फोटो- ट्विटर, मुंबई इंडियन्स

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम बॉलरपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आयपीएल कोणत्याही टीमच्या कॅप्टनसाठी बुमराह हा प्रमुख अस्त्र आहे अचूक लाईन, लेंग्थ, बाणासारखे धारदार यॉर्कर यामुळे बुमराहनं क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला आहे. आयपीएल स्पर्धेपासून प्रकाशात आलेला बुमराहनं जगभरातील ग्राऊंडवर टेस्ट क्रिकेटमध्ये जादू दाखवली आहे. न्यूझीलंडचा अपवाद वगळता त्यानं प्रत्येक देशाविरूद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये किमान एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीनं (Virat Kohli) बुमराहबद्दल केलेली एक मोठी चूक 8 वर्षांनी उघड झाली (Virat mistake on Bumrah) आहे.

काय झाली चूक?

‘क्रिकबझ’ मधील एका कार्यक्रमात टीम इंडिया आणि आरसीबीचा माजी विकेट किपर पार्थिव पटेलनं (Parthiv Patl) कोहलीच्या ‘त्या’ विराट चुकीचा खुलासा केला आहे. या कार्यक्रमात बुमराहने बॉलिंगवर घेतलेल्या मेहनतीमुळे आज तो सर्वोत्तम बॉलर कसा बनला या गोष्टींवर देखील पार्थिवने मत व्यक्त केले आहे. पार्थिवप्रमाणेच वीरेंद्र सेहवागनंही बुमराहबद्दल गौरवोद्गार काढले. ‘बुमराह अव्वल दर्जाचा फास्ट बॉलर बनू शकेल असं मला कधीच वाटलं नव्हतं,’ अशी कबुली सेहवागनं यावेळी दिली.

पार्थिव यावेळी बोलताना म्हणाला की, ‘ मीा 2014 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) टीमचा सदस्य होतो, त्यावेळी बुमराह हा एक नवा बॉलर आहे. त्याची बॉलिंग एकदा पाहून घे असा सल्ला विराटला दिला होता. त्यावेळी ‘छोड यार ये बुमराह-वुमराह क्या करेंगे,’ असं विराटनं मला उत्तर (Virat mistake on Bumrah) दिले. विराटनं बुमराहच्या बॉलिंगचे व्हिडीओ देखील पाहिले नाहीत. त्यानंतर आयपीएल सिझनमध्ये (IPL 2014) मुंबई इंडियन्सकडून खेळताना बुमराहनं विराटलाच आऊट केलं. त्यावेळी मी (पार्थिव पटेल) त्याला माझ्या सल्ल्याची आठवण करून दिली.’

बुमराह कोहलीवर वरचढ

विराट कोहलीनं बुमराहाला कमी लेखण्याची चूक त्याला चांगलीच नडली. आयपीएल स्पर्धेत बुमराह नेहमीच विराटसाठी डोकेदुखी ठरला आहे. बुमराहनं कोहलीला 3 वेळा आऊट केले आहे. 2019 आयपीएल पासून बुमराहने टाकलेल्या 16 बॉलमध्ये कोहलीला 14 रनच करता आले आहेत. विराट प्रमाणे ऋषभ पंतवरही बुमराहनं वर्चस्व गाजवलं आहे. त्याने ऋषभ पंतला पाच वेळा आऊट केलं आहे. आयपीएल 2018 पासून (IPL 2018) बुमराहनं या स्पर्धेत सर्वात जास्त 84 विकेट्स घेतल्या आहेत.

‘यॉर्कर किंग’ बुमराहचं एकच आश्वासन,’डोन्ट वरी कॅप्टन, मै हूं ना!’

मुंबईला कसा सापडला बुमराह?

मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) बुमराहचा शोध कसा लागला याचा किस्सा देखील यावेळी पार्थिवनं सांगितला.आम्ही अहमदाबादमध्ये मुंबई विरूद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत होतो. ती मॅच बघायला मुंबई इंडियन्सचे तेव्हाचे प्रशिक्षक जॉन राईट देखील आले होते.मी बुमराहसोबत क्लब क्रिकेट खेळलो होतो. त्याने टाकलेले यॉर्कर्स अप्रतिम होते. त्यामध्ये वेग आणि अचुकता दोन्ही होती. त्या मॅचनंतर मला जॉन राईटने जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्याविषयी विचारले होते. त्याचवर्षी (2013) मुंबई इंडियन्सने बुमराहला टीममध्ये घेतले आणि त्याचं संपूर्ण करिअर बदललं.

‘बुमराहला संधी मिळाली त्याचप्रमाणे त्याच्या कौशल्यात सुधारणा झाली. करिअरच्या सुरुवातीला बुमराहकडे केवळ इनस्विंग हे एकच अस्त्र होते. त्यानंतर त्यानं बॉल सरळ ठेवण्यात यश मिळवले आणि परदेशात जाऊन आऊटस्विंगची कला देखील आत्मसात केली. स्लोअर बॉल, स्लोअर बाऊन्सरचं तंत्रही तो शिकला. या सर्व गोष्टी मेहनतीनेच साध्य होत असतात.

जसप्रीत बुमराह होणार टीम इंडियाचा पुढील कॅप्टन, रोहित शर्मानं दिले स्पष्ट संकेत!

लॉकडाऊन दरम्यान बुमराह भर दुपारी प्रॅक्टिस करत असे. विराटप्रमाणेच फिटनेसचा स्तर उंचावण्याचं त्याचं ध्येय होतं. एका टेस्टमध्ये तिसरा स्पेल करत असताना त्याला थकवा वाटत होता त्या दिवसानंतर त्याने फिटनेसवर देखील त्याने कठोर परिश्रम घेतले. सिक्स पॅक ॲब्समध्ये फोटो देखील त्याने शेअर केला होता.’ अशी आठवण (Virat mistake on Bumrah) पार्थिवनं यावेळी सांगितली.

व्हॉट्सअप अपडेट्स

‘Cricket मराठी’वरील बातम्यांचे मोफत अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअपवर वाचण्यासाठी 9920277596 या नंबरवर आम्हाला तुमचे नाव, स्पेस आणि Subscribe असा मेसेज व्हॉट्सअप करा.

error: