फोटो – ट्विटर

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. आयपीएलचा 15 वा सिझन यंदा होणार असून त्यासाठी खेळाडूंचे मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या ऑक्शनसाठी 1 हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केले आहे. यामध्ये 318 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे. टेस्ट क्रिकेटचा दर्जा असलेल्या देशातील क्रिकेटपटूंबरोबरच सहयोगी देशातील खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी सज्ज आहेत. विदेशी खेळाडूंमध्ये मिक्यो दोर्जी (Mikyo Dorji) या भूतानच्या एकमेव खेळाडूचा समावेश आहे.

छोट्या देशातील बडा क्रिकेटपटू

हिमालय पर्वतांच्या रांगेत वसलेला भूतान (Bhutan) हा एक छोटा देश आहे. या देशात फुटबॉल हा खेळ लोकप्रिय असला तरी आता क्रिकेटची लोकप्रियता देखील वाढत आहे. स्पोर्ट्स चॅनलवर दाखवले जाणारे क्रिकेट पाहून अनेक खेळाडू या खेळाकडे वळत आहेत. भूतानला आयसीसीने सहयोगी सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.

भूतानमधील मिक्यो दोर्जी (Mikyo Dorji)  हा आयपीएलसाठी रजिस्ट्रेशन करणारा पहिला खेळाडू बनला आहे. बड्या खेळाडूंच्या गर्दीत त्याला कुणी ‘भाव’ देणार का? हा प्रश्न आहे. पण, आयपीएल लिलाव हा नेहमीच नवोदीत खेळाडूंना मिळालेल्या मोठ्या किंमतीमुळे ओळखला जातो. तसेय मिक्यो हा फास्ट बॉलिंग ऑल राऊंडर आहे. आयपीएल टीमला या प्रकारातील खेळाडूंची सर्वात जास्त आवश्यकता असते. त्यामुळे त्याचे नशिब चमकू शकते.

4 भारतीय बॅटर जे होतील उद्याचे रोहित आणि विराट

मिक्योनं यापूर्वीच भूतानच्या क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो विदेशातील T20 लीगमध्ये खेळलेला पहिला क्रिकेटपटू आहे. मागील वर्षी नेपाळमधील एव्हरेस्ट प्रीमियर लीगमधील (Everest Premier League) ललितपूर पायरेट्स या टीमकडून खेळला आहे.

IPL टीममध्ये निवड झालेले सहयोगी देशाचे खेळाडू

नावदेशआयपीएल टीम
रायन टेन डोशेटनेदरलँडकोलकाता नाईट रायडर्स
चिराग सुरीयूएईगुजरात लॉयन्स
संदीप लामिछाने नेपाळदिल्ली कॅपिटल्स
अली खान अमेरिकाकोलकाता नाईट रायडर्स

भारताशी जुने कनेक्शन

‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार मिक्योचं भारतीय कनेक्शन जूने आहे. दार्जिलिंगमध्ये शाळेत असताना त्याने क्रिकेटकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरवले. त्यानं चेन्नईतील MRF पेस फाऊंडेशनमध्ये 2 वर्ष प्रशिक्षण घेतलं आहे. या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्याची टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni)  भेट झाली होती. त्यावेळी धोनीनं त्याला खेळात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला.

मिक्यो भूतानच्या अन्य खेळाडूंसोबत बंगालमधील क्रिकेटच्या कॅम्पमध्येही सहभागी झाला होता. कोरोनाचा मोठा फटका अन्य सहयोगी देशांच्या टीमप्रमाणेच भूतानलाही बसला आहे. त्यामुळे भूताननं गेल्या 2 वर्षांपासून क्रिकेट खेळलेलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला न मिळाल्यानं आपलं मोठं नुकसान झाल्याची व्यथा मिक्यो (Mikyo Dorji)  बोलून दाखवली आहे.

वास्तवाची जाणीव

आपल्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली तर त्याचा भूतानमधील क्रिकेटला मोठा फायदा होईल. येथील पालकांना क्रिकेटमधूनही मुलं आर्थिक कमाई करू शकतात याची जाणीव होईल, असे मिक्यो म्हंटलं आहे.

आपण नोंदणी केल्याचे समजतात अनेकांनी फोन करून अभिनंदन केलं आहे. पण ही फक्त पहिली पायरी आहे. प्रत्यक्ष निवड ही खूप लांबची प्रक्रिया असल्याची जाणीव त्याला आहे. आयपीएल स्पर्धेपेक्षाही बांगलादेश प्रीमियर लीग आणि श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये संधी मिळण्याची शक्यता आपल्याला जास्त असल्यानं भावी काळात त्यावर फोकस करणार असल्याचं मिक्यो (Mikyo Dorji) यावेळी स्पष्ट केले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: