फोटो – बीसीसीआय, आयपीएल

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आयपीएल 2022 मधील पहिल्या 4 मॅच गमावल्या आहेत. आता स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रत्येक मॅच मुंबईसाठी महत्त्वाची आहे. टीमनं यापूर्वीही अशा परिस्थितीमधून कमबॅक केलंय. मुंबईच्या फॅन्सना यंदा त्यांच्या जुन्या खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. मागील सिझनमधील खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती टीम बलाढ्य होतीच, यात वाद नाही. मुंबईची ही टीम देखील खराब नाही. मुंबई इंडियन्सला या सिझनमध्ये यशस्वी होण्यासाठी 3 बदल करण्याची आवश्यकता (3 Changes For MI Success) आहे.

सूर्यकुमार यादवचा क्रमांक

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) दुखापतीमुळे पहिल्या 2 मॅच खेळता आल्या नाहीत. त्यानंतरच्या दोन मॅचमध्ये त्यानं त्याची भरपाई केली आहे. सूर्यानं आत्तापर्यंत 2 मॅचमध्ये 164.38 च्या स्ट्राईक रेटनं 120 रन केले आहेत. यामध्ये 2 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. या दोन्ही मॅचमध्ये सूर्या चौथ्या क्रमांकावर बॅटींगला आला होता.

पहिल्या 4 मॅचमध्ये 7 ते 16 ओव्हर्समध्ये मुंबईचा स्ट्राईक रेट सर्वात कमी म्हणजेच प्रती ओव्हर 6.75 आहे. फॉर्मातील सूर्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला मिळाल्यास त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. सूर्या मुंबई इंडियन्सच्या बॅटींगचा आधारस्तंभ आहे. त्याला जास्तीत जास्त बॉल खेळायला मिळण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची गरज (3 Changes For MI Success) आहे.

रोहित शर्माला काय झालंय? आकडेवारी पाहून बसणार नाही विश्वास

टीम डेव्हिडचा समावेश

मुंबई इंडियन्सनं मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction)  टीम डेव्हिडला (Tim David) 8 कोटी 25 लाखांना खरेदी केले होते. जगभरातील खेळाडूंचा अभ्यास करून त्यांच्यातील योग्य टॅलेंट शोधणाऱ्या मुंबईच्या मॅनेजमेंटनं डेव्हिडवर इतका पैसा विचार करूनच लावला असणार. तो विचार उतावीळपणे दोन मॅचनंतर मोडीत काढण्यात अर्थ नाही.   

T20 क्रिकेटमध्ये आक्रमक बॅटींगची क्षमता डेव्हिडनं जगभरातील लीगमध्ये सिद्ध केली आहे. तो स्पिन बॉलिंगचा चांगला हिटर मानला जातो. त्याचा T20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 159 आहे. डेव्हिड आजवर आयपीएलमध्ये दोन वर्षांमध्ये मिळून फक्त 3 मॅच खेळला आहे. मुंबईनंही त्याला दोन मॅचनंतर बाहेर बसवलंय. लियाम लिव्हिंगस्टोनही या आयपीएलपूर्वी भारतामध्ये यशस्वी नव्हता. दोन मॅचनंतर त्याच्याबद्दलचा सर्वांचा विचार बदलला आहे.

डेव्हिडमध्येही तो विचार बदलण्याची क्षमता आहे. त्याला संधी द्यायला (3 Changes For MI Success) हवी. त्याला प्लेईंग 11 मध्ये नियमित खेळवल्यास पोलार्डवरील फिनिशरचा ताणही कमी होईल.

दोन विदेशी फास्ट बॉलर्सचा समावेश

मुंबई इंडियन्सच्या यशाचा आजवरचा हा फॉर्म्युला आहे. त्यांच्या टीममध्ये नेहमीच 2 विदेशी फास्ट बॉलर्स खेळले आहेत. पहिल्या तीन मॅचमध्येही टायमल मिल्स (Tyml Mills) सर्वात यशस्वी बॉलर होता. त्याला आरसीबी विरूद्धच्या चौथ्या मॅचमध्ये खेळवण्यात आलेच नाही. ती चूक तातडीनं सुधारणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रिले मेरिडेथ (Riley Meredith) हा ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर मुंबई इंडियन्सकडं आहे.

बिग बॅश लीग गाजवणाऱ्या मेरिडेथकडं सातत्यानं 140 किमी पेक्षा वेगानं बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याची ही क्षमता प्रतिस्पर्धी टीमसाठी डोकेदुखी आणि मुंबई इंडियन्सच्या खराब बॉलिंगचं उत्तर ठरू (3 Changes For MI Success) शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: