फोटो – बीसीसीआय, आयपीएल

फास्ट बॉलिंग भारतीयांसाठी इतर टीममध्ये बघण्याची गोष्ट केव्हाच संपली. आता भारतीय फास्ट बॉलर्स जगभरातील मैदान गाजवतात. इंग्लंड-ऑस्ट्रेलियात जाऊन त्यांच्याच मैदानात त्यांच्या टीमला पराभूतही करतात. भारतीय फास्ट बॉलर्सच्या सध्याच्या यादीत आणखी एक वेगळं नाव लवकरच दाखल होणार आहे. ते नाव क्रिकेट खेळणाऱ्या नेहमीच्या टीममधील नाही, तर जम्मूमधील आहे. जम्मूच्या उमरान मलिकनं (Umran Malik) आयपीएल स्पर्धेत ताशी 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत क्रिकेट विश्वात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उमरानचा सध्याचा फॉर्म (Umran Malik Speed Gun) पाहाता त्याला टीम इंडियातून जास्त काळ दूर ठेवणे निवड समितीला जमणार नाही.

संकटकाळी निवड

टीम संकटामध्ये असताना संधी मिळण्याचा प्रकार उमरानच्या बाबतीत दोनदा घडलाय. मागील आयपीएल स्पर्धेत टी. नटराजनला कोरोना व्हायरस झाल्यानं सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) त्यांचा नेट बॉलर असलेल्या उमरानची मुख्य टीममध्ये निवड केली, हे सर्वांना माहिती आहे.

जम्मू काश्मीरच्या अंडर 23 टीममध्येही त्याची याच पद्धतीनं निवड झाली होती. जम्मू काश्मीरच्या अंडर 23 गटातील टीमनं सलग 3 मॅच गमावल्या होत्या. त्यावेळी त्या टीमचा सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळणारा क्रिकेटपटू अब्दुल समदनं (Abdul Samad) कोच संजीव चौधरींकडे उमरानची शिफारस केली. समद स्वत:  उमरानच्या फास्ट बॉलिंगनं प्रभावित झाला होता. उमराननं समदच्या शिफारशीनंतर ट्रायल दिली आणि त्यानंतर त्याची टीममध्ये निवड (Umran Malik Speed Gun) झाली.

IPL पर्यंतचा प्रवास

वयाच्या 18 वर्षापर्यंत कधीही लेदर बॉलनं उमराननं क्रिकेट खेळलं नव्हतं. तो त्याच्या भावामुळे क्रिकेटकडं वळाला. ‘त्याच्या भावानंच त्याला रन कितीही गेले तरी फास्ट बॉलिंग कर, या प्रकारच्या फास्ट बॉलर्सची गरज असते,’ असा सल्ला दिला होता. भावाचा तो सल्ला उमराननं ऐकला. त्यानंतर जम्मूतील क्रिकेट अकादमीचे कोच आणि पुढे टीम इंडियाचा माजी फास्ट बॉलर इराफान पठाणनं (Irfan Pathan) त्याला घडवलं.

अब्दुल समदनं त्याच्या बॉलिंगचा व्हिडीओ सनरायझर्सच्या मॅनेजमेंटला पाठवला. सनरायझर्सनं त्याची नेट बॉलर म्हणून निव़ड केली. नेटमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर तो मुख्य टीममध्ये आला. उमराननं मागील आयपीएलमध्ये केकेआर विरूद्ध पदार्पण केलं तेव्हा सनरायझर्सचा कारभार आटोपला होता. त्यानंतरही त्यानं मर्यादीत मॅचमध्ये 150 किमीपेक्षा जास्त वेगानं बॉलिंग करत विराट कोहलीपासून (Virat Kohli) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आयपीएलनंतर यूएईमध्ये लगेच झालेल्या T20 वर्ल्ड कपमध्ये तो टीम इंडियाचा नेट बॉलर होता.

IPL 2022: सनरायझर्सचा ‘सूर्य’ उगवणे ‘या’ 5 जणांच्या हाती!

अपेक्षांचं ओझं पेललं

उमरान मलिक आणि अब्दुल समदला रिटेन करण्याचा निर्णय घेत सनरायझर्सनं सर्वांनाच धक्का दिला होता. रिटेन करण्यात आलेला खेळाडू म्हणून त्याच्यावर अपेक्षांचं मोठं ओझं होतं. समदला ते ओझं पेलता आलं नाही. तो काही मॅचनंतरच बाहेर गेला. उमराननं ते यशस्वीपणे पेललं आहे.

डेल स्टेनसारखा (Dayle Steyn) जागतिक क्रिकेटमधील अव्वल फास्ट बॉलर त्याला कोच म्हणून मिळालाय. स्टेनच्या मार्गदर्शनाखाली त्याची बॉलिंग आणखी बहरलीय. रनची चिंता न करता वेगानं बॉल टाकण्याच्या नैसर्गिक क्षमतेवर (Umran Malik Speed Gun) भर देण्याचा गुरूमंत्र स्टेननं उमरानला दिलाय.

उमरान देखील त्यामुळे अधिक जोमानं बॉलिंग करतोय. या सिझनमधील पहिल्या मॅचमध्ये सुरूवातीला धुलाई झाल्यानंतरही त्यानं जोस बटलरची विकेट घेतली. त्यानंतरच्या काही मॅच साधारण गेल्या, पण केकेआर विरूद्धची मॅच त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली.

टीम इंडियाच्या दारावर टकटक

केकेआर विरूद्ध उमराननं एक भन्नाट यॉर्करनं श्रेयस अय्यरची दांडी उडवली. उमरानला विचलित करण्यासाठा बाजूला सरकून मारण्याचा प्रयत्न श्रेयसनं केला होता. त्यानंतरही त्यानं (Umran Malik Speed Gun) स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवत यॉर्कर टाकला आणि केकेआरच्या कॅप्टनची दांडी उडवली. उमराननं घेतलेली ती विकेट पाहून डेल स्टेनच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.

उमरान फक्त श्रेयसची विकेट घेऊन थांबला नाही. तर त्यानं आंद्रे रसेलला संपूर्ण ओव्हर जखडून ठेवलं. संपूर्ण क्रिकेटविश्व आक्रमक बॅटींगनं गाजवणाऱ्या रसेलला उमरानच्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन करता आले.

केकेआर विरूद्धच्या कामगिरीनंतर मिळालेला आत्मविश्वास पंजाब किंग्ज विरूद्धही दिसला. त्या मॅचमध्ये उमराननं आयपीएलमधील त्याची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. इनिंगमधील शेवटची ओव्हर मेडन टाकत त्यामध्ये 3 विकेट्स घेण्याचं अवघड कामही उमराननं केलंय.

उमरानचा वेग ही त्याची सर्वात जमेची बाजू आहे. तो वेगच समोरच्या बॅटरला खेळताना विचार करायला भाग पाडतो. वेगाशी तडजोड न करता रन रोखणे आणि विकेट घेण्याचं कामही उमरान आता करू लागलाय. उमरानसाठी हा आयपीएल सिझन खूप महत्त्वाचा आहे. त्यानं हा सिझन गाजवला तर त्याची टीम इंडियातील एन्ट्री (Umran Malik Speed Gun) कुणीही रोखू शकणार नाही.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

        

error: