फोटो – ट्विटर

तरूण खेळाडूंना अगदी लवकर शोधण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) यंदा डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) या 18 वर्षांच्या दक्षिण आफ्रिकेच्या बॅटींग ऑल राऊंडरची निवड केली आहे. आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) मुंबईनं त्याला 3 कोटींमध्ये खरेदी केले. अंडर 19 वर्ल्ड कप गाजवलेला हा दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेट विश्वात बेबी एबी डीव्हिलियर्स (Baby AB de Villiers) म्हणून ओळखला जातो. मुंबई इंडियन्सचा भविष्यातील सुपर स्टार (MI Future Baby AB) म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.

वर्ल्ड कपमध्ये धमाका

ब्रेविसनं वेस्ट इंडिजमध्ये नुकताच झालेला अंडर 19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2022) गाजवला आहे. त्यानं या स्पर्धेत 6 मॅचमध्ये 84.33 च्या सरासरीनं 506 रन केले. यामध्ये 2 सेंच्युरी आणि 3 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. एका अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा शिखर धवनचा (Shikhar Dhawan) 2004 पासून अबाधित असलेला रेकॉर्ड ब्रेविसनं यंदा मोडला. या कामगिरीसाठी त्याची वर्ल्ड कपमध्ये ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ म्हणून निवड झाली.

ब्रेविसनं आत्तापर्यंत फक्त 3 T20 मॅच खेळल्या असून त्यामध्ये त्याने 137.09 च्या स्ट्राईक रेटनं 85 रन केले आहेत. तसंच तो लेगस्पिनर देखील आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स कामचलाऊ स्पिनर म्हणून देखील त्याचा वापर करू (MI Future Baby AB)  शकते.

कोण आहे बेबी एबी?

ब्रेविस हा दक्षिण आफ्रिकेच्या अंडर 19 वर्ल्ड कपमधील टॉप ऑर्डर बॅटर आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या T20 स्पर्धेत या 18 वर्षांच्या खेळाडूने 25 बॉलमध्ये 46 रनची खेळी केल्याने तो फोकसमध्ये आला. या खेळीनंतर आफ्रिकन क्रिकेटमधील भावी सुपरस्टार अशी त्याची ओळख बनली आहे.

ब्रेविस हा डीव्हिलियर्सचा मोठा फॅन आहे. विशेष म्हणजे तो डीव्हिलियर्सच्या शाळेचाच विद्यार्थी आहे. त्याच्या शाळेच्या कार्यक्रमात डीव्हिलियर्स आला होता तेव्हा त्याला भेटण्याची आणि त्याच्याकडून क्रिकेटमधील काही अविस्मरणीय गोष्टी ऐकण्याची संधी त्याने सोडली नाही. लॉक डाऊनच्या काळात तो डीव्हलियर्सच्या नियमित संपर्कात होता. आपल्या क्रिकेट बद्दलच्या सर्व शंकांना त्याने सविस्तर उत्तर दिल्याचे ब्रेविसने ‘इएसपीएन क्रिकइन्फोला’ सांगितले आहे.

IPL 2022 Mega Auction, Explained: इशान किशन विराट कोहलीपेक्षाही महागडा का ठरला?

RCB कडून खेळण्याची होती इच्छा

ब्रेविस डीव्हिलियर्ससह विराट कोहलीचाही (Virat Kohli) फॅन आहे. आयपीएलमध्ये आणि विशेषत: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळण्याची त्याची इच्छा होती. पण, आरसीबीनं त्याच्यासाठी बोली लावलीच नाही. ब्रेविसवर मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या टीमनी बोली लावली होती.

तरूण खेळाडूंना इतरांपेक्षा लवकर ओळखणे आणि त्यांना मोठ्या स्पर्धेसाठी तयार करणे ही मुंबई इंडियन्सची खासियत आहे. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल चहर, मार्को जेन्सन यांना मुंबईनं याचपद्धतीनं इतरांपेक्षा लवकर खरेदी करत तयार केले. आता आगामी काळात बेबी डीव्हिलियर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसला देखील मुंबई इंडियन्सच्या सिस्टमचा फायदा (MI Future Baby AB) होणार आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: