फोटो : ट्विटर, बीसीसीआय आयपीएल

क्रिकेटमध्ये फिटनेसला अनन्यसाधारण महत्व आहे. केवळ इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच नव्हे तर क्रिकेट खेळणाऱ्या सर्वच टिमला फिटनेसचा मुद्दा महत्त्वाचा वाटू लागला आहे. टीम इंडियाच्या गेल्या काही वर्षातील कामगिरीत झालेल्या सुधारण्याचे कारण फिटनेस हेच आहे. प्रत्येक बोर्ड फिटनेस लेव्हल पडताळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती (उदा. यो यो टेस्ट) वापरते. त्या टेस्टमध्ये पास न झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय टीममध्ये संधी मिळत नाही. आयपीएल स्पर्धेत हे नियम लागू होत नाहीत. येथील पद्धत वेगळी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिटनेसमध्ये फेल गेलेल्या दोन खेळाडूंनी आयपीएल स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये टीमच्या विजयात निर्णायक भूमिका (Rajapaksa Hetmyer valuable inning) बजावली आहे.

वेस्टइंडीजचा मिडल ऑर्डर बॅटर शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer) आणि श्रीलंकेचा विकेट किपर- बॅटर भानूका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) यांनी पहिल्या आयपीएलम मॅचमध्ये दमदार कामगिरी केली आहे. राजपक्षेच्या बॅटींगनं पंजाब किंग्जला (Punjab Kings) 206 रनचं टार्गेट पूर्ण करण्यात मदत झाली. तर हेटमायरमुळे राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) 210 रन उभारले.

शिमरॉन हेटमामरचा करिष्मा

रॉयल चॅलेंजर्स बेंगुळरू आणि दिल्ली कॅपिटल्स ह्या टीमकडून खेळलेल्या हेटमायरला या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सने 8 कोटी 50 लाख इतक्या भरघोस किंमतीत खरेदी केले आहे. हैदराबाद विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये हेटमायरने 13 बॉल्समध्ये 32 रनची आक्रमक इनिंग (Rajapaksa Hetmyer valuable inning) खेळली. हेटमायरने या इनिंगमध्ये 3 सिक्स आणि 2 फोर लगावले. त्याने शेवटच्या ओव्हर्समध्ये केलेल्या या फटकेबाजीनं राजस्थानला 200 रनचा टप्पा ओलांडता आला. भारत दौऱ्यावर फेब्रुवारी महिन्यात आलेल्या वेस्ट इंडिजच्या टीममध्ये हेटमायरचा फिटनेसच्या कारणामुळे समावेश नव्हता.

राजपक्षेचे दमदार पदार्पण

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने भानूका राजपक्षेला फिटनेस न राखल्याबद्दल टीममधून वगळले होते. पंजाब किंग्जचा मुख्य विकेट किपर जॉनी बेअरस्टो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे राजपक्षेला Playing11 मध्ये संधी मिळाली. राजपक्षेनं या संधीचा पुरेपूर फायदा उठवत 4 सिक्सच्या मदतीने 22 बॉल्समध्ये 43 रन केले.

IPL 2022: पंजाब किंग्जनं मयांक अग्रवालला कॅप्टन केल्याची 3 प्रमुख कारणं…

राजपक्षेच्या या महत्वपूर्ण खेळीमूळे (Rajapaksa Hetmyer valuable inning) बेंगळुरू दिलेले 206 रन्सचं टार्गेट सहज पूर्ण केले. हेटमायर आणि राजपक्षेच्या खेळीमुळे त्यांच्या राष्ट्रीय टीमच्या फॅन्समध्ये फिटनेसच्या निकषांवर चर्चा सुरू होणार आहे. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकिर्दीलाही आयपीएलमुळे नवी उभारी मिळू शकते.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: