फोटो – सोशल मीडिया

आयपीएल स्पर्धेच्या 15 व्या सिझनसाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाला (IPL 2022 Mega Auction) आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यंदा 8 नाही तर 10 टीम सहभागी होणार आहेत. या 10 टीम त्यांच्याकडील कमाल 217 जागांसाठी 590 खेळाडूंमधून निवड करणार आहेत. त्यामधील महाराष्ट्रातील 5 खेळाडूंवर या ऑक्शनमध्ये (Maharashtra in IPL 2022 Auction) मोठी बोली लागणार आहे.

शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)

पालघर एक्स्प्रेस शार्दुल ठाकूर यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडं (CSK) होता. IPL 2020 मध्ये 10 विकेट्स घेणाऱ्या शार्दुलनं मागील आयपीएलमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या. गेल्या वर्षभरात बॅट आणि बॉल दोन्हीमध्येही शार्दूलनं कमालीची सुधारणा केली आहे.

शार्दुलचा सध्याचा फॉर्म पाहाता तो कोणत्याही आयपीएल टीमच्या Playing11 मध्ये सहज फिट होतो. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यंदा ऑक्शनमध्ये नाही. त्यामुळे शार्दुलला खरेदी करण्यासाठी सर्व आयपीएल टीम त्यांची पर्स रिकामी (Maharashtra in IPL 2022 Auction) करणार आहेत.

असा घडला ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर!

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer)

मुंबईकर श्रेयस दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) टीमचा माजी कॅप्टन आहे. यावर्षी दिल्लीनं ऋषभ पंतला (Rishabh Pant) कॅप्टनपदी ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं तो दिल्लीपासून वेगळा झाला. अहमदाबाद आणि लखनौ टीमशीही त्याची बोलणी यशस्वी झाली नाहीत. त्यामुळे श्रेयस आता तब्बल 7 वर्षांनी ऑक्शनमध्ये उपलब्ध  आहे.

मिडल ऑर्डरमधील भक्कम आधारस्तंभ तसंच संभाव्य कॅप्टन म्हणून श्रेयसकडं पाहिलं जात आहे. आयपीएलमधील आरसीबी, केकेआर आणि पंजाब किंग्ज या 3 टीमना कॅप्टनचा शोध आहे. या टीम श्रेयससाठी पैशांची थैली रिकामी करू शकतात. श्रेयस अय्यरला टीममध्ये घेण्यासाठी आरसीबीनं 20 कोटी रूपये बाजूला (Maharashtra in IPL 2022 Auction) ठेवले असल्याचा दावा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने केला आहे.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)

डोंबिवलीकर अजिंक्य आता मुंबईत स्थिरावला आहे. अजिंक्य गेली अनेक वर्ष टीम इंडियाच्या लिमिटेड ओव्हर्सच्या टीममध्ये नाही. खराब फॉर्ममुळे त्याची टेस्ट टीममधील जागा देखील धोक्यात आली आहे. तरीही त्याचा अनुभव पाहाता त्याच्यावर आयपीएल टीम बोली लावतील. कोणत्याही टीमच्या बॅटींग ऑर्डरमध्ये अँकरचा रोल अजिंक्य उत्तम पद्धतीने करू शकतो. तसेच त्याची कॅप्टनसी देखील उत्तम आहे. त्यामुळे देखील काही टीम त्याचा विचार करतील,

अक्षय कर्णेवार (Akshay Karnewar)

यवतमाळ जिल्ह्यातील अक्षयनं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील (Syed Mushtaq Ali Trophy 2021) मॅचमध्ये त्याच्या कोट्यातील सर्वच्या सर्व 4 ओव्हर्स मेडन टाकल्या होत्या. त्यानं यंदाच्या मुश्ताक अली स्पर्धेत 8 मॅचमध्ये 4.34 च्या इकोनॉमी रेटनं 13 विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही हाताने बॉलिंग करू शकणाऱ्या दुर्मिळ गटातील अक्षय हा बॉलर आहे. तो यंदाच्या ऑक्शनमध्ये फक्त 20 लाखांच्या गटात आहे. विदेशी खेळाडूंना फारसा माहिती नसणारा अक्षयला काही आयपीएल टीमच्या पथकाने नक्कीच हेरून ठेवले (Maharashtra in IPL 2022 Auction) असेल. लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅटींग ही अक्षयची आणखी एक जमेची बाजू.

राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar)

आयपीएल ऑक्शनमधील सर्वच टीम मॅनेजमेंटचं अंडर 19 वर्ल्ड कपवर (Under 19 World Cup 2022) बारीक लक्ष आहे. त्याचा मोठा फायदा तुळजापूरचा फास्ट बॉलर राजवर्धनला होणार आहे. अंडर 19 वर्ल्ड कप टीममधील राजवर्धनला सर्वात जास्त बोली लागेल असा अंदाज टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर. अश्विननं (R. Ashwin) व्यक्त केला आहे.

‘मराठवाडा एक्स्प्रेस’ 6,6,6…सह गाजवला वर्ल्ड कप, 6 बॉलमध्ये काढले 34 रन! VIDEO

140 किलोमीटर पेक्षा जास्त वेगाने बॉलिंग आणि लोअर ऑर्डरमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं बॅटींग या T20 टीमला अगदी हव्या असणाऱ्या गटात राजवर्धन येतो. त्याच्यातील गुणवत्तेचा वापर करण्यासाठी आयपीएल टीम राजवर्धनवर चांगली बोली लावणार आहेत. 30 लाखांची बेस प्राईज असलेला हा तुळजापूरचा मुलगा (Maharashtra in IPL 2022 Auction) आयपीएल ऑक्शनमध्ये करोडपती होणार हे नक्की.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

    

error: