फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 साठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावर्षी 8 ऐवजी 10 टीम आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सर्व टीमची रचना नव्यानं होणार आहे. त्यामुळे सर्वच टीम त्यांना हव्या असलेल्या खेळाडूसाठी जास्तीत जास्त रक्कम मोजणार आहेत. यावेळी खेळाडूंच्या खरेदीचे नवे रेकॉर्ड होतील. आयपीएल स्पर्धेतील 8 जुन्या टीमनं आजवर कोणता खेळाडू सर्वात जास्त रक्कम देऊन खरेदी केले (Most Expensive Players) ते पाहूया

राजस्थान रॉयल्स – ख्रिस मॉरीस (IPL 2021)

दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला (Chris Morris) आयपीएल ऑक्शनमध्ये नेहमीच चांगली किंमत मिळाली. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्याला चांगली किंमत देऊन खरेदी केले होते. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) मागील वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात सर्व रेकॉर्ड मोडले.

ख्रिस मॉरीस हा आजवरच्या आयपीएल लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive Players) ठरला. त्याला 16 कोटी 25 लाखांमध्ये रॉयल्सनं खरेदी केले. मॉरीस रॉयल्सची असलेली ऑल राऊंड अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्याने मागील आयपीएल सिझनमध्ये 15 विकेट्स घेतल्या तर फक्त 67 रन काढले. काही आठवड्यांपूर्वीच मॉरीसनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.  

दिल्ली कॅपिटल्स – युवराज सिंह (IPL 2015)

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदामध्ये मोलाचे योगदान असलेला ऑल राऊंडर युवराज सिंहला (Yuvraj Singh) करारबद्ध करण्यासाठी आयपीएल 2015 च्या ऑक्शनमध्ये जोरदार स्पर्धा रंगली होती. त्याला अखेर दिल्लीनं 16 कोटींना खरेदी केले. हा मागील वर्षीच्या ऑक्शनपर्यंतचा रेकॉर्ड होता.

दिल्लीनं दाखवलेल्या एवढ्या मोठ्या विश्वासाला साजेशी कामगिरी युवराज करू शकला नाही. त्यानं त्या आयपीएल सिझनमध्ये 236 रन केले. त्यानंतर पुढील सिझनमध्ये युवराजला दिल्लीने रिलीज केले.

कोलकाता नाईट रायडर्स – पॅट कमिन्स (IPL 2020)

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सनं (Pat Cummins) आयपीएल 2020 च्या ऑक्शनमध्ये तोपर्यंतच्या इतिहासातील सर्वात महागडा विदेशी खेळाडू होण्याचा रेकॉर्ड (Most Expensive Players) केला होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं 15 कोटी 50 लाखांना खरेदी केले. कमिन्सची बॉलर म्हणून आयपीएलमधील प्रदर्शन साधारण आहे. त्याने केकेआरकडून 21 मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या. मात्र त्याने लोअर ऑर्डरमध्ये एक उपयुक्त बॅटर म्हणून कामगिरी केली आहे.

रिकी पॉन्टिंगच्या Spirit of Cricket ला कमिन्सचा ठेंगा, इंग्लिश बॉलरची रोखली hat-trick 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कायले जेमिसन (IPL 2021)

न्यूझीलंडचा उंचपुरा फास्ट बॉलर कायले जेमिसननं (Kyle Jamieson) विराट कोहलीला टेस्ट सीरिजमध्ये चांगलेच त्रस्त केले होते. जेमिसनला टीममध्ये घेण्यासाठी आरसीबीनं मोठी किंमत मोजली. आरसीबीने जेमिसनला 15 कोटींमध्ये करारबद्ध केले. जेमिसननं आरसीबीची निराशा केली. त्याने 9 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या सेकंड हाफमध्ये तो बेंचवरच होता. त्याला आरसीबीने या सिझनसाठी रिटेन केले नाही. त्यानंतर जेमिसननं या सिझनमधून माघार घेतली आहे.

पंजाब किंग्ज – झाय रिचर्डसन (IPL 2021)

बिग बॅश लीगमधील स्टार असलेल्या झाय रिचर्डसनला (Jhye Richardson) आयपीएलमध्ये खेळवण्यासाठी पंजाब किंग्जनं तब्बल 14 कोटी मोजले. रिजर्डसन हा पंजाबनं आजवर खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive Players) आहे. पण, पंजाबचा हा पैसा वायाच गेला. रिचर्डसन मागील आयपीएलमध्ये फक्त 3 मॅचमध्ये खेळला. त्यामध्ये त्याने 10.63 च्या इकोनॉमी रेटनं 3 विकेट्स घेतल्या. पंजाबने रिलीज केल्यानंतर या आयपीएल ऑक्शनमध्ये रिचर्डसन पुन्हा सहभागी झाला आहे.

सनरायझर्स हैदराबाद – मनिष पांडे (IPL 2018)

मनिष पांडे (Manish Pandey) हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सेंच्युरी झळकावलेला पहिला भारतीय आहे. तसंच तो आयपीएल 2014 च्या (IPL 2014) फायनलमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ देखील होता. यापूर्वीच्या मेगा ऑक्शनमध्ये 2018 साली मनिषला खरेदी करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद (SRH) 11 कोटी मोजले होते.

मनिषला आयपीएल 2018 मध्ये फार कमाल करता आली नाही. 15 मॅचमध्ये 25.81 च्या सरासरीनं 284 रन केले. त्यानंतरही हैदराबादनं त्याच्यावरील विश्वास कायम ठेवला. मनिषनंही त्याच्या कामगिरीत सुधारणा केली. मागील 3 आयपीएल सिझनमध्ये मिळून त्याने 35 मॅचमध्ये 36. 58 च्या सरासरीनं 1061 रन केले. मनिष यंदाच्या आयपीएल ऑक्शनमध्ये पुन्हा सहभागी झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जडेजा (IPL 2012)

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएल 2012 च्या ऑक्शनमध्ये रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) 9 कोटी 75 लाख रूपये देऊन खरेदी केले होते. गेल्या 10 वर्षातील जडेजाचा आयपीएल आणि टीम इंडियातील प्रवास सर्वांनाच माहिती आहे. आर. अश्विन बाहेर पडल्यानंतर तो चेन्नईचा मुख्य स्पिनर बनला. यंदाच्या आयपीएल ऑक्शनपूर्वी जडेजाला सर्वाधिक 16 कोटी रूपये देत (Most Expensive Players) चेन्नईनं रिटेन केले आहे.

मुंबई इंडियन्स – कृणाल पांड्या (IPL 2018)

आयपीएल 2017 मधील फायनलमध्ये कृणाल पांड्या (Krunal Pandya) ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. 2018 साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये कृणालला मोठी मागणी होती. अखेर मुंबई इंडियन्सनं राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरत 8 कोटी 80 लाख रूपयांमध्ये कृणालला खरेदी केले.

MI Retention List 2022: मुंबई इंडियन्सची हुशारी, इतर टीमपेक्षा ठरली भारी!

कृणालने त्या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2018) 12 विकेट्स आणि 228 रन अशी समाधानकारक कामगिरी केली. कृणाल मागील काही सिझनमध्ये (Most Expensive Players)  मुंबई इंडियन्सच्या कोअर टीमचा सदस्य होता. या आयपीएलपूर्वी त्याला मुंबई इंडियन्सनं रिलीज केले आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: