फोटो- ट्विटर, कोलकाता नाईट रायडर्स

टीम इंडियाच्या कॅप्टनसीची जबाबदारी यावर्षी विराट कोहलीच्या (Virat Kohli) खांद्यावरून रोहित शर्मावर (Rohit Sharma) आली आहे. विराट कोहली हा टीम इंडियाचा आजवरचा सर्वात यशस्वी कॅप्टन आहे. तर रोहित शर्मा देखील एक हुशार कॅप्टन म्हणून ओळखला जातो. पाच आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा रोहित हा एकमेव कॅप्टन आहे. तसंच तो टीम इंडियाचा पूर्णवेळ कॅप्टन झाल्यापासून भारतीय क्रिकेट टीमनं आजवर एकही मॅच हरलेली नाही. विराट आणि रोहित यांच्यात चांगला कॅप्टन कोण? अशी चर्चा क्रिकेट फॅन्समध्ये नेहमी रंगत असते. भारताचा मिडल ऑर्डरचा बॅटर आणि केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्यानं विराट किंवा रोहित नाही तर तिसरंच नाव (Shreyas Iyer on favourite Captain) सांगितलं.

कोण आहे आवडता कॅप्टन?

श्रेयस अय्यरनं भारतीय टीममधील सहकारी आणि लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) कॅप्टन के.एल राहुल (KL Rahul) हा आवडता कॅप्टन असल्याचं सांगितलं आहे. श्रेयसनं विराट किंवा रोहितचं नाव न घेता तिसरंच नाव घेतल्यानं तुम्ही चक्रावला असाल किंवा यामुळे नवा वाद निर्माण होईल असे तुम्हाला वाटलं असेल तर थांबा….हा तसा काहीही प्रकार नाही. श्रेयसनं राहुल आवडता कॅप्टन असल्याचं मजेशीर कारण सांगितलं आहे.

काय आहे कारण?

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या वनडे सीरिजमध्ये (India vs South Africa One Day Series) के. एल. राहुलच्या कॅप्टनसीमध्ये खेळण्याची संधी श्रेयसला मिळाली होती. श्रेयस त्या अनुभवाबद्दल म्हणाला की, ‘ राहुलच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव खूप चांगला होता. के. एल राहुल हा उत्कृष्ट खेळाडू आहे. मैदानावर आणि टीम मिटींगमध्ये त्याच्यातील आत्मविश्वास ठळकपणे दिसून येतो. तो टीममधील खेळाडूंना ज्या पध्दतीनं सपोर्ट करतो, विश्वास देतो ते नक्कीच कौतुकास्पद आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये श्रेयस अय्यरने 3 ओव्हर बॉलिंग केली होती. त्या स्पेलमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. राहुलनं कॅप्टन म्हणून आपल्याला तीन ओव्हर बॉलिंग दिली होती. यापूर्वी कोणत्याही कॅप्टननं मला एवढी बॉलिंग करण्याची संधी दिली नव्हती. या कारणामुळे राहुल माझा आवडता कॅप्टन (Shreyas Iyer on favourite Captain) आहे,’ असे श्रेयसने स्पष्ट केले आहे.

KKR Squad Analysis: कशी आहे 2022 ची कोलकाता? श्रेयसची टीम सुपरहिट होणार का?

टीम बदलल्या तरी जबाबदारी तीच!

के. एल राहुल आणि श्रेयस अय्यर गेल्या सीझनपर्यंत अनुक्रमे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचे भाग होते. अय्यरने 2018 ते 2020 या काळात तर राहुलने 2020 ते 2021 पर्यंत त्यांच्या टीमची कॅप्टनसी केली होती. या सीझनला दोघंही पंजाब आणि दिल्ली टीमचे सदस्य नाहीत. यंदाच्या पर्वात अय्यर कोलकात्ता नाईट रायडर्सचा कर्णधार असेल तर के. एल. राहुल लखनऊ सुपरजायंट्सचं नेतृत्व करेल.

अय्यर आणि के. एल. राहुल आपापल्या टीममधील सर्वाधिक किंमत मिळालेले खेळाडू आहेत. केकेआरची पहिली मॅच 26 मार्चला चेन्नई सुपरकिंग्स सोबत होईल तर लखनौची टीम 28 तारखेला गुजरात टायटन्स विरूद्ध खेळेल.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: