फोटो – सोशल मीडिया

विराट कोहली, ख्रिस गेल, एबी डीव्हिलियर्स या सारख्या दिग्गज बॅटर्सचा समावेश असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) टीमची आपल्या मनात भक्कम प्रतिमा आहे. गेल आरसीबीमधून यापूर्वीच बाहेर पडला. आता डीव्हिलियर्स देखील नसेल. विराट कोहली देखील यंदा कॅप्टन नाही. नव्या सिझनच्या नव्या आरसीबीनं बॅटींग नाही तर बॉलिंग युनिट भक्कम करण्यावर भर दिला (RCB Squad Analysis 2022) आहे.

वेगेळेपण काय?

आरसीबीनं आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी विराट कोहली (Virat Kohli), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)  या तिघांना रिटेन केले होते. या मेगा ऑक्शनपूर्वीच आरसीबी कॅम्पमधून अनेक बातम्या बाहेर येत होत्या. पण, त्या केवळ ‘पेरलेल्या बातम्या’ होत्या हे तेव्हाही कळत होते. यंदाच्या ऑक्शननंतर ते स्पष्ट झाले.

आरसीबीनं फाफ ड्यू प्लेसिसला (Faf du Plessis) सीएसकेच्या (Chennai Super Kings) टीममधून ओढण्यासाठी 7 कोटी मोजले. मागील आयपीएल सिझनमधील पर्पल कॅप विजेता बॉलर हर्षल पटेल आणि सध्या सर्वोवत्तम फॉर्मात असलेला स्पिनर श्रीलंकन स्पिनर हसरंगा या दोघांनाही 10 कोटींपेक्षा जास्त किंमत देत खरेदी केले आहे.

मोहम्मद सिराजच्या मदतीला जोश हेजलवूड (Josh Hazelwood) हा फास्ट बॉलर त्यांनी जोडला आहे. टॉप ऑर्डरला बॅटींग आणि विकेट किपिंग करू शकेल असा फिन अ‍ॅलन हा न्यूझीलंडचा खेळाडू आरसीबीकडे आहे. त्याचबरोबर महिपाल लोमरोर आणि अनुज रावत हे देशांतर्गत क्रिकेटमधील दोन आक्रमक बॅटर आरसीबीच्या (RCB Squad Analysis 2022) टीममध्ये दाखल झाले आहेत.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?

भक्कम बाजू काय?

आयपीएल सिझनमध्ये पहिल्यांदाच आरसीबीचा बॉलिंग अटॅक भक्कम आहे. मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि जोश हेजलवूड हे तीन दमदार फास्ट बॉलर आरसीबीच्या प्लेईंग 11 मध्ये आहेत. त्यांच्या मदतीला हसरंगा हा फॉर्मातील लेग स्पिनर आहे. जो चहलची कमतरता जाणवू देणार नाही. त्याचबरोबच हर्षल आणि हसरंगा हे दोघेही उपयुक्त बॅटर आहेत. त्याने आरसीबीच्या बॅटींगची खोली आणखी वाढेल.

विराट कोहली कॅप्टनसीचं ओझं गेल्यानंतर अधिक मुक्तपणे खेळू लागला तर तो आरसीबीचाच नाही तर संपूर्ण आयपीएल स्पर्धेतील हाय पॉईंट असेल. विराटच्या जोडीला आता डीव्हिलियर्स नसला तरी तितकाच अनुभवी फाफ ड्यू प्लेसिस आहे. विराट-फाफ ही अनुभवी जोडी आरसीबीला भक्कम सुरूवात करून देऊ शकते. ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कर्तिकवर इनिंग फिनिश करण्याची जबाबदारी असेल.

आरसीबीककडे प्लेईंग 11 मधील कोणता खेळाडू जखमी झाला, अनुपलब्ध असेल किंवा त्याचा फॉर्म हरवला तर त्याची जागा घेण्यासाठी खेळाडू तयार आहेत. फाफ ड्यू प्लेसिसच्या जागी फिन अ‍ॅलन, अनुज रावतच्या जागी लवनिथ सिसोदीया, शाहबाज अहमदच्या जागी गरजेनुसार सुयश प्रभूदेसाई हे पर्याय आरसीबीकडे (RCB Squad Analysis 2022) आहेत. त्याचबरोबर मॅक्सवेलसाठी रदरफोर्ड आणि हेजलवूडची जागा घेण्यासाठी डेव्हिड विली आणि बेहरनड्रॉफ हे फास्ट बॉलर आरसीबीच्या बेंचवर उपलब्ध असतील.

अडचण कुठे येणार?

विराट कोहली आणि फाफ ड्यू प्लेसिस हे एकाच पद्धतीचे बॅटर आरसीबीचे ओपनर आहेत. त्यामुळे या दोघापैकी एकानं त्याचा खेळ बदलला नाही तर आरसीबीला वेगवान सुरूवात मिळण्यास अडचण येऊ शकते. अनुज रावत आणि महिपाल लोमरोर हे दोन नवे चेहरे आरसीबीच्या मिडल ऑर्डरमध्ये आहेत. त्यामुळे मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकवर ताण वाढणार आहे. त्याच कार्तिक हल्ली क्रिकेट कमी आणि कॉमेंट्री जास्त करतो. त्यामुळे तो आरसीबीला चांगलं फिनिशिंग करून देईल का हा प्रश्न आहे.

वॉशिंग्टन सुंदरची कमतरता आरसीबीला नक्कीच जाणवेल. पॉवर प्लेमध्ये बॉलिंग आणि एक ते सातमध्ये कोणत्याही क्रमांकावर बॅटींग करण्याची क्षमता सुंदरकडे होती. तसेच मिडल ऑर्डरमध्ये एबी डीव्हिलियर्स नसल्यानं विराटसह बॅटींग ऑर्डरमधील प्रत्येकालाच ताण जाणवेल. हा ताण कमी करण्यासाठी सर्वच बॅटर्ससमोर त्यांचा खेळ उंचावण्याचे आव्हान (RCB Squad Analysis 2022) आहे.

लकी खेळाडूमुळे कप जिंकणार?

कर्ण शर्मा हा आयपीएलमधील लकी खेळाडू मानला जातो. हा भारतीय स्पिनर ज्या टीममध्ये असले ती टीम ट्रॉफी जिंकते. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सनं याचा अनुभव घेतलाय. यंदा तो पहिल्यांदाच आरसीबी टीममध्ये आलाय. त्यामुळे त्याच्या पायगुणामुळे तरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ दे अशीच प्रार्थना आरसीबीचे फॅन्स (RCB Squad Analysis 2022) करत असतील.

CSK Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची चेन्नई सुपर किंग्स? कुठे सरस, कुठे फेल?

Royal Challengers Bangalore Full Squad for IPL 2022

आरसीबाीची संपूर्ण टीम : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ ड्यू प्लेसिस, दिनेश कार्तिक सूयश प्रभूसरदेसाई, अनुज रावत, महिपाल लोमरोर, हर्षल पटेल, हसरंगा, रदरफोर्ड, शाहबाज अहमद, अनिश्वर गौतम, जोश हेजलवूड, महिपाल लोमरोर, लवनिथ सिसोदीया फिन अ‍ॅलन, डेव्हिड विली, बेहरनड्रॉफ, चमा मिलिंद, आकाशदिप आणि सिद्धार्थ कौल

बेस्ट Playing 11 : विराट कोहली, फाफ ड्यू प्लेसिस, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक शाहबाज अहमद, हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड आणि मोहम्मद सिराज

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: