फोटो – आयपीएल, बीसीसीआय

IPL 2021 मध्ये मैदानात आणि मैदानाबाहेरच्या खराब कामगिरीमुळे सनरायझर्स हैदराबादची टीम (Sunrisers Hyderbad) गाजली. या टीमनं 14 पैकी फक्त 3 मॅच जिंकल्या. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नर (David Warner) या टीमच्या सर्वात मोठ्या खेळाडूला आधी कॅप्टनपदारून आणि नंतर टीममधून काढले. आता आगामी सिझनसाठी सनरायझर्सनं तयारी सुरू केली असून यामध्ये टीमच्या कोचिंग स्टाफची नव्यानं रचना (SRH New Coach) केली आहे.

22 हजार रन करणारा बॅटींग कोच

सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्या आगमी सिझनचा कोचिंग स्टाफ जाहीर केला आहे. यामध्ये बॅटींग कोच आणि रणनीती सल्लागार म्हणून ब्रायन लाराची (Brian Lara) नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजचा माजी कॅप्टन असलेला लारा हा क्रिकेट विश्वातील महान बॅटर म्हणून ओळखला जातो.

लाराने 131 टेस्टमध्ये 52.88 च्या सरासरीनं 11953 रन काढले आहेत. यामध्ये 34 सेंच्युरी आणि 48 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. तर वन-डे क्रिकेटमध्ये लाराच्या नावावर 19 सेंच्युरी आणि 63 हाफ सेंच्युरीसह 10405 रन आहेत. हैदराबादची बॅटींग हा गेल्या काही सिझनपासून चिंतेचा विषय होती. यंदा मेगा ऑक्शननंतर (IPL 2022 Mega Auction) टीमची नव्यानं रचना करण्यात येणार आहे. त्यावेळी टीममध्ये दाखल होणाऱ्या बॅटर्सना थेट लाराचे मार्गदर्शन (SRH New Coach)  होईल. त्याचबरोबर मेगा ऑक्शनमध्येही लाराचा सल्ला हैदराबादला उपयुक्त ठरणार आहे.

‘स्टेन’गन दाखल

सनरायझर्स हैदराबादनं बॅटींगप्रमाणेच बॉलिंग कोच म्हणून दिग्गज खेळाडूची नियुक्ती केली आहे. क्रिकेट विश्वात स्टेनगन म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) टीमचा बॉलिंग कोच असेल. टेस्ट क्रिकेटमध्ये 439 विकेट्स घेणाऱ्या स्टेननं यावर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू हेमांग बदानीची (Hemang Badani) फिल्डिंग कोच म्हणून नियुक्ती (SRH New Coach)  करण्यात आली आहे. तसेच तो नव्या खेळाडूंना शोधण्याचे काम देखील करणार आहे. बदानी तीन वेळा तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) जिंकणाऱ्या चेपॉक गलीज टीमचा कोच होता.

कोणत्याही पिचवर आग निर्माण करणारा 21 व्या शतकातील सर्वात भेदक फास्ट बॉलर

चॅम्पियन पुन्हा हेड कोच

सनरायझर्स हैदराबादचे हेड कोच म्हणून अनुभवी ऑस्ट्रेलियन कोच टॉम मूडी (Tom Moody) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रेव्हर बेलिस यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. मुडी यांच्या मार्गदर्शनाखालीच (SRH New Coach) 2016 साली सनरायझर्सनं आयपीएल विजेतेपद पटकावले होते. श्रीलंकेचा महान बॉलर मुरलीधरनकडे स्पिन बॉलिंग कोच आणि रणनीतीकार ही जबाबादारी कायम ठेवण्यात आली आहे.

आयपीएलच्या आगामी ऑक्शनपूर्वी सनरायझर्स हैदराबादनं केन विल्यमसन (14 कोटी) अब्दुल समद (4 कोटी) आणि उमरान मलिक (4 कोटी) या तिघांना रिटेन केले आहे. आगामी ऑक्शनसाठी त्यांच्याकडे 68 कोटी शिल्लक आहेत.

सनरायझर्स हैदराबादाचा राशिदला रामराम, 11 ची सरासरी असणारा बॅटर रिटेन

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: