फोटो – ट्विटर, बीसीसीआय, आयपीएल

महान ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) हा टीमसाठी सर्वस्व ओतून खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानं आजवर बॉलनं अनेकदा मॅच जिंकून दिली आहे. त्याचबरोबर गरज पडल्यावर उपयुक्त बॅटींग करण्यासाठीही अश्विन ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया विरूद्ध सिडनी टेस्टमध्ये त्यानं केलेला संघर्ष कोणताही भारतीय फॅन कधीही विसरू शकणार नाही. या आयपीएलमध्ये (IPL 2022) अश्विन राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. राजस्थान रॉयल्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स (Rajasthan Royals vs Lucknow Super Giants) मॅचमध्ये अश्विननं त्याचं डोकं चालवून (Ashwin Retired out) सर्वांनाच थक्क केलं. आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

बॅटनं योगदान

लखनौ विरूद्घ टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटींगला आलेली राजस्थानची टॉप ऑर्डर चांगल्या सुरूवातीनंतर कोसळली. बिनबाद 42 वरून 4 आऊट 67 अशी राजस्थानची अवस्था झाली होती. त्यावेळी राजस्थानला समंजसपणे बॅटींग करणाऱ्या खेळाडूची गरज होती. त्यामुळे रियान परागच्या (Riyan Parag) आधी अश्विनला टीम मॅनेजमेंटनं मैदनात पाठवलं.

अश्विननं हेटमायरच्या सोबत पाचव्या विकेटसाठी 68 रनची पार्टनरशिप करत टीमचा स्कोर 135 पर्यंत पोहचवला. या पार्टनरशिपमध्ये अश्विनचं योगदान 23 बॉलमध्ये 28 रनचं होतं. त्यानं 121.33 च्या स्ट्राईक रेटनं बॅटींग करत या खेळीमध्ये 2 सिक्सही लगावले.

Explained: रवीचंद्रन अश्विन स्पिन बॉलर्समधील व्हिव रिचर्ड का आहे?

अश्विन Retired Out

अश्विन 23 बॉलवर 28 रन काढून खेळत असतानाच त्यानं हुशारीनं एक निर्णय घेतला. त्यानं अचानक मैदान सोडले. त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये अधिक फटकेबाजी करू शकेल अशा रियान परागला संधी दिली. अश्विनच्या या निर्णयाबाबत (Ashwin Retired out) आपल्याला काहीही कल्पना नव्हती, असं हेटमायरनं इनिंग संपल्यानंतर सांगितले.

परागनं 4 बॉलमध्ये 1 सिक्सच्या मदतीनं 8 रन केले. तर हेटमायरनं 36 बॉलमध्ये नाबाद 59 रनची खेळी करत राजस्थानला 165 हा सन्मानजनक स्कोर गाठून दिला.

मुंबई इंडियन्सच्या दारूड्या खेळाडूनं 15 व्या मजल्यावर लटकवलं… युजवेंद्र चहलचा जीवघेणा अनुभव, VIDEO

Retried Out आणि Retired hurt मध्ये फरक काय?

क्रिकेट विश्वात दुखापत झाल्यानं रिटायर हर्ट झाल्याची अनेक उदाहरण आहेत. पण रिटारय आऊट होण्याचं हे एकूण चौथं तर आयपीएलच्या इतिहासातील पहिलंच उदाहरण आहे. सर्वात प्रथम 2010 साली शाहिद आफ्रिदी या पद्धतीनं रिटायर आऊट झाला होता. रिटायर हर्ट झालेला खेळाडू काही वेळानं बॅटींग करण्यासाठी येऊ शकतो. तर रिटायर आऊट झालेला खेळाडू पुन्हा बॅटींगसाठी येऊ शकत नाही. हा दोन्हीमधील फरक आहे. अश्विननं शेवटच्या क्षणी रिटायर आऊट होत (Ashwin Retired out) टीमच्या भल्यासाठी निर्णय घेतला.

क्रिकेटमधील नियमांचा योग्य वापर करण्यासाठी अश्विन प्रसिद्ध आहे. आयपीएल 2019 मध्ये त्यानं बॉल टाकण्यापूर्वीच क्रिझ सोडून पुढं पळालेल्या जोस बटलरला रन आऊट केले होते. अश्विनची ती कृती क्रिकेटच्या नियमानुसारच आहे. त्यानंतरही ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ चा सोयीनं जप करणाऱ्या मंडळींनी त्यावर जोरदार टीका करत वाद निर्माण केला होता.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: