फोटो – सोशल मीडिया

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 15 वा सिझन (IPL 2022) आता तोंडावर आला आहे. या सिझनमध्ये 2 नव्या टीम आहेत, त्यामुळे स्पर्धेतील एकूण टीमची संख्या ही 10 झाली आहे. यंदा सर्वच टीमची नव्यानं रचना झाली आहे. काही टीमचे कॅप्टन बदलले आहेत. तर यापूर्वी ज्युनिअर असणाऱ्या काही जणांना आता सिनिअर खेळाडूंचा रोल मिळाला आहे. या सर्वांबरोबरच कॉमेंट्री पॅनलमध्येही बदल झाला आहे. या आयपीएल सिझनमध्ये टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) कॉमेंट्री करणार आहेत. शास्त्री यांना हे क्षेत्र नवं नाही. आता या क्षेत्रातील दुसरी इनिंग सुरू करण्यापूर्वी त्यांनी आयपीएल स्पर्धेवर (Ravi Shastri on IPL) मोठं वक्तव्य केलं आहे.

पुन्हा हातामध्ये माईक!

गेल्या वर्षी पार पडलेल्या आयसीसी टी20 वर्ल्डकपनंतर (T20 World Cup 2021) शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. शास्त्री यांनी मुदतवाढीसाठी अर्ज केला नाही. त्यानंतर त्यांच्या जागी राहुल द्रविडची (Rahul Dravid) हेड कोच म्हणून नियुक्ती झाली.

Ravi Shastri Coach Review: लाख चुका असतील केल्या, केली पण…

शास्त्री यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपल्यानंत कोणत्या भुमिकेत पाहायला मिळतील याची सर्वांना उत्सुकता होती, काही रिपोर्ट्सनुसार शास्त्री यांना गुजरात टीमच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा झाली होती. पण, त्यात पुढे काही झालं नाही. ते आता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये परतल्यामुळे या सर्व चर्चांना.पुर्णविराम मिळाला आहे. भारतातील सर्वोत्तम कॉमेंटेटर्समध्ये शास्त्रींचा समावेश आहे.

ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार!

रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री बॉक्समधून अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक घटना कव्हर केल्या आहेत. युवराज सिंहनं एकाच ओव्हरमध्ये लगावलेले 6 सिक्स, वन-डे क्रिकेटमधील सचिनची डबल सेंच्युरी किंवा महेंद्रसिंग धोनीचा टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारा सिक्स या सर्व ऐतिहासिक प्रसंगांना शास्त्रींचा आवाज आहे. त्यांच्या जादूई आवाजातील या क्षणांची कॉमेंट्री आजही सर्वांच्या लक्षात आहे.

IPL बाबत मोठं वक्तव्य

शास्त्री त्यांच्या सडेतोड वक्तव्यासाठी नेहमीच प्रसिद्ध आहेत. आयपीएल स्पर्धेचे अधिकृत ब्रॉडकास्टर असलेल्या ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्येही त्याचे उदाहरण दिसले. या पत्रकार परिषदेत त्यांनी आयपीएल स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य केले. आयपीएल ही जगातील सगळ्यात श्रीमंत आणि आव्हानात्मक लीग म्हणून प्रसिद्ध आहेच त्याशिवाय ती एक उत्तम फिजीओसुद्धा आहे. कारण आयपीएलच्या ऑक्शनपूर्वी प्रत्येक खेळाडू फिट होण्यासाठी जीवापाड कष्ट करतो. सर्वच खेळाडूंना यामध्ये खेळण्याची इच्छा असते,’ असे शास्त्री यांनी (Ravi Shastri on IPL) म्हंटले आहे.

यावर्षी आयपीएलच्या गृप स्टेजमधील मॅचेस महाराष्ट्रात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय पाटील स्टेडियम आणि पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आयपीएल खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील पीचेस लाल मातीच्या साहाय्याने बनवली असल्याने पीचचा स्वभाव कळण्यास फार काळ लागणार नाही. मुंबईतल्या तिनही ग्राऊंडवर एकसारखे पीच असेल.

खेळाडू आणि कोच म्हणून ऑस्ट्रेलियातील ‘चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स’

कमाईचा विचार करणं सोडून देणं गरजेचं!

आयपीएलमध्ये तरूण आणि नवोदीत खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात त्याचं त्या खेळाडूंवर दडपण असतं का? या प्रश्नाला उत्तर देताना शास्त्री म्हणाले की, ‘चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल, स्पर्धेत यशस्वी व्हायचं असेल तर कमाईचा विचार सोडून देणं आवश्यक आहे. हे बोलणं जरी सोपं असलं तरी ती कृती प्रत्यक्ष अमलात आणणं कठीण आहे.

वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या टप्प्यावर तरूण खेळाडूंनी त्यांची वाटचाल योग्य दिशेने करायला हवी. खेळाडूंच्या वाटचालीचं कॅप्टननं नीट निरीक्षण करायला हवे. खेळाडूंवर असलेला ताण, दडपण कमी करण्यात कॅप्टनला यश आले तर तो चांगला कॅप्टन, चांगला माणूस ठरू (Ravi Shastri on IPL) शकतो.’

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: