फोटो – ट्विटर

आयपीएल 2022 स्पर्धेच्या मेगा ऑक्शनचे (IPL 2022 Mega Auction) काऊंटडाऊन सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या ऑक्शनमध्ये एकूण 10 टीम सहभागी होणार आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि लखनौ या दोन शहरांच्या टीमचा पहिल्यांदा समावेश असेल. या दोन नव्या टीमना ऑक्शनपूर्वी 3 खेळाडू निवडण्याची संधी आहे. त्यानुसार अहमदाबाद फ्रँचायझीने 3 खेळाडू (Ahmedabad Franchise 3 Players) निश्चित केले आहेत. यामध्ये खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येमुळे टीम इंडियापासून बाहेर असणाऱ्या हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) फायदा झाला असून त्याचा पगार वाढला आहे.

काय आहेत नियम?

आगामी आयपीएल स्पर्धेत 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सर्व टीमची नव्या रचना आगामी ऑक्शनमध्ये होईल. या ऑक्शनपूर्वी 8 जुन्या टीमना जास्तीत जास्त 4 खेळाडू रिटेन करण्याची सूट बीसीसीआयने दिली होती. या नियमानुसार 8 टीमने एकूण 27 जणांना रिटेन केले आहे. त्या सर्वांची नावं यापूर्वीच जाहीर झाली आहेत.   

अहमदाबाद आणि लखनौ या दोन शहरांच्या टीमना ड्राफ्टच्या माध्यमातून 3 खेळाडू निवडण्याची परवानगी बीसीसीआयने दिली आहे. या टीम 3 खेळाडूंना (परदेशी खेळाडूची कमाल मर्यादा 1) आयपीएल ऑक्शनपूर्वी करारबद्ध करता येणार आहे. दोन्ही टीमना ड्राफ्टमधील खेळाडूंची नावं जाहीर करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी आहे. त्यापूर्वी CVC ग्रुपच्या मालकीच्या अहमदाबाद टीमने 3 खेळाडू निश्चित (Ahmedabad Franchise 3 Players) केले आहेत.

IPL 2022 Retention: 8 टीम कुणाला रिटेन करणार हे ठरलं! बड्या नावांसह तरुण खेळाडूंनाही संधी

हार्दिकचा पगार वाढला

‘इएसपीएन क्रिकइन्फो’या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हार्दिक पांड्या (Hardik Pandya), राशिद खान (Rashid Khan) आणि शुभमन गिल (Shubman Gill) या तीन खेळाडूंना अहमदाबादची टीम ड्राफ्टमधून करारबद्ध करणार आहे. हार्दिक आणि राशिद खान यांना प्रत्येकी 15 कोटी तर शुभमन गिलला 7 कोटींची रक्कम देऊन करारबद्ध करण्यात येईल.

हार्दिक पांड्या यापूर्वी मुंबई इंडियन्स टीमचा सदस्य होता. त्याचा मुंबई इंडियन्समधील वार्षिक पगार हा 11 कोटी होता. त्याला अहमदाबादमध्ये 4 कोटींची पगारवाढ मिळणार आहे. हार्दिक गुजरातचाच खेळाडू असून या स्टार ऑल राऊंडरला कॅप्टन करण्याचा अहमदाबाद टीमचा (Ahmedabad Franchise 3 Players) विचार आहे.

टीम इंडियाचे माजी हेड कोच गॅरी कस्टर्न या टीमचे मेंटॉर असतील. माजी फास्ट बॉलर आशिष नेहरा हेड कोच तर इंग्लंडचा माजी बॅटर विक्रम सोळंकी टीम डायरेक्टर असेल. कस्टर्न-नेहरा-सोळंकी ही त्रिकूट दुसऱ्यांदा कोचिंग स्टाफमध्ये एकत्र येणार आहे. यापूर्वी हे त्रिकूट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होते.

सुपरस्टार राशिदचा समावेश

T20 क्रिकेटमधील सुपर स्टार असलेल्या राशिद खानला सनरायझर्स हैदराबादने (SRH) सर्वप्रथम 2017 साली 4 कोटींमध्ये करारबद्ध केले होते. त्यानंतर त्याला 2018 साली 9 कोटींमध्ये रिटेन करण्यात आले. राशिद हैदराबाद टीमचा भाग झाल्यापासून सर्व 76 मॅच खेळला असून त्याने 6.33 च्या इकोनॉमी रेटनं 93 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या 5 वर्षांमधील आयपीएमध्ये फक्त जसप्रीत बुमराहनं (104) राशिदपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

राशिद आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आर्थिक करारावरून मतभेद झाल्यानं त्याला रिटेन न करण्याचा निर्णय हैदराबादच्या टीमने घेतला होता. आता आगामी आयपीएलमध्ये राशिद अहमदाबादकडून खेळताना (Ahmedabad Franchise 3 Players) दिसेल.

शुभमन गिल युवा चेहरा

अंडर 19 वर्ल्ड कपमधून (U19 World Cup 2018) प्रकाशात आलेल्या शुभमन गिलला कोलकाता नाईट रायडर्सने यापूर्वी 1 कोटी 80 लाखांना करारबद्ध केले होते. गिल केकेआरच्या कोअर टीमचा सदस्य होता. या आयपीएलपूर्वी केकेआरनं गिलला रिटेन न करत सर्वांनाच धक्का दिला.

22 वर्षांचा गिल टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा सदस्य आहे. तसेच त्याला भविष्यातील सुपरस्टार मानले जाते. गिलला करारबद्ध करत अहमदाबाद टीमनं भविष्यासाठी गुंतवणूक (Ahmedabad Franchise 3 Players) केली आहे.

U19 World Cup: कोरोनामुळे वडील गेले, पण जिद्द नाही… तुळजापूरच्या पोरावर जग जिंकण्याची जबाबदारी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: