फोटो – ट्विटर, बीसीसीआय, आयपीएल

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 मधील (IPL 2022) पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीनं नवी मुंबईत झालेल्या रंगतदार मॅचमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (RCB vs KKR) 3 विकेट्सनं पराभव केला. या आयपीएल सिझनमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीचा कॅप्टन नाही. कॅप्टनसीचं प्रेशर नसल्यानं ‘जुना विराट’ पाहायला मिळेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्याचवेळी केकेआर विरूद्ध विराटनं पुन्हा एकदा जुनी चूक केल्यानं (Virat Kohli Wicket vs KKR) आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

काय झाली चूक?

विराट कोहली केकेआर विरूद्ध पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलवर विकेट देऊन आऊट झाला. कोलकता नाईट रायडर्स विरूद्ध विराटनं सकारात्मक सुरूवात केली होती. पण, उमेश यादवच्या (Umesh Yadav) ओव्हरमध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला खेळण्याचा त्याचा प्रयत्न फसला. उमेशनं ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेल्या बॉलला विराटच्या बॅटची कड लागण्याचा अवकाश होता उरलेलं काम अनुभवी विकेट किपर शेल्डन जॅक्सननं पूर्ण केलं.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासूनच पाचव्या स्टम्पवर पडलेल्या बॉलवर विराटला संघर्ष करावा लागला. अनेक सेंच्युरी त्याच्या या नेहमीच्या चुकीमुळे पूर्ण झाल्या नाहीत. एकाच ठिकाणी, एकाच टप्प्यावर पडलेल्या बॉलवर विराट विकेट प्रतिस्पर्धी टीमला बहाल करतो, त्याने या त्रुटीवर उपाय शोधला पाहिजे अशी सूचना अनेक माजी क्रिकेटपटूंनी केली आहे. केवळ आफ्रिकाच नाही तर मायदेशात झालेल्या वेस्ट इंडिज आणि श्रीलंका सीरिजमध्ये देखील या प्रश्नाने विराटची पाठ सोडली नाही.

विराट कोहलीच्या खेळातील या त्रुटीचा उमेश यादवने योग्य फायदा उठवला. त्याने विराटला पुरेपूर अडचणीत आणले. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर कोहलीचा संयम सुटला आणि त्याने ऑफ स्टम्पच्या बाहेर टप्पा पडलेल्या बॉलवर रन वसूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत उमेशला दुसरी विकेट (Virat Kohli Wicket vs KKR) मिळवून दिली. विराट कोहलीच्यापूर्वी उमेशनं आरसीबीचा ओपनर अनुज रावतला भोपळा न फोडू देता माघारी धाडले होते. उमेशने या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 4 च्या इकॉनॉमी रेटने 16 रन देऊन दोन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या.

IPL 2022: कॅप्टनसी जाताच विराटचे दिवस फिरले, तब्बल 400 कोटींचा फटका!

कोलकाताचे बॅटर्स ढेपाळले

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कॅप्टन फाफ डू प्लेसीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग घेतली. आकाश दीप, हर्षल पटेल आणि वनिंदू हसरंगा यांनी अचूक बॉलिंगच्या जोरावर 128 रनवर कोलकत्ता नाईट रायडर्सला ऑल आऊट केले. उमेश यादव आणि वरूण चक्रवर्ती यांच्यात झालेल्या 27 रनच्या पार्टनरशिपमूळे कोलकाता 125 चा टप्पा पार करू शकली. आकाशने 3, हर्षलने 2 आणि हसरंगाने 4 विकेट घेतल्या. हसरंगाला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.

129 रनचं टारगेट मिळालेल्या आरसीबीची सुरूवात देखील फारशी चांगली झाली नाही. आरसीबीनं 17 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या. विली रुदरफोर्ड आणि शाहबाजच्या खेळीमुळे आरसीबीची मॅचवर पकड राहिली. त्यानंतरही श्रेयस अय्यरनं बॉलर्सचा योग्य वापर करत मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली.

शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकायला 7 रनची आवश्यकता होती. निदहास ट्रॉफीचा हीरो दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलच्या पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर लगावत आरसीबीला या सिझनमधील पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतरही विराटनं जुनीच चूक (Virat Kohli Wicket vs KKR) पुन्हा एकदा केल्यानं आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर मोफत वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा व्हॉट्सअप मेसेज करा.

error: