फोटो – बीसीसीआय, आयपीएल

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीचं (Virat Kohli) एक सुंदर वाक्य आहे. विराट म्हणतो, ‘तुम्ही फॉर्ममध्ये असता तेव्हा त्याचा अनादर करू नका’. विराटचं हे वाक्य आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) या सिझनमधील कामगिरीवर अवलंबून आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईनं सलग 2 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या होत्या. त्यावेळी ती जगातील सर्वात बेस्ट टीम वाटत होती. या सर्वोच्च बिंदूनंतर सलग दुसऱ्या वर्षी त्यांना ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश करणे जमले नाही. यंदा तर या टीमनं पहिल्या सलग 8 मॅच हरण्याचा आयपीएल रेकॉर्ड केलाय. मुंबई इंडियन्सनं दोन वर्षात ‘टॉप ते बॉटम’ असा प्रवास इतर टीमच्या चांगल्या कामगिरीमुळे नाही तर त्यांच्याच घोळामुळे (IPL 2022 MI Review) केला आहे.  

इधर चला मैं… उधर चला..

मुंबई इंडियन्सची यंदाची टीम ही एकसमान कल्पनेतून नाही तर वेगवेगळ्या कल्पनेतून खेळताना दिसली. कुणाला भविष्याचा विचार करायचा होता, कुणाला तात्पुरत्या अडचणीतून मात करायची होती. कुणाला ब्रेविस आवडत होता.. तर कुणाचा थम्पीवर विश्वास होता. थोडक्यात ऋतिक रोशनच्या, ‘इधर चला मै… उधर चला..’ या गाण्याप्रमाणे मुंबईचा खेळ होता. त्यामुळे त्या खेळाचा शेवटही या गाण्यातील ओळीप्रमाणे ‘मैं फिसल गया’ असा झाला. त्यामुळे फॅन्सना ‘ये तुने क्या किया?’ असं म्हणावं लागलं.

मुंबई इंडियन्सचा हा गोंधळ सुरू ऑक्शनपासूनच (IPL 2022 MI Review) झाला. जोफ्रा आर्चर यंदा खेळणार नाही हे माहिती असूनही त्यांनी त्याच्यात मोठी गुंतवणूक केली. बुमराहचा मागील वर्षीचा जोडीदार ट्रेन्ट बोल्ट त्यांना परत मिळवता आला नाही. त्यासाठी त्यांनी जयदेव उनाडकत, टायमल मिल्स आणि डॅनियल सॅम्स हे तीन डावखुरे बॉलर घेतले. यापैकी फक्त सॅम्सनं काही प्रमाणात त्याच्याकडील अपेक्षा पूर्ण केल्या.

काय बिघडलं?

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मावर (Rohit Sharma) यंदा बॅटींगची मोठी भिस्त होती. रोहितसाठी हा सर्वात खराब आयपीएल सिझन ठरला. त्याला संपूर्ण सिझनमध्ये एकही हाफ सेंच्युरी झळकावता आली नाही. टीम डेव्हिडला टीममधून वगळण्याचा निर्णय मुंबईच्या अंगाशी आला.

रिले मेरीडेथला सर्व बॉलिंगचे पर्याय झाल्यानंतर वापरण्यात आले. कायरन पोलार्ड सपशेल फेल गेला. त्यामुळे त्याला अखेर प्लेईंग 11 मधून वगळावे लागले. इशान किशननं सर्वात जास्त रन काढले, पण त्याला अजूनही खणखणीत स्ट्राईक रेट गाठता आला नाही. ऑक्शनमध्ये चांगला स्पिनर न घेतल्याचा फटका मुंबईला पुन्हा एकदा बसला. जसप्रीत बुमराहाला पहिल्या 10 मॅचमध्ये फक्त 5 विकेट्स घेता आल्या होत्या. या सर्व कारणांमुळे मुंबई इंडियन्सला 14 पैकी 4 विजय मिळवता आले आणि त्यांनी शेवटचा क्रमांक (IPL 2022 MI Review) गाठला.

IPL 2022: रोहित शर्माला काय झालंय? आकडेवारी पाहून बसणार नाही विश्वास

काय जमलं?

कायरन पोलार्ड फेल गेला असला तरी मुंबई इंडियन्सला त्याचा वारसदार टीम डेव्हिड याच सिझनमध्ये सापडला आहे. डेव्हिडनं शेवटच्या काही मॅचमध्ये त्याची क्षमता दाखवून दिलीय. तो आगामी काळात मुंबईचा मोठा मॅच विनर होईल. सूर्यकुमार यादवनं या सिझनमध्येही त्याच्या खेळाचा दर्जा उंचावत आपण मुंबईचा ‘मिस्टर डिपेंडबल’ असल्याचं दाखवून दिलंय.

मुंबई इंडियन्ससाठी या सिझनमधील सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे तिलक वर्माचा (Tilak Varma) उदय आहे. 19 वर्षांच्या तिलकनं मिडल ऑर्डरमधील महत्त्वाच्या नंबरवर वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सहज खेळ केला. त्यानं सूर्यकुमारला भक्कम साथ दिली. ‘तो लवकरच टीम इंडियाक़डून तीन्ही प्रकारात खेळेल,’ हे रोहित शर्माचे वाक्य त्याची क्षमता दाखवून देणारे आहे. टीम इंडियाला भविष्यातील आणखी एक स्टार मुंबई इंडियन्सनं त्यांच्या सर्वात खराब सिझनमध्येही (IPL 2022 MI Review) दिला आहे.

स्पर्धेतील क्रमांक10
सर्वात खराब क्षणलखनौ सुपर जायंट्स विरूद्ध दुसऱ्यांदा झालेला पराभव
सर्वात आनंदी क्षणगुजरात टायटन्सवर मिळवलेला विजय
सर्वात अपयशी खेळाडूकायरन पोलार्ड
सर्वात यशस्वी बॅटरइशान किशन
सर्वात यशस्वी बॉलरजसप्रीत बुमराह
लक्षवेधी खेळाडूतिलक वर्मा
पुढच्या वर्षी कुणाला काढावं?कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, जयदेव उनाडकत, बसील थम्पी

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: