फोटो – ट्विटर, बीसीसीआय आयपीएल

आयपीएल स्पर्धेला जगातील सर्वात अवघड लीग का म्हंटले जाते हे मुंबई इंडियन्सनं विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals ) मॅचमध्ये दिसलं. या मॅचवर बहुतेक काळ मुंबई इंडियन्सचं वर्चस्व होतं. पण ललित यादव (Lalit Yadav) आणि अक्षर पटेल (Axar Patel) जोडीनं एकाच ओव्हरमध्ये मॅचचं चित्र (Delhi Won in 6 Balls) बदललं. कॅप्टन रोहित शर्मानं केलेली एक चूक मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण ठरली.

दिल्लीचा चिवट संघर्ष

मुंबई इंडियन्सच्या 178 रनचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खराब झाली होती. दिल्लीची निम्मी टीम 72 रनमध्ये आऊट झाली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्सचा विजय ही औपचारिकता असल्याचं वाटत होतं. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्येही दिल्ली कॅपिटल्सनं मॅच सोडली नव्हती शार्दुल ठाकूरनं (Shardul Thakur) 11 बॉलमध्ये 22 रनची आक्रमक खेळी करत दिल्लीला विजयाची आशा दाखवली.

शार्दुल आऊट झाल्यानंतर ललित यादव आणि अक्षर पटेल यांची जोडी जमली. त्यांनी वेगानं रन करत बॉल आणि रनचं अंतर कमी करण्यास सुरूवात केली. त्यानंतरही मुंबई इंडियन्सचं मॅचवर वर्चस्व होतं. दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 28 रन हवे होते.

रोहितची चूक भोवली

रोहित शर्मासाठी 18 वी ओव्हर टाकण्यासाठी अनुभवी जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स हे दोन पर्याय होते. त्यानंतरही रोहितनं टीमचा 6 बॉलर डॅनियल सॅम्सला ओव्हर देण्याचा निर्णय घेतला. रोहितच्या या निर्णयाचा पूर्ण फायदा ललित यादव आणि अक्षर पटेल जोडीनं (Delhi Won in 6 Balls) उचलला.

अक्षर पटेलनं पहिल्याच बॉलला सिक्स लगावत सॅम्सचं स्वागत केलं. त्यानंतर त्यानं पुढच्या बॉलला एक रन काढत ललितला स्ट्राईक दिली. सुरूवातीला शांतपणे बॅटींग करत असलेल्या ललित यादवनं निर्णायक क्षणी गियर बदलले. त्याने पुढच्या दोन बॉलवर आधी सिक्स आणि नंतर फोर लगावला. त्यानंतर त्यानं ओव्हरच्या पाचव्या बॉलवर एक रन काढला. अक्षर पटेलनं सहाव्या बॉलवर आणखी एक सिक्स लगावत मुंबई इंडियन्सचा मॅचमध्ये परतण्याचा मार्ग बंद केला. ललित अक्षर जोडीनं 6 बॉलमध्ये 24 रन केले. त्यामुळे दिल्लीला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये विजयासाठी फक्त 4 रनची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक होते. त्यांनी ती केली आणि मुंबई इंडियन्सला त्यांच्याच होम ग्राऊंडवर 4 विकेट्सनं पराभूत केले.

रोहित शर्मानं 18 वी ओव्हर बुमराह किंवा टायमल मिल्सला दिली असती तर ललित-अक्षर जोडीला इतकी मोकळी फटकेबाजी करता येणे अवघड झाले असते. पण रोहितनं केलेली चूक मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं कारण (Delhi Won in 6 Balls) ठरली.

इशानचा तडाखा

इशान किशन दिल्ली विरूद्ध (Delhi Capitals) बॅटींगला उतरला तेव्हा त्याच्यावर मोठा दबाव होता. सर्वांच्याच डोक्यात त्याला मेगा ऑक्शनमध्ये मिळालेली मोठी किंमत होती. सूर्यकुमार यादव नसल्यानं मुंबईच्या मिडल ऑर्डरमध्ये सिनिअर खेळाडूची अनुपस्थिती होती. त्यातच रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्यांदा आऊट झाल्यानं इशानवर दबाव वाढला होता. त्याला संपूर्ण 20 ओव्हर्स खेळण्याचं आव्हान होतं.

पहिल्या मॅचमधील चेन्नई सुपर किंग्सच्या पराभवाची 5 कारणं

इशाननं हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. त्याने संपूर्ण 20 ओव्हर्स बॅटींग केली. एका बाजूने विकेट पडत असतानाही इशान खंबीरपणे उभा होता. तो नुसता मैदानात उभा राहिला नाही, तर त्याने सातत्यानं 100 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन केले. पहिल्या 25 बॉलमध्ये 140 च्या स्ट्राईक रेटनं खेळणाऱ्या इशाननं त्यानंतरच्या 23 बॉलमध्ये 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं रन केले. इशाननं 48 बॉलमध्ये 168.75 च्या सरासरीनं नाबाद 81 रन केले. या खेळीत त्यानं 11 फोर आणि 2 सिक्स लगावले. इशानच्या आक्रमक खेळामुळेच मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटींग करत दिल्ली कॅपिटल्ससमोर विजयासाठी 178 रनचं टार्गेट ठेवलं होतं.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error:

Discover more from Cricket मराठी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading