फोटो – बीसीसीआय, आयपीएल

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. यंदाच्या मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) मुंबईत बदल झाला आहे. पांड्या बंधू, बोल्ट, डी कॉक हे आता दुसऱ्या टीममध्ये आहेत. त्यानंतरही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) सहकाऱ्यांना कमी लेखण्याची चूक कुणीही करणार नाही. या टीममध्ये T20 क्रिकेटचा तगडा अनुभव असलेले खेळाडू आहेत. त्याचबरोबर काही नवे खेळाडू देखील या ऑक्शननंतर दाखल झाले आहेत. मुंबई इंडियन्सचे 3 अंडर रडार खेळाडू (MI Under Radar Players) या आयपीएलमध्ये दिग्गजांना धक्का देऊ शकतात.

तिलक वर्मा (Tilak Varma)

आयपीएल ऑक्शनपूर्वी फक्त 1 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव असलेल्या तिलक वर्माला मुंबई इंडियन्सनं 1 कोटी 70 लाखांना खरेदी केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतून (Under 19 World Cup 2020) पुढे आलेल्या तिलकच्या कारकिर्दीला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत निर्णायक वळण लागू शकते.

डाव्या हाताने बॅटींग आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन बॉलिंग करणारा तिलक पहिल्या मॅचपासून प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची शक्यता आहे. तिलकचा T20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 143.77  आहे. लिस्ट A मधील एका मॅचमध्ये त्याने नाबाद 156 रनची खेळी केली आहे. जुन्या मुंबई इंडियन्समधील इशान किशनचा रोल तिलकला मिळणार आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये चांगलीच तोडफोड (MI Under Radar Players) करू शकतो.

मुरूगन अश्विन (Murugan Ashwin)

अश्विननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडूकडून सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. तो यापूर्वी रायझिंग पुणे सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज या आयपीएल टीमकडून खेळला आहे. अश्विनमध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे. पण, त्याला आजवर कधीही आयपीएल स्पर्धेत सातत्यानं संधी मिळाली नाही.

मुंबई इंडियन्सनं अश्विनची उपयुक्तता लक्षात घेऊन त्याला यंदा करारबद्ध केलंय. मयांक मार्कंडेय, राहुल चहर या लेगस्पिनर्सच्या करिअरना मुंबई इंडियन्समध्ये चांगला ब्रेक मिळाला. आता अश्विनच्या करिअरलाही मुंबई इंडियन्समध्ये नवी उंची मिळू शकते.

IPL 2022 Mega Auction, Explained: इशान किशन विराट कोहलीपेक्षाही महागडा का ठरला?

फॅबियन अ‍ॅलन (Fabian Allen)

वेस्ट इंडिज क्रिकेट टीममधील उपयुक्त ऑलराऊंडर असलेल्या अ‍ॅलनला आयपीएल स्पर्धेत फारशी संधी मिळालेली नाही. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि पंजाब किंग्ज (PBKS) या दोन्ही टीमनं त्याला बहुतेक काळ बेंचवर बसवले होते. अ‍ॅलन लोअर ऑर्डरमधील उपयुक्त बॅटर, इकोनॉमिकल स्पिनर आणि भन्नाट फिल्डर असं T20 क्रिकेटचं योग्य पॅकेज आहे.

अ‍ॅलननं 69 T20 मध्ये 42 विकेट्स घेतल्या असून 148.51 च्या स्ट्राईक रेटनं 750 रन केले आहेत. मुंबई इंडियन्सनं त्याला नियमित संधी दिली तर तो टीमसाठी मॅचविनर (MI Under Radar Players) ठरू शकतो.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: