फोटो – ट्विटर

आयपीएल 2022 मध्ये आता 8 ऐवजी 10 टीम सहभागी होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद या दोन शहरांच्या टीम यंदा पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. यापैकी गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ही अहमदाबाद शहराची टीम आहे. CVC समुहाची मालकी असलेल्या या टीमला बीसीसीआयची मान्यता मिळण्यास अडचणी आल्या. या अडचणीनंतर ही टीम तयार (GT 2022 Squad Analysis) झाली आहे.

गोंधळाचा गरबा

गुजरात टायटन्सनं ड्राफ्टमध्ये दमदार खेळाडू निवडले. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), शुभमन गिल (Shubhman Gill) आणि राशिद खान (Rashid Khan) हे तीन वेगळ्या प्रकारातील खेळाडूंची त्यांनी निवड केली. हे तिघंही आणखी बराच काळ क्रिकेट खेळणार आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षांमध्ये त्यांच्याकडून सर्वोत्तम क्रिकेटची अपेक्षा आहे. त्याचा फायदा गुजरातला होणार आहे.

गुजरात टायटन्सची टीम आयपीएल ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच सहभागी झाली असली तरी त्यांच्या मॅनेजमेंटमधील गॅरी कस्टर्न, आशिष नेहरा या मंडळींना ऑक्शनचा अनुभव आहे. त्यानंतरही त्यांचे ऑक्शनमधील डावपेच अजब होते. या टीमनं ऑक्शनमध्ये बॉलर आणि ऑल राऊंडर्सची निवड करण्यावर जितका भर दिला तितका बॅटर्सवर दिला नाही. शेवटच्या राऊंडपर्यंत तर त्यांनी (GT 2022 Squad Analysis) विकेट किपर घेतलाच नव्हता.

CSK Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची चेन्नई सुपर किंग्स? कुठे सरस, कुठे फेल?

दमदार बाजू काय?

राशिद खान हा T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पिनर त्यांच्याकडे आहे. T20 क्रिकेटमधील जगातील कोणत्याही टीमच्या Playing 11 मध्ये राशिद सहज खेळू शकतो. राशिदच्या रूपाने हार्दिककडे हमखास विकेट घेणारा बॉलर आहे. राशिदच्या जोडीला साई किशोर हा देशांतर्गत क्रिकेटमधील एक उगवता स्पिनर गुजरातकडे आहे. विदेशी बॅटर्सना त्याची बॉलिंग फार माहिती नाही. पॉवर प्लेमध्ये साई आणि नंतरच्या ओव्हर्समध्ये राशिद ही स्पिन जोडी बॅटर्सची परीक्षा घेणारी आहे. साईचा T20 क्रिकेटमधील इकोनॉमी रेट फक्त 5.46 असून तो यंदाच्या आयपीएलमधील स्टार बॉलर ठरू शकतो.

लॉकी फर्ग्युसन हा आणखी एक मॅच विनर फास्ट बॉलर गुजरातकडे आहे. त्याला यापूर्वी केकेआरमध्ये फार संधी मिळाली नाही. तो आता गुजरातकडून मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे. मोहम्मद शमीचा अनुभव गुजरातला उपयोगी ठरू शकतो. त्याचबरोबर यश दयाल हा नवोदीत पण दमदार फास्ट बॉलर गुजरातनं निवडलाय. अल्झारी जोसेफ आणि डोमिनिक ड्रेक्स हे दोन वेस्ट इंडिजचे फास्ट बॉलर्स गुजरातकडे आहेत.

गुजरातला या स्पर्धेत कमाल करायची असेल तर शुभमन गिल आणि जेसन रॉय या टॉप ऑर्डरमधील जोडीला सातत्याने रन करावे लागतील. गिलचा टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. जेसन रॉयला आजवर आयपीएलमध्ये फार ‘भाव’ मिळेलेला नाही. या दोघांनीही सर्वोत्तम खेळ केला तर गुजरातची टीम (GT 2022 Squad Analysis) अनेकांना धक्का देऊ शकते.

गुजरातच्या मिडल ऑर्डरमध्ये अनुभवी डेव्हिड मिलर आणि कॅप्टन हार्दिक पांड्या हे दमदार खेळाडू आहेत. हार्दिकच्या बॉलिंगचा प्रश्न कायम असला तरी निवव्ळ बॅटर म्हणून तो T20 क्रिकेटमध्ये धोकादायक आहे. हार्दिकच्या क्रिकेट करिअरसाठी हे आयपीएल खूप महत्त्वाचं आहे. तो या परीक्षेत दमदार मार्कांनी पास झाला तर फक्त गुजरातसाठी नाही तर टीम इंडियासाठीही ती गुड न्यूज असेल.

गोंधळ कुठे आहे?

गुजरातची बॅटींग ही शुभमन गिल आणि जेसन रॉय यांच्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यापैकी एक जण खराब फॉर्ममध्ये असेल तर टीम अडचणीत येऊ शकते. विजय शंकर आणि गुरकिरत सिंह यांना अजून आयपीएलमध्ये चमकदार खेळ करता आलेला नाही. अभिनव मनोहर अगदीच नवा आहे.

हार्दिक पांड्याला आता पोलार्ड आणि कृणालचं कव्हर नाही. त्याचबरोबर कॅप्टनसीचं ओझं आहे. त्यामुळे तो किती मुक्तपणे फटकेबाजी करू शकेल हे पाहावं लागेल. T20 वर्ल्ड कपचा स्टार मॅथ्यू वेडला गुजरातनं निवडलाय. पण, विदेशी खेळाडूंची मर्यादा आणि राशिदच्या बॉलिंगवर सहा अधिक चांगला विकेट किपर असल्यानं तो फायनल 11 मध्ये किती खेळणार हा प्रश्न आहे. राहुल तेवातियावर गुजरातनं तब्बल 9 कोटी खर्च का केले? हा प्रश्न आहे. त्या किंमतीमध्ये एखादा चांगला बॅटर घेणे त्यांना शक्य (GT 2022 Squad Analysis) होते.

फर्ग्युसन, शमी आणि जोसेफ या गुजरातच्या तीन प्रमुख फास्ट बॉलरना दुखापतींचा इतिहास आहे. तसंच हार्दिक पांड्याच्या फिटनेसवरील उत्तरं अजून मिळालेले नाहीत. हार्दिकनं बॉलिंग केली नाही तर पाचव्या बॉलरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

KKR ने निवडलेला टेनिस बॉल सुपरस्टार रमेश कुमार कोण आहे?

चमत्कार होणार का?

वॉटसन ते रसेल आणि नरीन ते स्टोक्स या वेगवेगळ्या ऑल राऊंडर्सनी आयपीएल स्पर्धा आजवर गाजवली आहे. गुजरात टायटन्सनं यंदा 9 ऑलराऊंर्सची निवड केलीय. आयपीएल स्पर्धेत आजवर अनेक आश्चर्यकारक निकाल लागले आहेत. याच प्रकारच्या टीमला घेऊन शेन वॉर्ननं पहिल्याच आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सला विजेतेपद मिळवून दिले होते. गुजरात टायटन्सच्या फॅन्सनाही अशाच प्रकारच्या चमत्काराची अपेक्षा (GT 2022 Squad Analysis) असेल.

Gujrat Titans Squad for IPL 2022

गुजरात टायटन्सची संपूर्ण टीम: हार्दिक पांड्या (कॅप्टन), शुभमन गिल, राशिद खान, मोहम्मद शमी, जेसन रॉय, लॉकी फर्ग्युसन, अभिनव मनोहर, राहुल तेवातिया, आर. साई किशोर, नूर अहमद, डोमिनेक ड्रेक्स, विजय शंकर, जयंत यादव, दर्शन नळकांडे, यश दयाल, अल्झारी जोसेफ, प्रदीप संगवान, डेव्हिड मिलर, ऋद्धीमान साहा, मॅथ्यू वेड, गुरकिरत सिंह, वरूण एरॉन, आणि बी. साई सुदर्शन

बेस्ट Playing 11: जेसन रॉय, ऋद्धीमान साहा, शुभमन गिल, विजय शंकर, डेव्हिड मिलर, हार्दिक पांड्या, राहुल तेवातिया, राशिद खान, आर. साई किशोर, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद शमी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: