फोटो- सुयश प्रभुदेसाई, इंस्टाग्राम

आयपीएल स्पर्धा सुरू होण्यासाठी आता एक दिवसापेक्षा कमी अवधी राहिला आहे. सर्वच टीमनी सरावाला जोमाने सुरुवात केली आहे. आरसीबी देखील याला अपवाद नाही. आरसीबीच्या टीममध्ये कायम ‘स्टार खेळाडूंचा’ भरणा असतो. एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, शेन वॉटसन, युवराज सिंह सारखे मातब्बर खेळाडू बेंगळुरू टीमचा भाग होते. त्यानंतरही बेंगळुरूला आजवर एकही विजेतेपद मिळवता आले नाही. या सिझनमध्ये आरसीबीनं नव्या खेळाडूंची निवड केली आहे. त्यापैकी एकानं स्पर्धेपूर्वी चुणूक (Suyash Prabhudessai scores 87) दाखवली आहे.

आरसीबीची जय्यत तयारी

विराट कोहलीदेखील (Virat Kohli) या सिझनमध्ये आरसीबीचा कॅप्टन नसेल. त्याऐवजी फाफ ड्यू प्लेसिसची (Faf du Plessis) कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. फाफच्या कॅप्टनसीमध्ये विजेतेपद मिळवण्याचा आरसीबीनं निर्धार केलाय, तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. आरसीबीनं या तयारीचा भाग म्हणून टीम अंतर्गत मॅच खेळण्यावर भर (Intra Squad matches) दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये 5 बॅटर्सनी फॉर्मात असल्याचे संकेत दिले आहेत. या मॅचमध्ये ऑल राऊंडर सुयश प्रभुदेसाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

RCB Squad Analysis: कशी आहे IPL 2022 ची टीम बंगळुरू? यंदा आयपीएल जिंकणार का?

प्रॅक्टिस मॅचमध्ये ‘सुयश’

आरसीबीच्या प्रॅक्टीस मॅचमध्ये सुयशने 46 बॉल मध्ये 87 रन (Suyash Prabhudessai scores 87) केले. उजव्या हाताने बॅटिंग करणाऱ्या ऑल राऊंडरने आपल्या फटकेबाजीने टीममधील खेळाडूंची मनं जिंकली. सुयशला आरसीबीने 30 लाखांत आपल्या टीममध्ये समाविष्ट केले. प्रॅक्टिस मॅचच्या कामगिरीमूळे सुयश प्रभुदेसाईला यंदा अंतिम 11 खेळाडूंच्या यादीत स्थान मिळू शकते.

कोण आहे सुयश?

सुयश प्रभुदेसाईनं 2016-17 मधील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोव्याकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुयश आजवर 19 फर्स्ट क्लास , 34 लिस्ट ए तर 22 टी20 मॅच खेळला आहे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 42 च्या सरासरीनं 1158 रन केले आहेत. यामध्ये एक सेंच्युरी आणि 8 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये देखील त्याने 5 हाफ सेंच्युरी झळकावल्यात. T20 क्रिकेटमध्ये आक्रमक बॅटर म्हणून सुयशची ओळख आहे. सुयशने 22 T20 मॅचमध्ये 150 च्या स्ट्राईक रेटने 443 रन केले आहेत.

सुयश प्रभुदेसाई केवळ उत्तम बॅटरच नाही तर उपयुक्त बॉलरही आहे. त्याने फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि T20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 4, 4 आणि 2 विकेट्स काढल्या आहेत. आजपर्यंतच्या कारकिर्दीत सुयशला बॉलिंगची फारशी संधी मिळाली नसली तरी दोन्ही बाजुने बॉल स्विंग करण्याच्या कौशल्यामुळे तो आरसीबीचा सहावा बॉलिंग ऑप्शन ठरू शकतो. मॅक्सवेल, हेझलवूडसारखे खेळाडू सुरूवातीच्या मॅचेस मध्ये खेळणार नसल्याने जर सुयशला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली तर आश्चर्य वाटायला (Suyash Prabhudessai scores 87) नको.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: