फोटो – ट्विटर, बीसीसीआय

आयपीएल स्पर्धेत सहभागी झाल्यानंतरचं पहिलं ऑक्शन हा गोंधळण्याचा विषय असतो. आता जुन्या झालेल्या 8 टीममधील बहुतेकांचा हाच अनुभव आहे. यंदाची एक नवी टीम गुजरात टायटन्स (Gujrat Titans) टीमच्या टेबलवरही हा गोंधळ दिसला. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) टीम मात्र याला अपवाद ठरली आहे. त्यांनी पहिल्याच ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) दमदार टीम उभारली (LSG  Squad Analysis 2022) आहे.

नव्याची नवलाई नाही, अनुभवाचे शहाणपण

लखनौ सुपर जायंट्सकडे जगभरातील T20 लीगचा अनुभव असलेला अँडी फ्लॉवर (Andy Flower) हा हेड कोच आहे. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट आणि आयपीएलची संपूर्ण माहिती असलेला गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा हुशार आयपीएल विजेता कॅप्टन त्यांचा मेंटॉर आहे.

फ्लॉवर-गंभीर जोडीनं ऑक्शन टेबलवर शांतपणे त्यांना हवे असलेले खेळाडू निवडत संतुलित टीम तयार केली आहे. मेगा ऑक्शनच्या पहिल्याच दिवशी प्लेईंग 11 तयार झालेली लखनौ ही एकमेव टीम होती. उत्तम ओपनर, भारतीय खेळाडूंचा कोअर, बॅटींग ऑल राऊंडर, बॉलिंग ऑल राऊंडर, 140 पेक्षा जास्त वेगाने बॉल टाकणारे फास्ट बॉलर्स आणि टीम इंडियाचा उगवता लेग स्पिनर अशा सर्व प्रकारच्या खेळाडूंचा समावेश लखनौच्या टीममध्ये (LSG  Squad Analysis 2022) आहे.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?

काय खास आहे?

लखनौनं आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी केएल राहुल (KL Rahul), मार्कस स्टॉईनिस (Marcus Stonis) आणि रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या तिघांना करारबद्ध केले होते. त्यानंतर त्यांनी क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) हा आघाडीचा विकेट किपर आणि ओपनिंग बॅटर करारबद्ध केला आहे. डी कॉक टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाल्यानं संपूर्ण सिझन उपलब्ध असेल.

राहुल – डी कॉक ही डावी-उजवी जोडी आयपीएलमधील सर्व बॉलर्सची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे. या दोघांकडेही संपूर्ण 20 ओव्हर्स खेळण्याची क्षमता असून ते परस्परांना पूरक ठरू शकतात. त्याचबरोबर डी कॉक विकेट किपिंगची जबाबदारी सांभाळणार असल्यानं राहुलचा ताणही कमी होणार आहे.

लखनौकडे मनिष पांडे हा तीन नंबरचा उत्तम बॅटर आहे. मार्कस स्टॉईनिस हा बॅटींग ऑल राऊंडर आणि जेसन होल्डर हा बॉलिंग ऑल राऊंडर टीममध्ये असल्यानं त्यांची टीम आणखी भक्कम झाली आहे. उजव्या हाताने स्पिन बॉलिंग करू शकणारा बॅटींग ऑल राऊंडर दीपक हुडा आणि डाव्या हाताने बॅटींग करू शकणारा स्पिन बॉलिंग ऑल राऊंडर कृणाल पांड्या या टीममध्ये आहे. त्यांच्या जोडीली कृष्णप्पा गौतम हा आणखी एक राखीव ऑल राऊंडर लखनौकडे आहे.

आवेश खान आणि मार्क वूड ही 140 किलो मीटर प्रती तास वेगानं बॉलिंग करू शकणारी जोडी लखनौकडे आहे. या जोडीचा एकत्रित मारा बॅटर्ससाठी त्रासदायक असेल. मागील आयपीएल सिझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत आवेश दुसऱ्या क्रमांकावर होता. भारतीय फास्ट बॉलर्सच्या भावी पिढीतील आवेश हा सर्वात आश्वासक चेहरा असून तो लखनौसाठी दीर्घकाळाची गुंतवणूक (LSG  Squad Analysis 2022)  आहे. त्याचबरोबर तरूण लेग स्पिनर रवी बिश्नोईला मेगा ऑक्शनपूर्वीच टीममध्ये घेत लखनौनं या विभागातही मोठी गुंतवणूक केली आहे.

काय डेंजर?

लखनौची प्लेईंग 11 भक्कम आहे. पण, तीच टीमची कमकुवत बाजू आहे. या टीमनं प्लेईंग 11 तयार करण्यावर संपूर्ण जोर लावला. त्यामुळे त्यांना बेंच स्ट्रेंथ तितकी मजबूत करता आली नाही. राहुल आणि मनिष हे टॉप ऑर्डरमधील कर्नाटकचे बॅटर T20 क्रिकेटमध्ये अँकर म्हणून प्रसिद्ध आहेत. ते त्यांच्या भूमिकेत शिरले तर रनरेट वाढवणे हे नंतरच्या खेळाडूंसाठी आव्हान असेल. पांडेसाठी मागील आयपीएल सिझन खास गेला नव्हता.

मार्क वूडचा फिटनेस हा नेहमीच काळजीचा विषय आहे. तो आजवर कधीही संपूर्ण आयपीएल खेळलेला नाही. स्पिन बॉलर्समध्येही या टीमकडे पर्याय कमी आहेत. बिश्नोईचा सहकारी शाहबाज नदीम बऱ्याच काळापासून आयपीएल टीमच्या प्लेईंग 11 पासून दूर आहे. त्याचबरोबर हुडा, कृणाल आणि गौतम हे स्पिनर्स विकेट टेकिंग बॉलर नाहीत.

कृणाल पांड्या आणि दीपक हुडा यांना व्यावसायिक क्रिकेटपटूंप्रमाणे जुने वाद विसरून प्लेईंग 11 मध्ये एकदिलानं खेळावं लागेल. तरच टीममधील वातावरण नीट राहील. लखनौनं फक्त 21 खेळाडूच निवडले असून कोरोनाच्या बिकट कालखंडात कमी खेळाडूंची ही संख्या देखील अडचणीचा मुद्दा (LSG  Squad Analysis 2022)  ठरू शकते.

KKR Squad Analysis: कशी आहे 2022 ची कोलकाता? श्रेयसची टीम सुपरहिट होणार का?

Lucknow Super Giants Full Squad for IPL 2022

लखनौची टीम : केएल राहुल (कॅप्टन), मार्कस स्टॉईनिस, रवी बिश्नोई, क्विंटन डी कॉक, जेसन होल्डर, मनिष पांडे, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, मार्क वूड, आवेश खान, कृष्णप्पा गौतम, इव्हान लुईस, दुष्मंता चमिरा, कायले मेयर्स, अंकित राजपूत, शाहबाज नदीम, मनन व्होरा, मोहसीन खान, आयुष बदानी, करण शर्मा, आणि मयांक यादव

बेस्ट Playing 11 : केएल राहुल, क्विंटन डी कॉक, मनिष पांडे, मार्कस स्टॉईनिस, दीपक हुड्डा, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, मार्क वूड, आवेश खान आणि रवी बिश्नोई

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: