फोटो – बीसीसीआय, आयपीएल

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेत दरवर्षी नवे खेळाडू उदयाला येतात. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अनेक खेळाडूंची क्रिकेट विश्वाला ओळख करून देण्याचं काम या स्पर्धेनं केलं आहे. यंदा आयपीएलमध्ये 10 टीम खेळत आहेत. त्यामुळे साहजिकच खेळाडूंची संख्याही वाढलीय. अनेक नवोदीत भारतीय खेळाडूंनी आयपीएल 2022 च्या (IPL 2022) सुरूवातीच्या टप्प्यात सर्वांना प्रभावित केलं आहे. जितेश शर्मा (Jitesh Sharma) हा पंजाब किंग्जचा (Punjab Kings) विकेट किपर त्यापैकी एक. आयपीएल पदार्पणातील मॅचमध्ये धोनीला आऊट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जितेशचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी खास कनेक्शन (Jitesh Sharma Story) आहे.

कोण आहे जितेश?

28 वर्षांचा जितेश 2013-14 पासून विदर्भातील सिनिअर टीमकडून क्रिकेट खेळतोय. तो 2016 साली मुंबई इंडियन्स टीमचाही सदस्य होता. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय असणारा जितेशचं पहिलं प्रेम क्रिकेट नव्हतं. दहावी-बारावी परीक्षेत मिळणाऱ्या 4 टक्के अतिरिक्त मार्कांसाठी त्यानं क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली.

जितेशने वयाच्या 17 व्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट बॅट हाती घेतली. टीममध्ये सामील होण्यासाठी आवश्यक अटी आणि नियम पूर्ण केल्यानंतर त्याने विकेटकिपींग सुध्दा केली. जितेशने विकेटकिपींगचे कोणत्याही प्रकारचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही. फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ आहे. फुटबॉलमधील कौशल्यांची त्याला विकेटकिपिंग करताना मदत झाली. क्रिकेटमध्ये राज्यस्तरीय पातळीवर खेळायला लागल्यानंतरही फुटबॉलमध्ये आपण प्रगती करू शकलो नाही, याची खंत जितेशला होती.

दमदार पदार्पण

मुंबई इंडियन्सकडून 2016 साली एकही आयपीएल मॅच जितेशला खेळता आली नाही. त्यानंतर सहा वर्षांनी 3 एप्रिल रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरूद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली. चेन्नईविरूद्ध 5 व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जितेशने 17 बॉलमध्ये 26 रन केले.

त्यानंतर विकेट किपिंगमध्ये अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीचा कॅच त्याने पकडला. धोनीच्या कॅचवेळी तर अंपायरनं सर्वप्रथम नॉट आऊट दिले होते. पण जितेशनं आग्रहानं कॅप्टन मयांक अग्रवालला थर्ड अंपायरकडं दाद मागायला लावली. जितेशचा विश्वास खरा ठरला. थर्ड अंपायरनं टीव्ही रिप्लेच्या आधारे धोनीला आऊट दिले. जितेशनं धोनीचा अगदी जवळचा कॅच घेऊन चेन्नईची विजयाची अंधूक आशा देखील संपवून टाकली.

पंजाब किंग्जनं मयांक अग्रवालला कॅप्टन केल्याची 3 प्रमुख कारणं…

सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबध

जितेशनं पंजाब किंग्जच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये लहाणपणा वायूदलात भरती होण्याचं स्वप्न असल्याचं सांगितलं आहे. जितेशच्या घरातील पार्श्वभूमी ही सैन्याशी संबंधीत आहे. त्याच्या पणजोबांचा नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्याशी जवळचा संबंध होता. ते नेताजींचे ड्रायव्हर होते. भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्यानंतर मलाही सैन्यात जाण्याची इच्छा होती,’ अशी आठवण जितेशनं सांगितली.

जितेशची कारकिर्द

जितेश शर्मानं T20 प्रकारात 55 मॅचमध्ये 28.22 च्या सरासरीनं आणि 142.03 च्या स्ट्राईक रेटने 1355 रन केले आहेत. त्यामध्ये 8 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीचा समावेश आहे. 16 फर्स्ट क्लास आणि 41 लिस्ट ए मॅचदेखील जितेश खेळला आहे. फर्स्ट क्लास मॅचमध्ये 24.04 च्या सरासरीनं 553 तर (Jitesh Sharma Story) लिस्ट ए क्रिकेटमध्ये 34.21 च्या सरासरीनं 1266 रन जितेशनं केले आहेत.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: