फोटो – बीसीसीआय, आयपीएल

तो विराट कोहलीसोबत अंडर 19 वर्ल्ड कप खेळला आहे. त्याच्या नावावर आयपीएलमधील एक कधीही न मोडता येणारा रेकॉर्ड आहे. त्यानं टीमला आयपीएल फायनल जिंकून दिलीय. तो एक चपळ फिल्डर आहे. त्यानं ऑस्ट्रेलियात एक अप्रतिम शतक झळकावलंय. तो एक हुशार कॅप्टनही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी खेळात असूनही सातत्य नसल्यानं त्यानं टीम इंडियातील जागा गमावली. या आयपीएलमध्ये तो टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. तिथंही पहिल्या 3 मॅचमधील खराब कामगिरीनं मनिष पांडेचं (Manish Pandey IPL Flop Show) आयपीएल करिअर धोक्यात आलं आहे.

दमदार पदार्पण

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सेंच्युरी करणारा पहिला भारतीय असलेल्या मनिषला टीम इंडियात उशीरा संधी मिळाली. त्याने 2015 साली टीम इंडियात पदार्पण केलं त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हे टीममध्ये स्थिरावले होते. भारतीय मिडल ऑर्डरमध्ये अनेक दिग्गज खेळाडू असल्यानं मनिषला उशीरा संधी मिळाली.

2015 साली झिम्बाब्वे दौऱ्यात मनिषचं पदार्पण झालं. झिम्बाब्वे विरूद्धच्या सीरिजमधील शेवटच्या वन-डेमध्ये त्याला संधी मिळाली. त्या मॅचमध्ये पाचव्या क्रमांकावर बॅटींगला येत 71 रनची खेळी करत मनिषनं टीम इंडियाच्या विजयात हातभार लावला. त्यानंतर सहा महिन्यांनी ऑस्ट्रेलिया विरूद्ध सिडनीमध्ये झालेल्या वन-डेमध्ये 331 रनचा पाठलाग करताना मनिषनं नाबाद 104 रनची खेळी करत भारतीय टीमला विजय मिळवून दिला. हा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील सर्वोच्च क्षण आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 2016 साली झालेल्या सीरिजनंतर पुढील वर्ष मनिषला फार कमाल करता आली नाही. त्याचा परिणाम त्याच्या टीम इंडियातील करिअरवर झाला असं मानलं जातं. पण, त्याला सातत्यपूर्ण संधीही मिळाली नाही. विराटनं टीममधील जुन्या सहकाऱ्यावर अन्याय केला हे देखील खरं आहे. 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळण्याची त्याची संधी दुखापतीमुळे हुकली. मनिष तेव्हा फॉर्मात होता. त्याच्या करिअरला हा मोठा सेटबॅक ठरला. त्याचवेळी मनिषसारखाच पाचव्या किंव्या सहाव्या क्रमांकावर बॅटींग आणि कामचलाऊ बॉलिंग करू शकणाऱ्या केदार जाधवचा उदय झाला. त्यामुळे मनिष पांडेचं नाव (Manish Pandey IPL Flop Show) आणखी मागे पडलं.

सर्वात मोठी समस्या

मनिष पांडेची 39 T20 इंटरनॅशनलमध्ये 44.31 अशी चांगली सरासरी आहे. त्याच्या बॅटींगमधील सर्वात मोठी समस्या ही स्लो स्ट्राईक रेट आहे. त्याचा T20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट हा 123.79 आहे. हा स्ट्राईक रेट पाचव्या नंबरपासून खाली खेळायला येणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूला साजेसा नाही.

कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन करून टीमच्या स्कोरमध्ये योगदान देणाऱ्या खेळाडूंची पिढी आता उदयास आली आहे. सर्वच देशांच्या टीममध्ये या प्रकारचे खेळाडू आहेत. या स्पर्धेत मनिष मागं (Manish Pandey IPL Flop Show) पडला आहे.

5 खेळाडूंच्या जीवावर लखनौ घडवणार इतिहास, राहुल आर्मीची सर्वांना धास्ती

करिअरला धोका

मनिष पांडेच्या करिअरला सर्वात मोठा धोका या आयपीएलमध्ये निर्माण झाला आहे. त्याला मेगा ऑक्शनमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं 4 कोटी 60 लाखांना खरेदी केलं. लखनौचा मेंटॉर गौतम गंभीरसोबत पांडे केकेआरमध्ये खेळला आहे. त्यामुळे त्याने मोठ्या विश्वासानं पांडेला खरेदी केले. लखनौमध्ये त्याला त्याच्या बॅटींगला योग्य असलेल्या तीन नंबरवर खेळायला मिळतंय.

मनिषला टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवता आलेला नाही. त्याने गुजरात विरूद्ध 6, चेन्नई विरूद्ध 5 आणि हैदराबाद विरूद्ध 11 असे तीन मॅचमध्ये फक्त 22 केले आहेत. गुजरात आणि हैदराबाद विरूद्ध पहिली विकेट लवकर गेल्यानंतर एक बाजू लावून धरण्याची जबादारी मनिषवर होती, त्यामध्ये तो फेल गेला. तर सीएकेविरूद्ध मोठा स्कोअरचा पाठलाग करताना चांगली सुरूवात मिळाल्यानंतरही तिसऱ्या क्रमांकावरचा मनिष झटपट आऊट झाल्यानं टीम अडचणीत आली होती.

पहिल्याच मॅचमध्ये राशिद खानची धुलाई करणारा Ayush Badoni कोण आहे?

आयुष बदोनी हा फॉर्मात असलेला बॅटर लखनौच्या टीममध्ये सहाव्या क्रमांकावर बॅटींग करतोय. मनिषचा खराब फॉर्म कायम राहिला तर त्याची टीममधून हकालपट्ची होऊन आयुषला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन दिले जाऊ शकते. प्रचंड गुणवत्ता असूनही सातत्यपूर्ण खेळीच्या अभावामुळे करिअर धोक्यात आलेल्या मनिषसाठी (Manish Pandey IPL Flop Show) आता प्रत्येक मॅच महत्त्वाची आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

 

error: