फोटो – सोशल मीडिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. आगामी सिझनमध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि गुजरात टायटन्स (GT) या दोन नव्या टीम सहभागी होत आहेत. त्यामुळे एकूण टीमची संख्या 10 झाली आहे. या टीमची विभागणी दोन ग्रुपमध्ये (IPL 2022 Groups) करण्यात आली आहे.

2 ग्रुप का?

आयपीएल स्पर्धेत यापूर्वी 8 टीम होत्या. त्यावेळी लीग स्टेजच्या मॅच राऊंड रॉबिन पद्धतीनं होत. त्यानुसार प्रत्येक टीम एकमेकांच्या विरूद्ध 2 मॅच अशा एकूण 14 मॅच खेळत असे. आता टीम 10 झाल्या असल्या तरी प्रत्येक टीम एकूण 18 नाही तर 14 मॅच खेळणार आहेत. 2 महिने होणारी आयपीएल स्पर्धा आणखी काळ लांबू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

यानुसार 10 टीमची विभागणी 2 ग्रुपमध्ये करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 टीम आहेत. सर्व टीम आपल्या ग्रुपमधील टीमसोबत 2 तर दुसऱ्या ग्रुपमधील टीमसोबत 1 मॅच खेळणार आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ग्रुपमधील एका टीमसोबत एक अतिरिक्त मॅच देखील टीम खेळणार आहे.   

LSG Squad Analysis: कशी आहे 2022 ची लखनौ? पहिल्याच सिझनमध्ये किती ‘गंभीर’?

कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या टीम?

ग्रुप A मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टीम आहेत. तर ग्रुप B मध्ये चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या टीमचा (IPL 2022 Groups) समावेश आहे.

IPL 2022 मधील ग्रुप

ग्रुप Aग्रुप B
मुंबई इंडियन्स (MI)चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)सनरायझर्स हैदराबाद (SRH)
राजस्थान रॉयल्स (RR)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
दिल्ली कॅपिटल्स (DC)पंजाब किंग्ज (PBKS)
लखनौ सुपर जायंट्स (LSG)गुजरात टायटन्स (GT)

कशी झाली टीमची रचना?

आयपीएल टीमची रचना त्यांनी किती वेळा विजेतेपद पटकावलं आहे, तसंच किती वेळा फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्या आधारे करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सनं (M) सर्वात जास्त 5 वेळा तर चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) त्यानंतर 4 वेळा विजेतेपद पटकावलं आहे. त्यामुळे या दोन टीम वेगळ्या गटामध्ये आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) 2 वेळा विजेतेपद पटकालं आहे. त्यामुळे त्यांचा तिसरा क्रमांक आहे. हैदराबाद आणि राजस्थान यांनी प्रत्येकी एक विजेतेपद पटकावलं असलं तरी हैदराबादनं दोन वेळा फायनल खेळली आहे. त्यामुळे त्यांना राजस्थानच्या आधी स्थान देण्यात आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) तीन वेळा फायनल खेळली आहे. त्यामुळे त्यांचा राजस्थान नंतर क्रमांक आहे. दिल्ली आणि पंजाबनं प्रत्येकी एक वेळा फायनल खेळली आहे. इंग्रजी अल्फाबेटप्रमाणे त्यांचा क्रमांक ठरवण्यात आलाय. तर लखनौ आणि गुजरात या दोन नव्या टीमची विभागणी त्यांच्या किंमतीनुसार करण्यात (IPL 2022 Groups) आली आहे.

Gujrat Titans Squad Analysis: कशी आहे IPL 2022 मधील गुजरातची टीम? नव्याची नवलाई की गोंधळाचा गरबा?

दुसऱ्या ग्रुपमधील कोणत्या टीमशी 2 मॅच

सर्व टीम आपल्या ग्रुपमधील टीमशी 2 मॅच खेळणार असून अन्य ग्रुपमधील एका टीमशी दोन तर अन्य टीमशी एक मॅच खेळणार आहे. भिन्न ग्रुपमधील कोणत्या मॅच दोन वेळा होणार आहेत ते पाहूया (IPL 2022 Groups)

मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स
कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद
राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध पंजाब किंग्ज
लखनौ सुपर जायंट्स विरूद्ध गुजरात टायटन्स

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: