रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) पुण्यात झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) 13 रननं पराभव केला. आरसीबीनं या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. यापूर्वी आरसीबीचा सलग तीन मॅचमध्ये पराभव झाला होता. माजी आयपीएल चॅम्पियन टीमवर महत्त्वाच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यानं आरसीबी कॅम्पमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याचवेळी आरसीबीचा ऑल राऊंडर ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) आपण विराट कोहलीसोबत बॅटींग करणार नसल्याचं (Maxwell With Virat Kohli) जाहीर केलं आहे.  

नेमकं काय झालं?

मॅक्सवेलनं हा निर्णय जाहीर करण्यामागची पार्श्वभूमी आरसीबीच्या इनिंगमधील आहे. आरसीबीच्या इनिंगमधील 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. रवींद्र जडेजानं टाकलेल्या त्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विराटनं वेगानं एक रन काढण्यासाठी मॅक्सवेलला कॉल केला.

मॅक्सवेलनं विराटला प्रतिसाद दिला. नॉन स्ट्रायकरवरचा मॅक्सवेल क्रिझपर्यंत पोहचण्याच्या आत रॉबिन उथप्पानं चपळाईनं तो बॉल धोनीच्या हाती दिला. धोनीनं पुढचं काम पूर्ण केलं. मॅक्सवेल फक्त 3 रन काढून रन आऊट झाला.

मिस्टर फिनिशर दिनेश कार्तिक T20 वर्ल्ड कप टीममध्ये हवा कारण…

काय म्हणाला मॅक्सवेल?

आरसीबीनं विजय मिळवल्यानंतर संपूर्ण टीम आनंदी मुडमध्ये होती. त्यावेळी मॅक्सवेलनंही गंभीरपणे नाही तर मजेत आपण विराटसोबत पुन्हा बॅटींग करणार नसल्याचं जाहीर केलं. ‘मी तुझ्यासोबत (Maxwell With Virat Kohli) बॅटींग करू शकत नाही. तू खूप वेगानं पळतोस. खूप फास्ट. मी इतक्या वेगानं एक किंवा दोन रन घेऊ शकत नाही.’ असं सांगितलं.

मॅक्सवेलनं केलेल्या या मस्करीला विराटनंही मजेत उत्तर दिलं. ‘मॅक्सवेल हा क्रिकेट इतिहासातील सर्वात महान जखमी खेळाडू आहे,’ असे विराट म्हणाला. मॅक्सवेलनं त्याच्या बॅटींगमधील अपयश बॉलिंगमध्ये भरून काढलं. त्यानं रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडूची विकेट घेतली. मॅक्सवेलच्या बॉलिंगचं विराटनं यावेळी कौतुक केलं.

मॅचमध्ये काय झालं?

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर झालेल्या या मॅचमध्ये सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 8 आऊट 173 रन केले. आरसबीकडून महीपाल लोमरूरनं सर्वात जास्त 42 रन केले. तर दिनेश कार्तिकनं शेवटच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करत 17 बॉलमध्ये नाबाद 26 रन केले. सीएसकेकडून महीश तीक्षाणानं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

टीम इंडियाच्या दारावर ‘जम्मू एक्स्प्रेस’ ची धडक, स्पीड गननं करणार सर्वांची चाळण!

सीएसकेला 174 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांना 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 160 रनच करता आले. सीएसकेकडून डेव्हॉन कॉनवेनं सर्वात जास्त 56 रन केले. आरसीबीच्या हर्षल पटेलनं 35 रनमध्ये 3 विकेट्स घेतल्या. त्यालाच ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात (Maxwell With Virat Kohli) आले.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज करा.

error: