फोटो – सोशल मीडिया

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही आयपीएल (IPL) स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईनं 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या पाच सीझनमध्ये विजेतेपद पटकावले आहे. ही पाचही जेतेपद रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टनसीमध्ये पटकावली आहेत. तर शेवटच्या तीन विजेतेपदामध्ये हेड कोच महेला जयवर्धनेच्या (Mahela Jayawardenea) मार्गदर्शाचा मोठा वाटा आहे. मागील सिझनचं (IPL 2021) अपयश धुऊन काढण्याचा निर्धार मुंबई इंडियन्सनं केला आहे. त्यासाठी टीमनं सरावालाही सुरूवात केलीय. नव्या सिझनच्या पहिल्याच दिवशी महेला जयवर्धनेनं खेळाडूंचा उत्साह वाढवणारे भाषण (Pep talk by Mahela) केले आहे.

काय म्हणाला महेला?

आयपीएल मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) मुंबई इंडियन्सची नव्यानं रचना झाली आहे. या टीममध्ये नव्या खेळाडूंचे आगमन झाले आहे. या नव्या मुंबई इंडियन्सनं मिशन आयपीएल 2022 सुरू झालं आहे. ही टीम आता एकत्र आलीय. त्यांनी एकत्र सरावाला सुरूवात केली आहे.

मुंबई इंडियन्सच्या सरावाच्या पहिल्या दिवशी महेला जयवर्धनेनं टीमला प्रेरणा देणारं भाषण केलं. मुंबई इंडियन्सनं या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भाषणात महेला म्हणाला की, ‘ तुमच्यापैकी अनेक जण पहिल्यांदा मुंबईच्या सराव सत्रात सहभागी झाले आहेत. काही जुने (रिटेन किंवा लीलावात घेतलेले) खेळाडू देखील आपल्यासोबत आहेत.

जुन्या, अनुभवी खेळाडुंशी चर्चा करा, तुमच्या डोक्यातील कल्पना खेळाडू, प्रशिक्षकांना सांगा. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अनेक गुणवान खेळाडू मिळाले आहेत. सराव सत्रात त्यांच्यावर कठोर मेहनत घेऊन वैयक्तिक आणि टीम हिताच्या दृष्टीनं त्यांच्या गुणांना,कौशल्याला आकार देण्याचा पुरेपुर प्रयत्न असेल.’

IPL 2022: मुंबई इंडियन्सची नवी शक्ती, 3 ‘अंडर रडार’ खेळाडू देणार दिग्गजांना धक्का!

प्रत्येक दिवस इथे तुम्हाला काहीतरी शिकवुन जाणार आहे याची मला खात्री आहे. मुंबई इंडियन्सचा ताफ्यात अनेक अनुभवी कोचेस आहेत त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वेगवेगळ्या आव्हांना सामोरं जाण्यासाठी तयार करण्याचा आमचा प्रयत्न (Pep talk by Mahela) असेल

कशी आहे मुंबईची टीम?

मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांना रिटेन केलं आहे. तर 15 कोटी 25 लाख इतक्या विक्रमी किंमतीत इशान किशनला (Ishan Kishan) खरेदी केले आहे. मुंबईची पहिली मॅच 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर दुपारी साडेतीन वाजता होणार आहे.

मुंबई इंडियन्सची संपूर्ण टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड, सॅम बिलिंग, तिलक वर्मा, संजय यादव, अनमोलप्रीत सिंह, डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंह, आर्यन जुयाल, टायमल मिल्स, जोफ्रा आर्चर, फॅबियन अ‍ॅलन, जयदेव उनाडकत, बसील थम्पी रिले मेरेडिथ, मयांक मार्कंडेय, मुरगन अश्विन, अर्शद खान, राहुल बुद्धी, ऋतिक शौकिन आणि अर्जुन तेंडुलकर

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: