फोटो – सोशल मीडिया

आयपीएल स्पर्धेत नेहमीच देशातील अनोळखी क्रिकेटपटूंना संधी मिळाली आहे. क्रिकेटविश्वाला फारसे माहिती नसलेले क्रिकेटपटूंना शोधण्यासाठी आयपीएल फ्रँचायझी खास टीम तयार करतात. ही टीम वर्षभर जगभरातील क्रिकेट स्पर्धा पाहून खेळाडूंची चाळणी करत असते. त्यामधूनच काही अपरिचित नावं आयपीएल ऑक्शनमध्ये निवडली जातात. यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) रमेश कुमार या प्रोफेशनल क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूची निवड कोलकाता नाईट रायडर्सनं (Who is Ramesh Kumar KKR?) केली आहे.

कोण आहे रमेश कुमार?

आयपीएल मेगा ऑक्शनच्या शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या भवितव्याचा फैसला होत होता. त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सनं (Kolkata Knight Riders) रमेश कुमारला 20 लाखांमध्ये करारबद्ध केले. त्याला खरेदी करताच केकेआरच्या ऑक्शन टेबलवरील टीममध्ये आनंदाचे वातावरण होते.

केकेआरची मॅनेजमेंट ज्याच्या समावेशानं आनंदी झाली तो रमेश कुमार कोण आहे?  हा प्रश्न अनेकांना पडला आहे. रमेश कुमार हा पंजाबचा आहे. पंजाबमधील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला सुपरस्टारचा दर्जा आहे. नरीन जलबादिया (Nariene Jalalabadia) या नावाने तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळखला (Who is Ramesh Kumar KKR?)  जातो.

रमेश हा एक आक्रमक बॅटर आहे. YouTube वर त्याच्या बॅटींगचा एक व्हिडीओ आहे. त्यामध्ये तो अगदी सहज सिक्स लगावताना दिसतोय. डाव्या हाताने बॅटींग करणाऱ्या रमेश कुमारनं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त 10 बॉलमध्ये 50 रन केले होते.

ट्रायलमध्ये प्रभाव

रमेश कुमारनं यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससाठी ट्रायल दिले होते. या ट्रायलमध्ये त्याने मॅनेजमेंटला प्रभावित केले. त्यानंतर त्यांनी त्याला आयपीएल टीममध्ये घेण्याचा निर्णय (Who is Ramesh Kumar KKR?) घेतला.

कोलकाता नाईट रायडर्सनं यापूर्वी 2014 आणि 2016 साली आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर 5 वर्षांनी 2021 मध्ये त्यांनी आयपीएल फायनल (IPL 2021 Final) गाठली होती. चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) त्यांचा फायनलमध्ये पराभव केला. कोलकातानं या मेगा ऑक्शनपूर्वी आंद्रे रसेल, सुनील नरीन आणि व्यंकटेश अय्यर यांना रिटेन केले होते.

IPL 2022 Mega Auction: मुंबई इंडियन्सचं भविष्य असलेला Baby AB कोण आहे?

कोलकाता नाईट रायडर्सची टीम :  व्यंकटेश अय्यर, नितिश राणा, श्रेयस अय्यर, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, आंद्रे रसेल, सुनील नरीन, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरूण चक्रवर्ती, सॅम बिलिंग्स, अनुकूल रॉय, रसिख सलाम, अभिजीत तोमर, प्रथम सिंह, अमन खान, रमेश कुमार, अशोक शर्मा, टीम साऊदी, अ‍ॅलेक्स हेल्स, मोहम्मद नबी, उमेश यादव, बी. इंद्रजीत आणि चमिका करूणारत्ने

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: