फोटो – बीसीसीआय, आयपीएल

आयपीएल 2022 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी (IPL 2022 Mega Auction) किती खेळाडूंना रिटेन करता येईल (IPL 2022 Retention Rules) याबाबतचे नियम बीसीसीआयनं तयार केले आहेत. रिटेन करता येणाऱ्या खेळाडूंच्या कमाल संख्येसोबतच नव्या टीमना मिळणारी सुविधा तसंच प्रत्येक टीमच्या बजेटबाबतचे नियमही बीसीसीआयनं निश्चित केले आहेत. पुढील आयपीएलमध्ये जुन्या आठ तसंच लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीमसह एकूण 10 टीम खेळणार आहेत.

यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये (IPL 2022 Mega Auction) डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि सुरेश रैना (Suresh Raina) या आयपीएल स्टार्सचा बऱ्याच कालावधीनंतर समावेश होण्याची शक्यता आहे. मागील आयपीएल स्पर्धा गाजवलेले शिखर धवन, हर्षल पटेल, शार्दूल ठाकूर, आवेश खान हे भारतीय खेळाडू कुठे जाणार याची देखील सर्वांना उत्सुकता असेल.

काय आहेत नियम?

आयपीएल स्पर्धेतील जुन्या आठ टीमला जास्तीत जास्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी आहे. तर नव्या टीम ऑक्शनच्यापूर्वी जास्तीत जास्त तीन खेळाडूंना आपल्या टीमसाठी करारबद्ध करू शकते. प्रत्येत टीमचं एकूण बजेट 90 कोटी रूपये असे. आठ जुन्या टीमना आपल्या रिटेन करणाऱ्या खेळाडूंची यादी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत बीसीसीआयला द्यावी लागेल. तर नव्या दोन टीमना 1 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान खेळाडूंना रिटेन (IPL 2022 Retention Rules) करावं लागेल.  

रोहित, विराटसह कोणते खेळाडू होणार रिटेन? वाचा सर्व अपडेट फक्त एका क्लिकवर

आठ जुन्या टीम जास्तीत जास्त तीन भारतीय खेळाडूंना रिटेन करु शकते. यामध्ये कॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले) आणि अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तर जुन्या टीमना जास्तीत जास्त 2 विदेशी खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी असेल. तर दोन नव्या टीमना जास्तीत जास्त 2 भारतीय खेळाडूंना रिटेन करता येईल त्यामध्ये एक अनकॅप्ड खेळाडूला रिटेन करण्याची त्यांना परवानगी असेल.

खेळाडूंना पैसे किती मिळणार?

बीसीसीआयनं रिटेन करणाऱ्या खेळाडूंचे बजेटही निश्चित केले आहे.

कोणत्याही टीमनं चार खेळाडू रिटेन केले तर 42 कोटी

तीन खेळाडू रिटेन केले तर 33 कोटी

दोन खेळाडू रिटेन केले तर 24 कोटी

एक खेळाडू रिटेन केला तर 14 कोटी रूपये टीमच्या एकूण बजेटमधून कट होतील. अनकॅप्ड प्लेयर रिटेन केला तर त्याला 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम देता येणार (IPL 2022 Retention Rules) नाही.

चार खेळाडू रिटेन केले तर..

पहिल्या खेळाडूला 16 कोटी रूपये, दुसऱ्या खेळाडूला 12 कोटी रूपये, तिसऱ्या खेळाडूला 8 कोटी रुपये तर चौथ्या खेळाडूला 6 कोटी रुपये देण्यात येतील

तीन खेळाडू रिटेन केले तर….

पहिल्या खेळाडूला 15 कोटी, दुसऱ्या खेळाडूला 11 कोटी, आणि तिसऱ्या खेळाडूला 7 कोटी रुपये मिळतील.

दोन खेळाडू रिटेन केले तर…

पहिल्या खेळाडूला 14 कोटी आणि दुसऱ्या खेळाडूला 10 कोटी रुपये मिळतील

एक खेळाडू रिटेन केला तर..

त्या खेळाडूला दरवर्षाला 14 कोटी रुपये द्यावे (IPL 2022 Retention Rules) लागतील.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: