
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) ही आयपीएल ऑक्शनसाठी योग्य टीम नाही. त्यांना ऑक्शनमध्ये काय सुरू आहे, याचं फार देणं-घेणं नसतं. जुने प्लेयर्स परत घेणे हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. आयपीएल 2021 फायनल खेळलेले 11 पैकी 8 प्लेयर्स पुन्हा एकदा चेन्नईत परत (CSK 2022 Squad Analysis) आलेत. अगदी बेंचवर बसून मागील सिझनमधील आंताक्षरी पूर्ण करण्यासाठी त्यांनी मिचेल स्टँनर, नारायण जगदीशन यांना परत टीममध्ये घेतलं आहे.
सर्व तेच आहे, हे खास आहे…
चेन्नईनं आयपीएल ऑक्शनपूर्वी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मोईन अली (Moeen Ali) यांना रिटेन केले. त्यानंतर त्यांनी पहिल्या दिवशी दीपक चहरला (Deepak Chahar) खरेदी करण्यासाठी 14 कोटी रूपये मोजले. चहर हा सीएसकेनं खरेदी केलेला सर्वात महागडा बॉलर ठरला आहे.शार्दुलची अनुपस्थिती, ब्राव्होचा उतरणीला आलेला फॉर्म आणि फिटनेस पाहाता तो आता टीमचा प्रमुख फास्ट बॉलर असेल. त्याचबरोबर त्याला आता बॅटींगमध्येही अधिक रोल मिळणार आहे.
सीएसकेनं चहरनं अंबाती रायुडूवर मोठा विश्वास दाखवला आहे. मिडल ऑर्डरमध्ये कोणत्याही नंबरवर परिस्थितीप्रमाणे खेळण्याची त्याची क्षमता आहे. आयपीएल टीमला चॅम्पियन बनवण्यात नेहमीच त्याच्या बॅटींगचे योगदान आहे. यंदाचे आयपीएल मुंबईत होणार आहे. तेथील पिचवर त्याचा अनुभव फायदेशीर (CSK 2022 Squad Analysis) ठरेल. त्याचबरोबर ड्वेन ब्राव्होवरील सीएसकेचा विश्वास अद्याप कायम आहे.
IPL 2022 Mega Auction: दीपक चहरला चेन्नईनं सर्वाधिक रक्कम मोजण्याची 3 कारणं
नव्या खेळाडूंची एन्ट्री
फाफ ड्यू प्लेसिसची (Faf Du Plessis) अनुपस्थिती चेन्नईला नक्कीच जाणवणार आहे. फाफ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये धोनीच्या कॅप्टनसीमध्ये खेळणार नाही. तो मागील आयपीएल विजेतेपदामधील महत्त्वाचा खेळाडू होता. न्यूझीलंडचा डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) हा एक चांगला पर्याय सीएसकेनं फाफसाठी निवडलाय. कॉनवेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म चांगला आहे. तो आणि ऋतुराज ही ओपनिंग जोडी आणि आक्रमक मोईन अली ही दमदार टॉप ऑर्डर चेन्नईकडे आहे.
शार्दुल ठाकूर सीएसकेच्या टीममध्ये नाही. त्याच्या जागेवर शिवम दुबे हा मुंबईकर सीएसकेकडे आला आहे. शिवम हा बॅटींग ऑल राऊंडर आहे. त्याला आजवर आयपीएलमध्ये फार चमकदार कामगिरी करता आलेली नाही. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये आणि सीएसकेच्या सिस्टममध्ये त्याची गुणवत्ता किती बहरते हे पाहावं लागेल.
ख्रिस जॉर्डन आणि ड्वेन प्रिस्टोरियस हे वास्तविक दोन नवे ब्राव्हो चेन्नईनं निवडले आहेत. ब्राव्हो फेल गेला किंवा फिटनेसमुळे बाजूला झाला तर त्याची जागा हे दोघं घेऊ शकतात.
जोश हेजलवूड यंदा टीममध्ये नसला तरी त्याची जागा घेण्यासाठी अॅडम मिल्नेची सीएसकेनं निवड केली आहे. न्यूझीलंडचा हा फास्ट बॉलर 150 किमी/तास वेगाने बॉलिंग करू शकतो. चहर आणि मिल्ने ही सीएसकेचे ओपनिंग फास्ट बॉलर (CSK 2022 Squad Analysis) असतील. स्पिन बॉलिंगमधील वैविध्य वाढवण्यासाठी प्रशांत सोळंकी आणि महेश तीक्षणा यांना सीएसकेनं खरेदी केले आहे.
सर्व तेच आहे, हाच पेच आहे
सीएसकेची टॉप ऑर्डर चांगली असली तरी मिडल ऑर्डरमधील खेळाडूंना सध्या क्रिकेटचा फार सराव नाही. उथप्पा, रायुडू आणि धोनी ही मिडल ऑर्डर सीएसकेला अडचणीची ठरू शकते. त्यातच रवींद्र जडेजा नोव्हेंबर 2021 नंतर क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे बॅटींग ही सीएसकेची मोठी समस्या आहे.
सीएसकेनं चार वर्षांपूर्वी निवडलेल्या टीमपेक्षा यंदाची एकूण टीम अधिक तरूण आहे. कोअर टीमचं वय आणखी वाढले आहे. त्यामधील बहुतेक जण क्रिकेटपासून दूर आहेत. रवींद्र जडेजा हा सर्व मॅच खेळणार हे स्पष्ट असूनही त्यांनी मिचेल सँटनर या डावखुऱ्या स्पिनरची पुन्हा निवड करून विदेशी खेळाडूची जागा अडवली आहे. त्याचबरोबर डेथ बॉलिंगमध्ये ब्राव्होचा टच हरपलाय. जॉर्डन विश्वासू नाही. तर प्रिस्टोरियस भारतामध्ये फारसा खेळलेला नाही. त्यामुळे डेथ बॉलिंग ही देखील धोनीची डोकेदुखी (CSK 2022 Squad Analysis) ठरू शकते.
Mumbai Indians Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची मुंबई इंडियन्स? काय खास, काय डेंजर?
रैना बीत गयी, धोनी मॅजिकवर विश्वास
चेन्नई सुपर किंग्सनं त्यांचा ‘चिन्ना थाला’, सर्वात यशस्वी खेळाडू सुरेश रैनाला (Suresh Raina) परत घेतले नाही. रैनाशिवाय सीएसके आता खेळणार आहे. मागील आयपीएलमधील खराब फॉर्म, नियमित क्रिकेटचा हरवलेला टच आणि फास्ट बॉलिंसमोर उडणारा गोंधळ या सर्व गोष्टी रैनाच्या विरोधात गेल्या आहेत. त्यामुळे आता सुरेश रैनाशिवाय चेन्नई सुपर किंग्स पाहण्याची सवय क्रिकेट फॅन्सना करावी लागेल.
रैना आता सीएसकेमध्ये नाही. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनीही (कदाचित) सीएसकेसोबत या शेवटच्या वर्षी मैदानात उतरेल. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये खेळणे ही अनेक खेळाडूंची इच्छा असते. सीएसके मॅनेजमेंटचाही धोनीवर मोठा विश्वास आहे. टीमच्या निवडीत त्याचाच शब्द फायनल असतो. तो स्वत: बॅटर म्हणून फार कमाल करत नाही. पण, कॅप्टन म्हणून खेळाडूंकडून सर्वोत्तम खेळ करून घेण्याची त्याची क्षमता आहे. त्याचा अनुभव आणि कोणत्याही गोंधळात शांत राहण्याची वृत्ती यामुळे धोनी या टीमनं आणखी एकदा मॅजिक दाखवेल अशीच सर्व सीएसके फॅनची नेहमीप्रमाणे अपेक्षा (CSK 2022 Squad Analysis) आहे.
Chennai Super Kings Squad for IPL 2022
चेन्नई सुपर किंग्सची टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, ड्वेन ब्राव्हो, अंबाती रायुडू, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम असिफ, तुषार देशपांडे, शिवम दुबे, महेश तीक्षणा, डेव्हान कॉनवे, अॅडम मिल्ने, नारायण जगदीशन, सी. हरी निशांत, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिस्टोरियस, ख्रिस जॉर्डन, शुभ्रांशू सेनापती, राजवर्धन हंगरगेकर, समरजीत सिंह, मुकेश चौधरी, के. भगत वर्मा आणि प्रशांत सोळंकी
सीएसकेची बेस्ट 11 : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, अंबती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्राव्हो, दीपक चहर, अॅडम मिल्ने आणि तुषार देशपांडे
व्हॉट्सअप अपडेट्स
‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.
You must be logged in to post a comment.