फोटो – ट्विटर, सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) 15 व्या सिझनची सुरूवात निराशाजनक केली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये (RR vs SRH) हैदराबादचा मोठा पराभव झाला. नव्या सिझनमध्ये नवी सुरूवात करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हैदराबादच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. हैदराबादच्या टीममधील न्यूझीलंडचा विकेट किपर-बॅटर ग्लेन फिलिप्सला कोरोनाची लागण (Glenn Philips Covid Positive) झाली आहे. फिलिप्सनं स्वत:चं इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे.

कधी झाली लागण?

सनरायझर्स हैदराबादने ग्लेन फिलिप्सला 1 कोटी 50 लाख रूपयांमध्ये खरेदी केले आहे. हैदराबादच्या बॅटींगला त्याच्या समावेशानं नवी आक्रमकता येईल अशी टीम मॅनेजमेंटला आशा आहे. त्याला कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्या या योजनेला धक्का बसला आहे. फिलिप्सला भारतामध्ये येण्यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो सध्या न्यूझीलंडमध्येच आहे.

ग्लेन फिलीप्सने इंस्टाग्रामवर स्टोरी च्या माध्यमातून या गोष्टीची माहिती दिली आहे. ‘जे लोक माझ्या विषयी विचारणा करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, माझी पीसीआर ट्रॅव्हल टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मी हैदराबाद टीममध्ये सामील होईन.’ असे फिलिप्सनं स्पष्ट केलं.

अनेक खेळाडू पहिल्या काही मॅचेसमधून बाहेर

आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचेस मध्ये अनेक दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार आहे. डेव्हिड वॉर्नर (David Warner), आरोन फिंच, मार्कस स्टॉयनिस, जोश हेझलवूड त्यांच्या टीमच्या पहिल्या मॅच खेळू शकले नाहीत. यापैकी काही जण आंतरराष्ट्रीय सीारिजमध्ये व्यस्त आहेत. तर काही अद्याप ऑस्ट्रेलियातच आहेत. वेस्ट इंडिजचे काही खेळाडू देखील इंग्लंड विरूद्धच्या सीरिजमुळे सुरूवातीला बाहेर आहेत.

IPL 2022: सनरायझर्सचा ‘सूर्य’ उगवणे ‘या’ 5 जणांच्या हाती!

या खेळाडूंवर मोठी जबाबदारी

ग्लेन फिलीप्सच्या अनुपस्थितीत (Glenn Philips covid positive) एडन मार्करम आणि केन विलियम्सनला (Kane Williamson) महत्वाचे योगदान द्यावे लागणार आहे. या दोघांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा फ्रेंचाईज बाळगून असणार आहे. याशिवाय वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅटर निकोलस पूरनची देखील या दोघांना साथ मिळणार आहे. 2016 नंतर सनरायझर्स हैदराबादला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. 2018 साली विलियम्सनच्या नेतृत्वाखाली हैदराबादला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. गेल्या सिझनमध्ये हैदराबादची टीम शेवटच्या क्रमांकावर होती.

हैदराबादचा मोठा पराभव

राजस्थान रॉयल्स विरूद्ध झालेल्या पहिल्या मॅचमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 61 रननं मोठा पराभव झाला. या मॅचमध्ये राजस्थाननं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 210 रन केले. त्याला उत्तर देताना हैदराबादला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 149 रन करता आले.

हैदराबादच्या टॉप ऑर्डरला या मॅचमध्ये साफ अपयश आले. केन विल्यमसन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी आणि निकोलस पूरन यापैकी एकालाही दोन अंकी रन करता आले नाहीत. एडन मार्कराम (नाबाद 57 ) आणि वॉशिंग्टन सुंदर (40) या दोघांनीच हैदराबादकडून प्रतिकार केला. आता या पराभवाला विसरून आगमी सिझनमध्ये दमदार कामगिरी करण्याचे आव्हान केन विल्यमसनच्या टीमपुढे आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: