समावेश होऊ शकतो. इशान हा डावखुरा पॉवर हिटर बॅटर आहे. कोणत्याही क्रमांकावर तो बॅटींग करू शकतो. मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) गेली काही सिझन त्याचा अत्यंत कुशलतेनं वापर केला आहे.

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये त्याने सर्वाधिक 30 सिक्स लगावले होते. या कामगिरीमुळेच इशानची टीम इंडियात निवड झाली. इशानने मागील आयपीएलमध्येही सनरायझर्स विरुद्ध 16 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी झळकावली होती. मुंबई इंडियन्सच्या संभाव्य रिटेनरच्या यादीत त्याचे नाव आघाडीवर होते. पण, अखेर सूर्यकुमार यादवं बाजी मारली. इशानलही त्याला ऑक्शनमध्ये मिळू शकणाऱ्या मोठ्या किंमतीची कल्पना असावी त्यामुळेच त्याने लखनौ किंवा अहमदाबाद टीमसोबत करारबद्ध न होता आयपीएल ऑक्शनमध्ये उतरण्याचा (IPL 2022 Wicket Keeper Batter) निर्णय घेतला.

IPL 2022 Mega Auction: क्रीडा मंत्र्यांसह 590 खेळाडू इन, वाचा मेगा ऑक्शनच्या 5 मोठ्या गोष्टी

क्विंटन डी कॉक (Quinton De Kock)

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) विश्वासू ओपनिंग पार्टनरचा मुंबई इंडियन्सचा शोध डी कॉकवर संपला होता. आयपीएल 2019 आणि 20  या सलग दोन सिझनमध्ये त्याने 500 पेक्षा जास्त रन केले होते. मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदात त्याच्या या कामगिरीचा मोठा वाटा होता.

डी कॉक हा व्हाईट बॉल क्रिकेटमधील सध्याचा सर्वात विश्वासू विकेट किपर आहे. त्याचबरोबर ओपनर देखील आहे. भारताविरूद्धच्या सीरिजमध्ये रन करत त्याने फॉर्ममध्ये असल्याचंही दाखवून दिलंय. टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झालेला डी कॉक आयपीएलसाठी फ्रेश मुडमध्ये आणि पूर्णवेळ उपलब्ध असेल. त्यामुळे त्याला यंदा मोठी बोली लागणार हे नक्की आहे.

जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow)

सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेले बेअरस्टोला खरेदी करण्यासाठी यंदा आयपीएल टीममध्ये जोरदार चुरस रंगणार आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये 142.19 च्या सरासरीनं 1038 रन केले आहेत. आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मोजक्या टॉप ऑर्डर विदेशी खेळाडूमध्ये बेअरस्टोचा समावेश (IPL 2022 Wicket Keeper Batter) आहे. तो फास्ट तसंच स्पिन दोन्ही बॉलिंग उत्तम खेळतो.

बेअरस्टो उत्तम फिल्डर देखील असून टीमच्या गरजेनुसार निव्वळ बॅटर म्हणून अंतिम 11 मध्ये खेळण्याचीही त्याची योग्यता आहे.

IPL 2022: SRH चे अच्छे दिन येणार! 22 हजार रन करणारा दिग्गज ‘ऑरेंज आर्मी’त दाखल

केएस भरत (KS Bharat)

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक वर्ष गाजवल्यानंतर भरतला मागच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) संधी दिली. आवेश खानच्या शेवटच्या बॉलवर सिक्स लगावत भरतनं आरसीबीला सनसनाटी विजय मिळवून दिला होता. भरतकडे मिडल ऑर्डरमध्ये कोणत्याही नंबरवर परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारचे शॉट्स असून तो सेफ विकेट किपर देखील आहे. भारतीय विकेट किपरचा उत्तम पर्याय भरतच्या रूपाने उपलब्ध आहे. त्यामुळे भरतला यंदा चांगला भाव (IPL 2022 Wicket Keeper Batter) मिळणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: