फोटो – ट्विटर

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या पहिल्या सिझनपासूनच ग्लॅमर लाभलेली टीम आहे. दिल्लीकर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) कॅप्टनसीमध्ये केकेआरनं विजेतेपद मिळवले होते. आता यंदा आणखी एका दिल्ली कॅपिटल्सच्या माजी कॅप्टनवर कोलकाताची मोठी भिस्त आहे. मागील आयपीएल सिझनमध्ये फारशी अपेक्षा नसताना सेकंड हाफमध्ये दमदार कामगिरी करत केकेआरनं फायनल गाठली होती. आता त्यांच्या फॅन्सची नव्या टीमकडून आणखी एक पाऊल पुढे (KKR Squad Analysis 2022) टाकण्याची अपेक्षा असेल.  

यंदा काय नवे?

कोलकातानं कॅप्टनसीमध्ये यंदा बदल केलाय. सौरव गांगुली आणि गौतम गंभीर या हाय प्रोफाईल भारतीय खेळाडूंनी यापूर्वी केकेआरची कॅप्टनसी केलीय. त्यानंतर त्यांनी दोन सिझन दिनेश कार्तिकला कॅप्टन केले. कार्तिकनं मर्यादीत टीमचा वापर करत समाधानकारक कामगिरी केली होती. त्याला आयपीएल स्पर्धेच्या दरम्यान (IPL 2020) हटवर इयन मॉर्गनला (Eoin Morgan) कॅप्टन केले.

मॉर्गनच्या कॅप्टनसीमध्ये केकेआरनं फायनल गाठली. पण, या प्रवासात मॉर्गन फक्त कॅप्टन आहे, म्हणून टीममध्ये होता. एक बॅटर म्हणून त्याचे योगदान नव्हते. आता मॉर्गनच्या जागी केकेआरनं श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) कॅप्टनपदी निवड केली आहे. श्रेयसचं दिल्ली कॅपिटल्सच्या उभारणीत मोठा वाटा होता. त्याने कॅप्टनसीच्या मुद्यावर दिल्लीची टीम सोडली. त्याला आता कॅप्टन म्हणून सिद्ध करायचं आहे. केकेआरचा कॅप्टन म्हणून चांगला खेळ केला तर टीम इंडियातील त्याची जागा अधिक बळकट होणार, भावी कॅप्टन म्हणून संधी असेल. ही केकेआर टीममधील सर्वात नवी आणि परिणामकारक गोष्ट (KKR Squad Analysis 2022) आहे.

KKR ने निवडलेला टेनिस बॉल सुपरस्टार रमेश कुमार कोण आहे?

काय आहे भारी?

केकेआरनं मेगा ऑक्शनपूर्वी व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer), आंद्रे रसेल (Andre Russell), सुनील नरीन (Sunil Narine) आणि वरूण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) या चार जणांना रिटेन केले. त्या जोडीला त्यांनी पॅट कमिन्सला (Pat Cummins) अर्ध्या किंमतीमध्ये परत आणले आहे.

ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन झाल्यानं कमिन्सचा आत्मविश्वास वाढलाय. त्याचा फायदा केकेआरला होणार आहे. कमिन्सच्या जोडीला शिवम मावी आणि नितिश राणा या जुन्या खेळाडूंना केकेआरनं मोठी किंमत देऊन घेतलंय. त्यामुळे केकेआरनं या सिझनमध्ये त्यांचा कोअर सांभाळला आहे.

केकेआरच्या मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर हा टीमचा भक्कम आधार आहे. तर इयन मॉर्गन गेला आणि त्याच्या जागी त्याचा इंग्लंड टीममधील 36 चा आकडा असलेला अ‍ॅलेक्स हेल्स टीममध्ये येणे हा एक काव्यगत न्याय आहे. हेल्स आणि अय्यर ही एक आक्रमक ओपनिंग जोडी केकेआरकडे (KKR Squad Analysis 2022) आहे.

आंद्रे रसेल आणि सुनील नरीन यांची T20 क्रिकेटमधील उपयुक्तता ही अजूनही संपलेली नाही. हे दोघंही पूर्ण फिट असतील तर केकेआरची टीम आणखी धोकादायक होते. नरीन आणि वरूण चक्रवर्ती या मिस्ट्री स्पिनर्सचा केकेआरच्या फायनलपर्यंतच्या प्रवासात मोठा वाटा होता. ते यंदाही बॅटर्सची परीक्षा घेण्यासाठी सज्ज असतील.

नरीनला रिप्लेस करण्यासाठी मोहम्मद नबी आणि पॅट कमिन्स सुरूवातीला नसेल तर त्याची जागा घेण्यासाठी टीम साऊदी हे अनुभवी पर्याय केकेआरकडे आहेत. हेल्सला वगळले तर सॅम बिलिंग्ज हा आक्रमक विकेट किपर-बॅटर केकेआरकडून मिडल ऑर्डरमध्ये खेळू शकतो. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा पण मोठ्या प्लॅटफॉर्मवर संधी न मिळालेला शेल्डन जॅक्सन हा उपयुक्त विकेट किपर केकेआरने निवडला (KKR Squad Analysis 2022) आहे.

IPL मध्ये करोडपती होताच कोलकाताच्या खेळाडूचा PSL ला रामराम

काय आहे डेंजर?

आंद्रे रसेल, वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरीन या केकेआरच्या कोअर टीममधील खेळाडूंना दुखापतींचा इतिहास आहे. त्यांचा फिटनेस कायम संशयात असतो. यापैकी एकचीही अनुपस्थिती श्रेयसची डोकेदुखी वाढवणारी आहे. केकेआरकडे पहिल्या पसंतीचा विकेट किपर देखील नाही. बिलिंग्ज आणि जॅक्सन यापैकी कुणाला खेळवायचं हा मॅनेजमेंटसमोर नेहमीच प्रश्न असेल

उमेश यादव आणि शिवम मावी हे केकेआरकडे भारतीय फास्ट बॉलर आहेत. मावीनं अजून स्वत:ला सिद्ध केलेलं नाही. तर उमेश यादव बराच काळापासून बेंचवरच आहे. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये यापैकी बॉलिंग कोण करणार? रसेलची बॉडी त्याला बॉलिंग करण्याची परवानगी देईल का? सुनील नरीनचा 18 किंवा 19 व्या ओव्हरमध्ये श्रेयस वापर करणार? हे केकेआरच्या फॅन्सचे काळजीचे विषय (KKR Squad Analysis 2022) आहेत.

Kolkata Knight Riders Full Squad for IPL 2022

श्रेयस अय्यर (कॅप्टन), आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती, अजिंक्य रहाणे, नितिश राणा, अ‍ॅलेक्स हेल्स, सॅम बिलिंग्ज, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिन्स, उमेश यादव, शिवम मावी, मोहम्मद नबी, टीम साऊदी, चमिका करूणारत्ने, रिंकू सिंह, अनुकूल रॉय, रमेश कुमार, अशोक शर्मा, बाबा इंद्रजीत, रसिक धर, प्रथम सिंग, अभिजित तोमर आणि अमन खान

बेस्ट Playing 11 : व्यंकटेश अय्यर, अ‍ॅलेक्स हेल्स, नितिश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, आंद्रे रसेल, सुनील नरीन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव आणि वरूण चक्रवर्ती

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: