फोटो – बीसीसीआय, आयपीएल

मुंबई इंडियन्सनला (Mumbai Indians) किती जुने खेळाडू मिळणार?  मुंबई कोणत्या खेळाडूंवर बोली लावणार? मुंबई अजून बोली का लावत नाही? आता कोणते खेळाडू मुंबई इंडियन्सला हवे आहेत? याच खेळाडूंवर मुंबईनं बोली का लावली? आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मुंबईची नवी टीम पुन्हा चॅम्पियन होणार का? असे अनेक प्रश्न दोन दिवसांच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) अनेकांना पडले होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं या विशेष लेखामध्ये आम्ही तुम्हाला देणार (MI 2022 Squad Analysis) आहोत. त्याचबरोबर मुंबईची सर्वोत्तम प्लेईंग 11 काय असेल हे देखील आपण या लेखात पाहणार आहोत.

जुने किती मिळाले?

मुंबई इंडियन्सनं मेगा ऑक्शन सुरू होईपर्यंत रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav),  कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) या चार जणांना रिटेन केले होते. त्यानंतर मागील आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) मुंबईच्या टीममध्ये असलेल्या इशान किशन (Ishan Kishan) अनमोलप्रीत सिंह (Anmolpreet Singh) आणि अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) या तीघांना पुन्हा एकदा खरेदी करण्यात मुंबई इंड़ियन्सला यश आले.

यापैकी फक्त इशान किशन हा एकटाच मुंबईच्या प्लेईंग 11 मधील नियमित सदस्य आहे. तो देखील मुंबईला सहज मिळाला नाही. या मेगा ऑक्शनमधील सर्वात जास्त 15 कोटी 25 लाखांची बोली लावून त्याला मुंबई इंडियन्सनं खरेदी केले. याचाच अर्थ मुंबई इंडियन्सच्या आयपीएल इतिहासातील सर्वात बलाढ्य Playing 11 मधील 6 खेळाडू (MI 2022 Squad Analysis)  आता त्यांच्या टीममध्ये नाहीत.

PL 2022 Mega Auction, Explained: इशान किशन विराट कोहलीपेक्षाही महागडा का ठरला?

कोण घेणार जागा?

मुंबई इंडियन्सनं 6 प्रमुख खेळाडू सोडल्यानं त्यांची जागा घेण्यासाठी कोणत्या खेळाडूंची निवड केली आहे? हा प्रश्न आहे. हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) वारसदार म्हणून मुळचा सिंगापूरचा पण आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या टीम डेव्हिडची (Tim David) निवड मुंबई इंडियन्सनं केली आहे.

डेव्हिडनं 85 T20 मॅचनंतर 159.39 चा स्ट्राईक रेट आणि 34.69 च्या सरासरीनं 1908 रन केले आहेत. जगभरातील T20 लीग खेळण्याचा आणि त्या गाजवण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. 4 ते 6 या T20 च्या प्लेईंग 11 मधील सर्वात अवघड जागेवर बॅटींग करण्याचे कौशल्य (MI 2022 Squad Analysis) डेव्हिडकडे  आहे.

मुंबई इंडियन्सच्या मिडल ऑर्डरमध्ये बॅटींग करणारा इशान किशन आता डी कॉकच्या जागेवर ओपनिंग करणार आहे. त्याच्या जागी मुंबईनं इशानपेक्षाही तरूण अशा 19 वर्षांच्या तिलक वर्माची (Tilak Varma) निवड केली आहे. तिलक फक्त 19 वर्षांचा आहे. तसंच तो डावखुरा आक्रमक बॅटर असून त्याचा T20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 143.77 आहे. तो नव्या टीममध्ये नंबरसाठी उपयुक्त खेळाडू आहे.

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट गाजवणारा आक्रमक ऑल राऊंडर डॅनियल सॅम्सला (Daniel Sams) मुंबईनं करारबद्ध केलंय. तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावरील उपयुक्त बॅटर आहे. त्याचप्रमाणे मॅचच्या गरजेप्रमाणे तो 4 नंबरवरही बॅटींग करू शकतो. तसेच तो चपळ फिल्डरही आहे. कृणाल पांड्याच्या जागेवर एक चांगला खेळाडू मुंबईला मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियन ऑल राऊंडरनं घेतला डोळ्यावर विश्वास न बसणारा कॅच, पाहा VIDEO

आर्चरवर इतके पैसे का?

इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) या सिझनमध्ये खेळणार नाही तरीही त्याच्यासाठी मुंबई इंडियन्सनं पैसे का वाचवले? तब्बल 8 कोटी मोजून त्याला खरेदी का केले? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मुंबई इंडियन्स ही लाँग टर्म गुंतवणूक करणारी टीम (MI 2022 Squad Analysis)  म्हणून ओळखली जाते.

बुमराह, हार्दिक, कृणाल किंवा राहुल चहरला त्यांनी खरेदी केले तेव्हा ते लगेच पहिल्याच सिझनमध्ये मॅच जिंकतील याचं उत्तर मुंबई इंडियन्सची निवड समिती सोडून कुणाकडंही नव्हतं. त्यानंतर काय घडलं तो इतिहास आहे. मुंबईच्या मॅनेजमेंटचीही या खेळाडूंना लय सापडेपर्यंत थांबण्याची तयारी होती.

आर्चरसाठी त्यांनी तो फिट होईपर्यत थांबण्याची तयारी केली आहे. पुढील ऑक्शनमध्ये आर्चर आला असता तर तो नक्कीच यापेक्षा किमान 6 कोटी महाग गेला असता. साधारण 14 कोटींमध्ये त्याला खरेदी करणे मुंबई इंडियन्सला शक्य झाले नसते त्यामुळे त्यांनी आर्चरसाठी 8 कोटी मोजले आहेत.

धोका कुठे आहे?

मुंबई इंडियन्सची अगदी परफेक्ट टीम पाहण्याची सवय असलेल्या क्रिकेट फॅन्सना ही टीम आवडणार नाही. या टीममध्ये अनेक धोके आहेत. टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्स यांचा भारतीय पिचवर खेळण्याचा फार अनुभव (MI 2022 Squad Analysis)  नाही. डेव्हिड तर आजवर एकदाही भारतामध्ये खेळलेला नाही.

जोफ्रा आर्चर यावर्षी आयपीएलमध्ये नाही. इंग्लंडचा दुसरा फास्ट बॉलर टायमल मिल्स (Tymal Mills) याला देखील दुखापतींचा इतिहास आहे. तो यापूर्वी भारतीय पिचवर फार चालेला नाही. तसंच तो महागडा बॉलर आहे. मुंबई इंडियन्सच्या अन्य भारतीय फास्ट बॉलरपैकी एकही जण सध्या टीम इंडियाच्या निवड समितीच्या रडारवर नाही. त्यामुळे बुमराहवरील बॉलिंगचा ताण आणखी वाढणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या स्पिन बॉलिंगची समस्या यंदाही कायम आहे. मुरगन अश्विन आणि मयांक मार्कंडेय हे दोन स्पिनर मुंबईकडं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवी स्पिनरची कमतरता मुंबईला (MI 2022 Squad Analysis) जाणवू शकते.

मुंबई इंडियन्सची टीम गेल्या वर्षीच्या तुलनेत कागदावर बलवान वाटत नाही. पण, कागदावरील नावं आणि मैदानात खेळणारी टीम यामध्ये नेहमीच फरक असतो. मुंबईकडं हुशार कॅप्टन आणि त्याला साथ देणारा मजबूत कोचिंग स्टाफ आहे. त्यामुळे या टीमला स्पर्धेपूर्वीच निकालात काढणे चूक आहे.

Mumbai Indians Squad for IPL 2022

मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सॅम बिलिंग, तिलक वर्मा, संजय यादव, अनमोलप्रीत सिंह, डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंह, आर्यन जुयाल, टायमल मिल्स, जोफ्रा आर्चर, फॅबियन अ‍ॅलन, जयदेव उनाडकत, बसील थम्पी रिले मेरेडिथ, मयांक मार्कंडेय, मुरगन अश्विन, अर्शद खान, राहुल बुद्धी, ऋतिक शौकिन आणि अर्जुन तेंडुलकर

मुंबई इंडियन्सची बेस्ट 11 : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, टायमल मिल्स, मुरगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि मयांक मार्कंडेय

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: